
crime (फोटो सौजन्य: social media)
कशी केली कारवाई?
अमली पदार्थ विरोधी पथकाला आंबिवली परिसरात एक तरुण एमडी ड्रग्स घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथक आणि खडकपाडा पोलिसांनी परिसरात सापळा रचला. दुचाकीवरून जाणाऱ्या अब्बास इराणी याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला अडवून चौकशी सुरू केली. यावेळी अब्बास घाबरला आणि त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून काही अंतरावरच त्याला पकडले. त्यांनतर त्याच्या दुचाकीची झडती घेतली असता डिक्कीत एमडी अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याच्याकडून १३ लाख २५ हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्स, दुचाकी आणि मोबाईल फोन जप्त केला.
अब्बास इराणी याने हे अमली पदार्थ कोठून आणले, ते कोणाला पुरविण्यात येणार होते आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने त्याला २३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या कारवाईमुळे आंबिवली परिसरात सुरु असलेल्या अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा धक्का बसला असून पोलिसांनी अशा कारवाया आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
काहीतरी भलतंच! जमीन पत्नीच्या नावावर, नातेवाईकांनी केलं जगणं मुश्किल; राग अनावर होत नवऱ्याने केला बायकोचा खून
कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या गावी पत्नीच्या नावावर जमीन खरेदी करणे एका पतीला आणि त्यांच्या कुटुंबियांना इतके खटकले की, त्यावरून पतीने आपल्या पत्नीला अमानुष मारहाण केली. ही मारहाण एवढी अमानुष होती की पत्नीचा मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
Ans: कल्याणमधील आंबिवली परिसरात अमली पदार्थ विरोधी पथक आणि खडकपाडा पोलिसांनी कारवाई केली.
Ans: आरोपीकडून 13 लाख 25 हजार रुपये किमतीचे MD ड्रग्स, दुचाकी आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
Ans: आरोपी अब्बास इराणीला अटक करून न्यायालयाने त्याला 23 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.