
'दृश्यम' स्टाईलने रचला खुनाचा कट; अनैतिक संबंधांच्या त्रासातून आई-मुलाने असा केला खात्मा, की पोलीसही चक्रावले! (Photo Credit- X)
१३ जानेवारी रोजी जामडी फॉरेस्ट गावालगतच्या वनभागात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृताच्या अंगावर केवळ शर्ट असून डोक्यावर गंभीर जखमा होत्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, कन्नड ग्रामीण पोलिस, डॉग स्क्वॉड व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. चौकशीत मृताची ओळख राजू रामचंद्र पवार (रा. जामडी, ता. कन्नड) अशी पटली. या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी एलसीबीची दोन पथके व कन्नड ग्रामीण पोलिसांचे पथक तयार करण्यात आली होती. तपासादरम्यान मृताच्या अंगावरील अंडरवेअर, चप्पल व फुटलेला मोबाइल घटनास्थळापासून वेगवेगळ्या दिशांना मिळून आले.
धक्कादायक ! 8 वर्षांच्या चिमुकलीचा शिक्षकानेच केला विनयभंग; केसांना, पाठीला हात लावला अन्…
मृतदेह सापडलेल्या ठिकाणालगतचे शेत राजू जोधा पवार यांचे असून त्याची देखभाल पत्नी वंदना व मुलगा धीरज करत असल्याची माहिती पुढे आली. चौकशीत दोघांच्या जबाबात विसंगती आढळली. सखोल चौकशीत वंदनाने कबुली दिली की, मृत राजू पवार वारंवार तिच्यावर अनैतिक संबंधासाठी दबाव टाकत होता. या त्रासाला कंटाळून तिने मुलाला सांगितले व दोघांनी खून करण्याचा कट रचला. १३ जानेवारी रोजी वंदनाने राजू पवारला बोलावले. यावेळी धीरजने लाकडी ओंडक्याने डोक्यावर व गुप्तांगावर वार केले. वंदनानेही मदत करत त्याचा जीव घेतला.
दोन्ही आरोपी तपासादरम्यान शांतपणे सहकार्य करत असल्याने संशय अधिक बळावला, अखेर ठोस पुरावे मिळाल्यानंतर वंदना पवार व धिरज उर्फ टेमा यांना अटक करण्यात आली. आरोपी वंदनाचा पती आरोग्य विभागात सेवेत असून त्याचा या गुन्ह्यात सहभाग नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, सहायक अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री, एलसीबीचे निरीक्षक राजपुत ग्रामीण पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याऱ्यांनी केली.
तपासात उघड झाले की, धिरजने क्राइम पेट्रोल, सीआयडी, दृश्यम तसेच ओटीटीवरील सिरीज पाहून नियोजन केले होते, डिजिटल टेल टाळण्यासाठी सिमकार्ड बदलणे, मोबाइल फोडणे अशा क्लृप्त्या वापरण्यात आल्या, त्याच्या मोबाइल ब्राउझर हिस्ट्रीतूनही पुरावे नष्ट करण्याचे नियोजन स्पष्ट झाले.
Wardha Crime: मानसिक रुग्णाचा नग्नावस्थेत तांडव; दंडुक्याच्या हल्ल्यात दोन ठार, पोलिसासह चौघे जखमी