Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fairness Cream: जाहिरात पाहिली अन् मागवली फेअरनेस क्रीम! वर्षभराच्या वापरानंतर मुलीची किडनी निकामी; तपासात धक्कादायक…

Fairness Cream: गोरं होण्याच्या नादात १७ वर्षीय तरुणीने इन्स्टाग्रामवरून मागवली फेअरनेस क्रीम अन् वर्षभरातच किडनी निकामी! क्रीममध्ये सामान्य मर्यादेपेक्षा १२,५०० पट अधिक विषारी पारा आढळल्याने खळबळ; बाल हक्क आयोगाची धडक कारवाई!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 23, 2026 | 02:56 PM
Fairness Cream: जाहिरात पाहिली अन् मागवली फेअरनेस क्रीम! वर्षभराच्या वापरानंतर मुलीची किडनी निकामी; तपासात धक्कादायक...

Fairness Cream: जाहिरात पाहिली अन् मागवली फेअरनेस क्रीम! वर्षभराच्या वापरानंतर मुलीची किडनी निकामी; तपासात धक्कादायक...

Follow Us
Follow Us:
  • इन्स्टाग्रामवरील फेअरनेस क्रीम वापरल्याने किडनी निकामी
  • क्रीममध्ये १२,५०० पीपीएम पारा आढळल्याने ‘मेम्ब्रेनस नेफ्रोपैथी’ हा किडनीचा आजार
  • कुटुंबीयांचा ग्राहक न्यायालयात जाण्याचा निर्णय
Fairness Cream: आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकालाच वाटते आणि सुंदर दिसणे म्हणजे गोरे असणे असा गैरसमज समाजात अनेकदा पाहायला मिळतो. याच गोरेपणाच्या हव्यासापोटी बाजारात मिळणाऱ्या किंवा सोशल मीडियावर दिसणाऱ्या फेअरनेस क्रीमचा वापर करणे किती जीवावर बेतू शकते, याचे धक्कादायक उदाहरण केरळच्या मलप्पुरममधून समोर आले आहे. येथे एका १७ वर्षीय मुलीने इन्स्टाग्रामवर जाहिरात पाहून मागवलेली फेअरनेस क्रीम वापरल्याने तिची किडनी निकामी होण्यापर्यंत प्रकृती खालावली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केरळ राज्य बालक हक्क संरक्षण आयोगाने स्वतःहून कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: Seized Pune: बंद गोडाऊन आणि शेतातील शेडमध्ये लपलं होतं कोट्यवधींचं कांड? महिनाभराच्या पाळतीनंतर पहाटे सव्वादोनला छापा अन्…

इन्स्टाग्रामवरील प्रमोशन व्हिडिओ पाहून मागवली क्रीम

मलप्पुरम येथील एस्टर मिम्स मदर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या १७ वर्षीय मुलीने इन्स्टाग्रामवर काही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सचे प्रमोशन व्हिडिओ पाहिले होते. या क्रीममुळे चेहऱ्यावरील मुरुम, काळे डाग आणि वांग निघून जातात, असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला होता. त्या जाहिरातीला भुलून मुलीने इन्स्टाग्रामवर दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून विक्रेत्याशी संपर्क साधला आणि क्रीम मागवली. सुरुवातीला चेहऱ्यावर फरक दिसल्याने तिने एका वर्षात अशा अनेक बाटल्या मागवून वापरल्या.

बीपी लो, पाय सुजले आणि किडनीचा गंभीर आजार

क्रीमच्या सततच्या वापरामुळे काही दिवसांतच मुलीची प्रकृती वेगाने बिघडू लागली. तिचे ब्लड प्रेशर अचानक कमी होऊ लागले आणि तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध पडू लागली. याशिवाय तिच्या पायांवर मोठी सूज आल्याने चालणेही कठीण झाले. प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीवर उपचार करणाऱ्या नेफ्रोलॉजिस्ट डॉ. गौरी एस. यांनी सांगितले की, वैद्यकीय चाचण्यांमध्ये तिच्या रक्तात आणि शरीरात पाऱ्याची पातळी अत्यंत धोकादायक स्तरावर वाढलेली आढळली. तपासात तिला ‘मेम्ब्रेनस नेफ्रोपैथी’ नावाचा किडनीचा गंभीर आजार झाल्याचे निष्पन्न झाले.

क्रीममध्ये सापडला तब्बल १२,५०० पीपीएम पारा!

