संग्रहित फोटो
हेही वाचा: Fake Police Robbery: ६० लाखांची रोकड कोठून आली अन् रचलं कोणी षडयंत्र? बनावट पोलीस लूट प्रकरणात मुंबई पोलिसांचा सखोल तपास सुरू!
समृद्धी महामार्गावर मध्यरात्री वेगवेगळ्या ठिकाणी हे अपघात घडले. एकामागून एक झालेल्या तीन अपघातांमध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, तब्बल २३ ते ३० प्रवासी जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यापैकी ८ ते १० जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील बचाव पथक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
चॅनल क्रमांक ४२६.३ वर यवतमाळहून मुंबईकडे जाणारी खासगी बस अपघातग्रस्त झाली. चालकाला अचानक चक्कर आल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि ती सिमेंटच्या पुलाला धडकून पलटी झाली. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर ८ ते १० प्रवासी गंभीर जखमी आणि १५ ते २० प्रवासी किरकोळ जखमी झाले.
चॅनल क्रमांक ४३७.७ वर नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपचा अपघात झाला. समोरील अज्ञात कारने हुलकावणी दिल्यामुळे पिकअपवरील नियंत्रण सुटल्याचा दावा चालकाने केला आहे. सुदैवाने या घटनेत चालक आणि अन्य एका प्रवाशाला कोणतीही दुखापत झाली नसून ते सुखरूप आहेत. दुसरीकडे, चॅनल क्रमांक ४४२.३ वर मुंबईहून निजामाबादकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाला. चालकाला झोपेची डुलकी लागल्याने कार थेट क्रॅश बॅरियरला जाऊन धडकली. या अपघातात चालक सुखरूप असून कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची नोंद नाही.






