पुणे: प्रियकराने प्रेयसीच्या नवऱ्याची निघून हत्या केल्याचे समोर आले आहे. प्रेयसीने दुसऱ्याशी लग्न केल्याचा राग मनात धरून ठेवला. या रागातून प्रियकराने प्रेयसीच्या पतीच्या डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे घडली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव दीपक गोरख जगताप (रा. राजेवाडी, ता. पुरंदर) असे आहे. आरोपी सुशांत संदीप मापारी (रा. माळशिरस, ता. पुरंदर, मूळ रा. राहू, ता. दौड) हा फरार आहे.
काय घडलं नेमकं?
जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथील मृत दीपक जगताप याचा वाघापूर (ता. पुरंदर) येथील पायल अमोल कांबळे हिच्यासोबत प्रेम विवाह झाला होता. लग्नाला केवळ एक महिनाच झाला होता. दीपक हा उरुळी कांचन येथे खासगी गॅरेजमध्ये नोकरी करीत होता. नोकरीच्या निमित्ताने लग्नानंतर तो सहा दिवसांनी पत्नीसह उरुळी कांचन येथे राहायला गेला होता. महिनाभर संसार सुरळीत चालू होता. तेव्हा पायलचा प्रियकर सुशांत मापारी हा त्या दोघांच्या मोबाईलवर फोन आणि व्हॉट्सअॅप कॉल करून मी पायलशी लग्न करणार होतो. तुम्ही दोघांनी लग्न का केले? असे म्हणत जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. याची माहिती दीपकने आपल्या घरच्यांना दिली होती.
लग्नाचा वाद देखील मिटवून टाकू
१३ डिसेंबर रोजी मृत दीपक पायलसह राजेवाडी येथे गेला होता. पायलला घरी सोडून सुशांत मापारी सतत कॉल करून पायलचा मोबाइल माझ्याकडे आहे, तो घेऊन जा. लग्नाचा वाद देखील मिटवून टाकू असे तो म्हणत होता. मी त्याला भेटून येतो असे दिपकने सांगून माळशिरसला गेला. सुशांतने माळशिरस गावाच्या हद्दीत असलेले रामकाठी शिवारात दिपकला बोलावून घेतले. याच ठिकाणी आरोपीने दिपकच्या डोक्यात, मानेवर धारदार कोयत्यांते वार करून त्याचा खून केला. ज्या कोयत्याने त्याने हल्ला केला तो कोयता घटनास्थळी टाकून तिथून पळून गेला.
पोलीस तपास सुरु
दीपक हा घरी परत न आल्याने त्याला कॉल केला. मात्र त्याचा फोन देखील बंद होता. नातेवाईकांनी शोध घेतला तेव्हा माळशिरस गावाच्या रामकाठी शिवारात रक्तबंबाळ अवस्थेत दिपकचा मृतदेह आढळून आला. दीपक आणि आरोपी सुशांत या दोघांच्या दुचाकी घटनास्थळी आढळून आल्या. याबाबतची फिर्याद मयत दीपकचे मामा संतोष शेंडकर (रा. चांबळी, ता. पुरंदर) यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
पुणेकरांनो सावधान! सीसीटीव्ही पाहतोय; साडेतेरा लाख वाहनांवर पोलिसांची कारवाई
Ans: पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावच्या हद्दीतील रामकाठी शिवारात.
Ans: प्रेयसीने दुसऱ्याशी लग्न केल्याचा राग व सूडातून.
Ans: सुशांत संदीप मापारी (रा. माळशिरस), सध्या फरार.