डॉक्टरांच्या मते, शरीरातील पारा किडनीच्या गाळण्याच्या प्रक्रियेला मोठे नुकसान पोहोचवतो. जेव्हा संबंधित फेअरनेस क्रीमची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली, तेव्हा त्यात तब्बल १२,५०० पार्ट्स पर मिलियन (PPM) पारा आढळून आला, तर सामान्यपणे ही सुरक्षित मर्यादा १ पीपीएमपेक्षाही कमी असते. म्हणजेच क्रीममध्ये विषारी पाऱ्याचे प्रमाण अत्यंत भयानक होते.

हेही वाचा: Accident News: चालकाला चक्कर आली अन् बस थेट पुलाला धडकून पलटी! समृद्धी महामार्गावर रात्री ३ अपघातांचा थरार

कंपनीचे मौन; बाल हक्क आयोगाकडून कारवाईला सुरुवात

पीडित मुलीने प्रकृती बिघडल्याची माहिती संबंधित कंपनीला दिली असता, सुरुवातीला त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवल्याचे सांगितले आणि नंतर मेसेजला उत्तर देणेच बंद केले. आता मुलीच्या कुटुंबीयांनी कंपनीविरुद्ध ग्राहक न्यायालयात कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला असल्याने सध्या क्रीमचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, केरळ राज्य बालक हक्क संरक्षण आयोगाने आरोग्य सेवा संचालक, राज्य पोलीसप्रमुख, औषध नियंत्रक, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण आणि रुग्णालयाच्या अधीक्षकांकडे तातडीने अहवाल मागवला असून पुढील कारवाई सुरू केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: केरळमधील १७ वर्षीय मुलीची किडनी कशामुळे खराब झाली?

    Ans: इन्स्टाग्रामवरील प्रमोशन व्हिडिओ पाहून मागवलेली फेअरनेस क्रीम वर्षभर वापरल्याने तिच्या शरीरात पाऱ्याचे प्रमाण धोकादायक पातळीवर वाढले आणि तिला 'मेम्ब्रेनस नेफ्रोपैथी' हा किडनीचा गंभीर आजार झाला.

  • Que: संबंधित फेअरनेस क्रीमच्या तपासणीत काय धक्कादायक बाब समोर आली?

    Ans: प्रयोगशाळेतील तपासणीत या क्रीममध्ये तब्बल १२,५०० पार्ट्स पर मिलियन (PPM) इतका पारा आढळला, जो सामान्य मर्यादेपेक्षा (१ पीपीएमपेक्षा कमी) हजारो पटीने अधिक आहे.

  • Que: या प्रकरणी प्रशासन आणि कुटुंबीयांकडून काय कारवाई केली जात आहे?

    Ans: पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी कंपनीविरुद्ध ग्राहक न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे, तर केरळ राज्य बालक हक्क संरक्षण आयोगाने स्वतःहून गुन्हा दाखल करत आरोग्य व पोलीस विभागाकडून अहवाल मागवला आहे.

Web Title: Kerala 17 year old girl kidney damage instagram fairness cream poisoning sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • instagram
  • side effect

संबंधित बातम्या

Viral Instagram Reel : तीन वर्षांनंतर लेकीने दिले आईला सरप्राईज; दार उघडताच आईच्या डोळ्यांत तरळले अश्रू VIDEO व्हायरल
1

Viral Instagram Reel : तीन वर्षांनंतर लेकीने दिले आईला सरप्राईज; दार उघडताच आईच्या डोळ्यांत तरळले अश्रू VIDEO व्हायरल

No Money Challenge : सुवर्ण मंदिराजवळ दुकानदाराने जिंकले परदेशी पाहुण्याचे मन; VIDEO व्हायरल
2

No Money Challenge : सुवर्ण मंदिराजवळ दुकानदाराने जिंकले परदेशी पाहुण्याचे मन; VIDEO व्हायरल

लग्न सोहळ्यात पिवळ्या रंगाच्या साडीला का दिले जाते विशेष महत्व? जाणून घ्या यामागील परंपरा
3

लग्न सोहळ्यात पिवळ्या रंगाच्या साडीला का दिले जाते विशेष महत्व? जाणून घ्या यामागील परंपरा

Emotional Viral Video : मुलीची ट्रेन सुटेपर्यंत प्लॅटफॉर्मवर थांबले आई-वडील; वडिलांची कृती पाहून नेटकरी भावुक
4

Emotional Viral Video : मुलीची ट्रेन सुटेपर्यंत प्लॅटफॉर्मवर थांबले आई-वडील; वडिलांची कृती पाहून नेटकरी भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.