पुणेकरांनो सावधान! सीसीटीव्ही पाहतोय; साडेतेरा लाख वाहनांवर पोलिसांची कारवाई
नेमकं काय घडलं?
कांदिवली पश्चिमेकडील एकता नगर परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी सुरु होती. याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि या घटनेमध्ये सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी स्थानिक गुंडानी पोलिसांवरच हल्ला केला.
या घटनेनंतर कांदिवली पोलीसांनी अॅक्शन घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच अतिरिक्त पोलीस फौजफाटा बोलावून एकता नगर आणि आसपासच्या भागामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या मुख्य आरोपींविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची आणि अटक करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु असून दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
व्हिडिओत काय?
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काही गुंड पोलिसांना अडवत आहे. त्यांच्यावर वाद घालत त्यांच्यावर हात उचलतांना दिसात आहे. काही गुंडांनी पोलिसांची कॉलर पकडली असल्याचे दिसून येत आहे. पोलीस आपलं कर्तव्य बजावत असतांना त्यांच्यावर हल्ला झाल्याने घटनास्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणातून स्थानिक गुंडांना पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नसल्याचं चित्र दिसून येत आहे.
जावळीत मुबंई पोलिसांची मोठी कारवाई! एमडी ड्रग्जची पाळेमुळे जावळीपर्यंत पोहचली कशी?
कांदिवलीमध्ये पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कांदिवली पश्चिम एकता नगरमध्ये, मारामारीत सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर स्थानिक गुंडांनी हल्ला केला.#Crimenews #Mumbainews #police #kandiwali pic.twitter.com/C3xn2MZc7s — Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) December 15, 2025
Ans: मुंबईच्या कांदिवली पश्चिमेतील एकता नगर परिसरात.
Ans: हाणामारी सोडवताना आरोपींनी सहकार्य न करता पोलिसांवरच हल्ला केला.
Ans: मोठा बंदोबस्त तैनात करून आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.






