Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

ससून रुग्णालयाचे माजी फॉरेन्सिक विभागप्रमुख डॉ. अजय तावरे याला जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 05, 2026 | 11:34 AM
पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

Follow Us
Follow Us:

पुणे : कल्याणीनगर येथील बहुचर्चित पोर्शे अपघात आणि त्यानंतर उघडकीस आलेल्या रक्तनमुना फेरफार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ससून रुग्णालयाचे माजी फॉरेन्सिक विभागप्रमुख डॉ. अजय तावरे याला जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे. दोन वर्षांपुर्वी (दि. १९ मे २०२४) पहाटे कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन मुलाने महागड्या पोर्शे कारने वेगात दुचाकीला धडक दिली. या अपघातात एक तरूण आणि त्‍याची मैत्रीण या आयटी अभियंत्यांचा मृत्‍यू झाला होता. अपघातावेळी मुलगा मद्यधुंद अवस्थेत असल्‍याचा आरोप झाला.

 

घटनेनंतर अल्‍पवयीन मुलाला निबंध लिहण्याची व वाहतुक नियमन करण्याची दिलेली शिक्षा देशभर चर्चेचा विषय ठरली होती. नंतर तपास अधिक खोलवर गेला असता रक्तनमुने बदलल्याचा गंभीर आरोप पुढे आला. अल्पवयीन चालकाच्या रक्तातील मद्याचे पुरावे लपवण्यासाठी संगनमत केल्याचा दावा पोलिसांनी केला. याच प्रकरणात ससून रुग्णालयातील काही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नावे समोर आली त्‍यात डॉ. अजय तावरे याचा देखील सहभाग पोलिस तपासात समोर आले.

जुलै २०२४ मध्ये पुणे पोलिसांनी सविस्तर आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यात अपघातानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी कथितपणे रचलेल्या कटाची माहिती देण्यात आली. मध्यस्थांमार्फत डॉक्टरांशी संपर्क साधून रक्तनमुने बदलण्यात आल्याचा आरोप तपासात नमूद करण्यात आला. डॉ. अजय तावरे याच्यावरही या कथित कटात सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आला. तपास यंत्रणेनुसार, तो संबंधित दिवशी रजेवर असला तरी संगनमतात त्यांची भूमिका असल्याचे म्हटले गेले. त्याला मे २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती आणि ते तेव्हापासून न्यायालयीन कोठडीत होता.

समानता तत्‍वावर जामीन (पॅरीटी)

डॉ. तावरे यांनी जामिनासाठी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने डिसेंबर २०२५ मध्ये फेटाळला होता. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या वतीने मांडण्यात आले की, या प्रकरणातील इतर काही सहआरोपींना आधीच जामीन मंजूर झाला आहे आणि ते जवळपास एकवीस महिने तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंची बाजू ऐकून ‘समता तत्त्वा’चा आधार घेत त्यांना जामीन देण्याचा निर्णय घेतला.

डॉ. तावरेला जामीन देताना घातलेल्‍या अटी

डॉ. तावरे याने खटल्यात पूर्ण सहकार्य करावे, साक्षीदारांशी कोणताही संपर्क साधू नये आणि जामिनाच्या अटींचा गैरवापर करू नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. अटींचे उल्लंघन झाल्यास जामीन रद्द होईल, असेही आदेशात नमूद आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून राजकारण रंगले; काय आहे सध्याची परिस्थिती?

जामीन मिळालेले आरोपी

डॉ. अजय तावरे, अमर गायकवाड (मध्यस्थ), आशपाक मकानदार (मध्यस्थ), मागील सीटवर बसलेला अल्‍पवयीन, आशिष मित्तल, शिवानी अग्रवाल, अल्‍पवयीन चालक

अद्याप कारागृहात असलेले आरोपी

विशाल अग्रवाल (बिल्‍डर), ससून रूग्णालयातील डॉ. श्रीहरी हळनोर, ससूनमधील शिपाई अतुल घटकांबळे

Web Title: Supreme court grants bail to dr ajay taware accused in porsche car accident case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • Court
  • crime news
  • Porshe Accident

संबंधित बातम्या

35 सेकंदात 30 वेळा चाकूने वार, पंजाबच्या मोहालीत एक्स-बाॅयफ्रेंडने ऑफिसमध्ये घुसुन गर्लफ्रेंडची केली हत्या; सीसीटिव्ही व्हायरल
1

35 सेकंदात 30 वेळा चाकूने वार, पंजाबच्या मोहालीत एक्स-बाॅयफ्रेंडने ऑफिसमध्ये घुसुन गर्लफ्रेंडची केली हत्या; सीसीटिव्ही व्हायरल

Nashik Crime : गोळीबार प्रकरणातील दोन सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या; पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
2

Nashik Crime : गोळीबार प्रकरणातील दोन सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या; पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई

पहाटे महिलेच्या घरात गेला, पलंगावर पाडून तोंड दाबले अन्…; सिल्लोडमधील संतापजनक प्रकार
3

पहाटे महिलेच्या घरात गेला, पलंगावर पाडून तोंड दाबले अन्…; सिल्लोडमधील संतापजनक प्रकार

नसरापूरप्रकरणी मोठी अपडेट समोर; 7 वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवल्यानंतर आता…
4

नसरापूरप्रकरणी मोठी अपडेट समोर; 7 वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवल्यानंतर आता…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.