crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
सलमान जाफरी उर्फ सलमान इराणी या सराईत चोरट्याला अटक करण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी लूटमार करून त्याने दहशत माजवायचा. कल्याण जवळच्या आंबिवलीतील इराणी वस्तीतून फिल्मी स्टाईलने त्याला अटक करण्यात आली. या आरोपीला पकडण्याचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, यावेळी सलमानच्या नातेवाईकांनी पोलिसांवर हल्ला करून त्याला सोडवण्याचा प्रयत्नही केला. ही कारवाई पनवेल शहर पोलिसांनी ओळख पेटवलेल्या आरोपीला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांच्या मदतीने जेरबंद करण्यात आले.
Palghar Crime: फक्त ५० हजारांसाठी आजीने १४ वर्षीय नातीची केली विक्री, जबरदस्तीने लग्न, आणि…
नेमकं काय घडलं?
पनवेल शहरात नुकत्याच घडलेल्या एका सोनसाखळी चोरीच्या घटनेननंतर, पनवेल पोलिसांनी तपास करून आरोपीची ओळख पटवली.त्याचे नाव सलमान इराणी आहे. तो कल्याण मधील आंबिवली येथील इराणी वस्तीत राहणार हा आरोपी आहे. त्यानुसार, पनवेल शहर पोलिसांनी तात्काळ खडकपाडा पोलिसांशी संपर्क साधला. खडकपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी विजय गायकवाड यांचे पथक आणि पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पथक संयुक्तपणे सलमानला पकडण्यासाठी आंबिवलीतील इराणी वस्तीत रवाना झाले.
कसे पकडले आरोपीला
त्यांनतर पनवेल शहर पोलीस रेल्वे फाटकाजवळ अडकले, मात्र खडकपाडा पोलीस पथक इराणी वस्तीत शिरले. पोलिसांना सलमान इराणी दिसला. पोलिसांनी त्याला न पाहिल्याचे असे भासवले आणि त्याच्यावर झडप घेतली. सलमानने पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न केला आहे. याच वेळी सलमानचे नातेवाईक तिथे जमले आणि त्यांनी सलमानला सोडवण्यासाठी पोलिसांशी झटापट सुरू केली, तसेच पोलिसांवर हल्लाही केला. मात्र, पोलिसांनी परिस्थतीत हाताळत सलमानला घट्ट पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या. या घटनेचा संपूर्ण थरार व झटापट सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अखेरीस, पोलिसांनी सलमानला ताब्यात घेऊन त्याला पुढील कारवाईसाठी पनवेल शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.
यापूर्वीही त्याला पकडण्यासाठी हल्ले
सलमान इराणी हा सराईत चोर असून, तो अनेक वर्षांपासून लुटपाट सुरु आहे. त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलीस पथकांवर यापूर्वीही अनेकदा हल्ले झाले आहेत. सलमान इराणीवर पनवेल. भिवंडी, मुंबईसह राज्यभरात आणि देहसभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहे. तो अनेक प्रकरणांमध्ये फरार होता. त्याच्या अटकेमुळे सोनसाखळी चोरीच्या अनेक प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या अडचणी वाढल्या; घरात पोलिसांना काय-काय सापडलं?