
जळगावच्या बांभोरी पुलावर भीषण अपघात; कार-कंटेनरच्या धडकेत तीन चुलतभावांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही जळगावहून धरणगाव तालुक्यातील झुरखेडा या गावी परतत होते. त्यावेळी बांभोरी उड्डाणपुलावर समोरून आलेल्या कंटेनरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कार फिरून तिचे मोठे नुकसान झाले. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला.
रविवारी पंकज यांच्या काकांचा दशक्रिया विधी होता. यासाठी जळगावहून आलेल्या आत्याच्या मुलाला भुसावळजवळील वनवली येथील देवीच्या यात्रेला जायचे होते. त्याला वनवली येथे सोडण्यासाठी तिघे कारने गेले होते. त्याला सोडून झुरखेड्याकडे परतताना बांभोरी पुलावर हा अपघात झाला.
हेही वाचा: लोणावळ्यात थरार! आईने चिमुकल्या लेकीसह दरीत घेतली उडी; झाडाच्या फांद्यांत अडकले अन्…
मृत हरीश सोलर क्षेत्रात काम करत होता. तो विवाहित असून त्याला दोन लहान भाऊ आहेत. त्याचे वडील सनपुले येथील दिव्यांग शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करतात. अपघाताची बातमी समजताच नातेवाइकांनी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालय परिसरात शोकाकुल नातेवाइकांची गर्दी झाली होती.
अपघातानंतर कंटेनर उड्डाणपुलाच्या कठड्यावर धोकादायक स्थितीत अडकला. त्यामुळे तो खाली कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. खबरदारी म्हणून वाहतूक थांबवण्यात आल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शहराच्या दिशेने खोटेनगरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
पाळधी-तरसोद बायपास बंद असल्याने शहरातून जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. गेल्या अडीच महिन्यांत विविध अपघातांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. बांभोरी उड्डाणपुलावरील या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापन आणि बायपास सुरू करण्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
Ans: या दुर्घटनेत तीन चुलतभावांचा मृत्यू झाला.
Ans: समोरून आलेल्या कंटेनरने कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
Ans: कंटेनर उड्डाणपुलाच्या कठड्यावर अडकल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांब रांगा लागल्या.