
विद्यार्थ्यांना नग्न करून गुप्तांगांवर लटकवले डंबेल (फोटो सौजन्य-X)
Kerala ragging case News Marathi: केरळमधील एका वैद्यकीय महाविद्यालयातून रॅगिंगची एक भयानक घटना समोर आली आहे. या कॉलेजमध्ये आरोपी विद्यार्थ्यांकडून प्रथम ज्युनियर विद्यार्थ्यांना नग्न करण्यात आले त्यानंतर त्यांच्या गुप्तांगांवर डंबेल लटकवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. एवढेच नाही तर ज्योमेट्री बॉक्समधील कंपास सारख्या वस्तूंनी विद्यार्थ्यांच्या अंगावर जखमा करून त्यावर लोशन लावण्यात आले.गेल्या तीन महिन्यांपासून काही विद्यार्थ्यांना या रॅगिंगचा सामना करावा लागत होता. केरळमधील एका सरकारी महाविद्यालयात रॅगिंगच्या धक्कादायक घटनेत पाच तृतीय वर्षाच्या नर्सिंग विद्यार्थिनींना त्यांच्या कनिष्ठ विद्यार्थ्यांना अनेक महिने क्रूर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
ही घटना कोट्टायम येथील सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये घडली. जिथे तिरुवनंतपुरम येथील तीन प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कोट्टायम गांधीनगर पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली. ज्यामध्ये नोव्हेंबर २०२४ मध्ये सुरू झालेल्या आणि सुमारे तीन महिने चाललेल्या हिंसक कृत्यांचा खुलासा झाला. या तक्रारीमुळे आरोपी विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आणि रॅगिंग विरोधी कायद्यांतर्गत त्यांना अटक करण्यात आली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना सिनीयर विद्यार्थ्यांनी नग्न उभे राहण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्या गुप्तांगातून डंबेल लटकवले. पीडितांना ज्योमेट्री बॉक्समधील कंपास सारख्या वस्तूंनी विद्यार्थ्यांच्या अंगावर जखमा ही केल्या. त्याची क्रूरता इथेच थांबली नाही. जखमांवर लोशन लावले गेले, ज्यामुळे वेदना होत होत्या. जेव्हा पीडित महिला वेदनेने ओरडू लागल्या तेव्हा त्यांच्या तोंडात जबरदस्तीने लोशन ओतण्यात आले. वरिष्ठांनी या कृत्यांचे व्हिडीओ केले आणि ज्युनियर्सना धमकी दिली की जर त्यांनी या गैरवर्तनाची तक्रार करण्याचे धाडस केले तर त्यांचे करिअर संपणार असल्याचे सांगितले.
तक्रारीत असाही दावा करण्यात आला आहे की, रविवारी दारू खरेदी करण्यासाठी वरिष्ठ नियमितपणे कनिष्ठांकडून पैसे गोळा करत होते. ज्यांनी हा आदेश पाळण्यास नकार दिला त्यांना मारहाण करण्यात आली. एका विद्यार्थ्याला जो आता छळ सहन करू शकला नाही, त्याने त्याच्या वडिलांना सांगितले, ज्यांनी त्याला पोलिसांशी संपर्क साधण्यास प्रोत्साहित केले. पाचही आरोपी विद्यार्थी सध्या पोलिस कोठडीत आहेत आणि बुधवारी दुपारपर्यंत त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाण्याची अपेक्षा आहे.