Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Accident News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला मर्सिडीज कारने उडवले; गाडीवर ‘आमदाराचे’ स्टिकर असल्याने खळबळ

Car Accident News: सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेला तरुण हवेत उडून कमानीत फेकला गेला; कल्याणमधील या भीषण हिट अँड रनने खळबळ उडाली! ज्या मर्सिडीज कारने उडवले, त्यावर 'आमदार' असे स्टिकर होते. राजकीय दबावापोटी कुणाला वाचवले जात आहे का?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 23, 2026 | 06:14 PM
Car Accident News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला मर्सिडीज कारने उडवले; गाडीवर 'आमदाराचे' स्टिकर असल्याने खळबळ

Car Accident News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला मर्सिडीज कारने उडवले; गाडीवर 'आमदाराचे' स्टिकर असल्याने खळबळ

Follow Us
Follow Us:
  • कल्याणमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेला २५ वर्षीय सुनील कोळी जागीच मृत
  • अपघात करणाऱ्या कारवर ‘विधानसभा सदस्य’ (MLA) स्टिकर असल्याने खळबळ  
  • चालकाला अटक करून गाडीत नेमके कोण होते, याचा शोध सुरू
Car Accident News: ठाण्यातील कल्याण पश्चिमेकडील निकी नगर (गणपती चौक) परिसरात एक अत्यंत भीषण आणि संतापजनक हिट अँड रनची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसर तसेच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका २५ वर्षीय होतकरू तरुणाचा भरधाव मर्सिडीज कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, या कारवर ‘विधानसभा सदस्य’ (MLA) असे लिहिलेले स्टिकर असल्यामुळे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे.

हेही वाचा: Beed Marriage Fraud: आधार कार्डवर वय बदलून लावले लग्न; बीडमधील धक्कादायक प्रकाराने हादरले विवाह मंडळ!

नेमकी कशी घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील निकी नगर भागात राहणारा सुनील कोळी (वय २५) हा तरुण नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता. यादरम्यान, एका भरधाव वेगाने आलेल्या मर्सिडीज कारने त्याला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण आणि जोरदार होती की, सुनील कोळी हवेत उडून रस्त्याशेजारील एका कमानीच्या आत जाऊन फेकला गेला. या भयानक अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह कमानीच्या आत पडल्यामुळे सुरुवातीला हा अपघात आहे, घातपात आहे की नैसर्गिक मृत्यू, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता.

सीसीटीव्हीमुळं उघडकीस आला ‘हिट अँड रन’चा प्रकार

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने सूत्रे हलवली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज कसून तपासले. या फुटेजची पाहणी केल्यानंतर एका भरधाव मर्सिडीज कारने सुनीलला उडवल्याचे स्पष्ट झाले. हा घातपात नसून एक भयानक हिट अँड रनचा प्रकार असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला.

हेही वाचा: Dengue Death News: नियतीचा क्रूर खेळ! अवघ्या काहीच तासांत हिरावले आई-वडिलांचे छत्र; गावात पसरली शोककळा

मर्सिडीजवरील ‘आमदार’ स्टिकरने वेधले लक्ष; नागरिकांमध्ये शंका-कुशंका

या प्रकरणात पोलिसांनी कोमिल गायकर नावाच्या चालकाला अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. परंतु, ज्या मर्सिडीज कारने धडक दिली, त्या गाडीवर ‘विधानसभा सदस्य’ (MLA) असे लिहिलेले स्टिकर लावलेले असल्यामुळे प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. हा अपघात कोणत्या आमदाराच्या गाडीने केला? किंवा हा स्टिकर कोणीतरी रुबाब दाखवण्यासाठी बेकायदेशीरपणे वापरला होता का? याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. राजकीय दबावापोटी खरी माहिती लपवली जात आहे का आणि पोलीस कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही दुर्घटना कुठे आणि कशी घडली?

    Ans: कल्याण पश्चिमेकडील निकी नगर भागात मॉर्निंग वॉकला गेलेल्या सुनील कोळी या तरुणाला भरधाव मर्सिडीज कारने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.

  • Que: या प्रकरणात पोलिसांची काय कारवाई झाली आहे?

    Ans: खडकपाडा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून कोमिल गायकर नावाच्या चालकाला अटक केली आहे.

  • Que: या अपघाताची चर्चा का होत आहे?

    Ans: ज्या मर्सिडीज कारने धडक दिली, त्यावर 'विधानसभा सदस्य' (MLA) असे स्टिकर असल्यामुळे आणि नेमका चालक कोण याबाबत संशय असल्यामुळे चर्चा सुरू आहे.

Web Title: Kalyan mercedes hit and run accident mla sticker news sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Car Accident
  • In Thane
  • MLA

संबंधित बातम्या

जळगावच्या बांभोरी पुलावर भीषण अपघात; कार-कंटेनरच्या धडकेत तीन चुलतभावांचा मृत्यू
1

जळगावच्या बांभोरी पुलावर भीषण अपघात; कार-कंटेनरच्या धडकेत तीन चुलतभावांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.