crime, (फोटो सौजन्य- pinterest)
कणकवलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याचे समोर आले आहे. ८० वर्षीय प्रभावती सोराफ असे मृत्यू झालेल्या महिलेच नाव आहे. ही हादरवून टाकणारी घटना कणकवली तालुक्यातील वारगाव येथील सोरफ-सुतारवाडी येथे रात्रीच्या सुमारास राहत्या घरी घडली. पोलिसांनी मुलगा रवींद्र सोरफ याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येमुळे कणकवली मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
धक्कादायक! घरात डांबून ठेवले, जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त; महिलेचे सासरच्या लोकांवर आरोप
नेमकं काय घडलं?
संशयित आरोपी रवींद्र सोरफ याला दारूचे व्यसन आहे. सोरफ कुटुंबीय वारगांव सोरफ – सुतारवाडी येथील एका घरात रात्रीच्या सुमारास प्रभावती आणि मुलगा रवींद्र काही कारणावरून वाद झाला. त्यातून संतप्त झालेल्या रवींद्र याने थेट कोयत्याने आईच्या डोक्यावर आणि शरीरावर ठिकठिकाणी वार केले. रवींद्र याने रक्तबंबाळ स्थितीतील आईला ओढत घराच्या हॉलमध्ये आणले. हे खूप हादरवून टाकणार दृश्य होत.
स्थानिकांनी याबात माहिती कणकवली पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यावेळी प्रभावती यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या डोक्यावर ठिकठिकाणी कोयत्याने गंभीर वार होते. पोलिसांनी मुलगा रवींद्र याला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याने कोणत्या कारणामुले आपल्या आईची हत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
मुलगी झाली म्हणून पत्नीचा गळा दाबून खून
मुलगी झाली म्हणून पत्नीला सातत्याने मारहाण करत असताना पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. वडगाव मावळ न्यायालयातील सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी हा निकाल दिला आहे.योगेश कैलास जाधव (वय ३३, रा. चंदनवाडी, चांदखेड, मावळ) असे शिक्षा सुनावलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता. चांगुणा योगेश जाधव यांचा खून झाला होता. याबाबत चांगुणा यांचे वडील शिवाजी दामू ठाकूर (वय ४५, रा. परंदवाडी, मावळ) यांनी तक्रार दिली होती.
योगेश हा पत्नी चांगुणा यांच्याशी मुलगी झाली म्हणून नेहमी वाद घालत होता. त्यांना मारहाण करत होता. २८ ऑगस्ट २०२१ ला अशाच वादामध्ये त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला होता. या खटल्याचे कामकाज सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून स्मिता मुकुंद चौगुले यांनी पाहिले. ॲड. चौगुले यांनी या खटल्यामध्ये परिस्थितीजन्य व वैद्यकीय पुरावे अन्वये आठ साक्षीदारांची साक्ष घेऊन योग्य पुरावे सादर केले. तसेच गुन्हा खटला शाबीत करण्यासाठी प्रभावीपणे युक्तिवाद केला.