नागपूर कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा राडा; तुरुंगातच एकाने दुसऱ्या कैद्याला दिली जीवे मारण्याची धमकी...
नागपूर : पाणी भरण्यावरून दोन कैद्यांमध्ये वाद सुरू होता. नेमकं याचदरम्यान तिसऱ्याच एका कैद्याची ‘एंट्री’ झाली. सिनेस्टाईल त्याने दादागिरी दाखवत एकाची बाजू घेत दुसऱ्या कैद्याला बेदम मारहाण केली. तसेच त्याला ठार मारण्याची धमकी दिली. कर्तव्यावर असलेले कारागृह रक्षक धावले. मध्यस्थी करून वाद सोडवला. ही घटना नागपूर कारागृहातील बडी गोल बरॅक एकच्या मागच्या भागात घडली.
याप्रकरणी आता धंतोली पोलिसांनी कारागृह रक्षक अमोल इखारकर यांच्या तक्रारीवरून दादागिरी करणाऱ्या कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रवीण श्रीनिवास महाजन (वय ३७, रा. कसबापेठ, पुणे) असे त्या कैद्याचे नाव आहे. विशेष म्हणजे भांडण करणारे दोघे आणि दादागिरी करणारा असे तिघेही विचाराधीन कैदी आहेत. आरोपी प्रवीण हा पुण्यातील चर्चित गुंड आहे. 2021 मध्ये त्याने पुण्याच्या बुधवारपेठेत एका पोलिसावर चाकूने हल्ला करत त्याचा खून केला होता. त्यावेळी प्रविण तडीपार होता. याच वर्षी त्याला नागपूरच्या कारागृहात ठेवण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : Dhule Crime: दोन दिवसांपूर्वी वाढदिवस आणि…, माजी स्थायी समिती सभापतींच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल
दरम्यान, यशपाल नानकचंद चौहान हा बडी गोल क्रमांक १ च्या मागच्या भागातील नळावर बादलीने पाणी भरत होता. त्याच वेळी तोसिफ इब्राहिम शेख (रा. ताजबाग) हा नळावर गेला आणि यशपालची बादली बाजूला करुन त्याने स्वतःची बादली नळाखाली लावली. यावरून यशपाल आणि तोसिफ यांच्यात वाद झाला. दोघेही एकमेकांना शिवीगाळ करत होते.
काही दिवसांपूर्वीही घडली होती अशीच घटना
गेल्या मंगळवारीही मध्यवर्ती कारागृहात अशाच प्रकारची घटना घडली होती. दोन कैद्यांमध्ये क्षुल्लक कारणातून वाद झाला होता. यात एका कैद्याने शस्त्राने हल्ला करत दुसऱ्या कैद्याला गंभीर जखमी केले होते. ही घटना बरॅक क्र. २ जवळ घडली होती. त्यानंतर आता ही घटना समोर आली.
हेदेखील वाचा : Hyderabad Crime : कुकरने मारलं, चाकू कैचीने गळा चिरून महिलेवर…; हल्लेखोरांनी 40 ग्रॅम सोनं आणि 1 लाख रुपये रोख रक्कम लुटली