
crime (फोटो सौजन्य: social media)
• केतन आणि सिया यांच्या कुटुंबाचा आनंदी कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
• लोहगड हत्याकांडातील सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती चेतन आहे का, याचा तपास सुरू आहे.
• गेट ॲनॅलिसिसमधून पोलिसांना महत्त्वाचा तांत्रिक पुरावा मिळण्याची शक्यता आहे.
पुणे: पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. डिजिटल तपास, सोशल मीडिया आणि पोलिसांच्या चौकशीतून या प्रकरणातील अनेक कड्या जोडल्या जात आहेत. दरम्यान, आता या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो केतन आणि सिया गोयल यांच्या कुटुंबाच्या एका आनंदी कौटुंबिक कार्यक्रमातील असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमुळे हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
An old video of Ketan Agarwal dancing with his and his fiancee Siya’s parents at a family function in Pune has emerged.The video dated May 7, a little over a month before Ketan Agarwal was killed, shows the 26-year-old celebrating and rejoicing with the relatives.The video… https://t.co/gsFEhEZsc5 pic.twitter.com/ITUimryayi— Hate Detector 🔍 (@HateDetectors) July 1, 2026
स्वतः अग्रवाल फॅमिलीने शेअर केल्याचा दावा
हा व्हिडिओ गेल्या ७ मे रोजी झालेल्या एका कौटुंबिक कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात केतन अग्रवाल, त्याचे वडील आणि आरोपी सिया गोयल हिचे आई-वडील व इतर नातेवाईक एकत्र सहभागी झाले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन्ही कुटुंबातील सदस्य गाण्यांवर एकत्र डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये केतन अग्रवाल अत्यंत बेभान होऊन नाचताना दिसत असून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. केतनचा हा आनंदी चेहरा पाहून आता पाहणाऱ्यांचे डोळे पाणावत आहेत. हा व्हिडिओ स्वतः अग्रवाल फॅमिलीने शेअर केल्याचा दावा सध्या केला जात आहे.
लोहगड किल्ल्यावर हत्येच्या दिवशी सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या संशयास्पद व्यक्तीचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी मोठी तयारी सुरू केली आहे. या व्यक्तीची ओळख आरोपी चेतन चौधरी असल्याचा पोलिसांचा दावा असून, तो सिद्ध करण्यासाठी आता त्याचे ‘गेट ॲनॅलिसिस’ करण्यात येणार आहे. या तांत्रिक तपासातून हत्याकांडातील महत्त्वाचा पुरावा समोर येण्याची शक्यता आहे.लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही व्हिडीओत दिसलेली ती संशयास्पद व्यक्ती ज्या पद्धतीने आणि ज्या मार्गावरून चालत किंवा पळत गेली होती, अगदी त्याच मार्गावरून चेतनला चालवले जाईल. गेट ॲनॅलिसिस पूर्णपणे हवामानावर अवलंबून आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पावसात पार पडली, तर चेतनच्या चालण्याची अचूक पद्धत आणि सीसीटीव्ही फुटेजमधील चालण्याची पद्धत मॅच करणे फॉरेन्सिक टीमसाठी कठीण होऊ शकते. त्यामुळे पोलीस पावसाची उघडीप मिळण्याची वाट पाहत आहेत.
Ans: हा व्हिडिओ 7 मे रोजी झालेल्या कौटुंबिक कार्यक्रमातील असल्याचा दावा केला जात आहे.
Ans: सीसीटीव्हीमध्ये दिसणारी संशयास्पद व्यक्ती चेतन आहे का, हे तांत्रिकदृष्ट्या तपासण्यासाठी गेट ॲनॅलिसिस केले जाणार आहे.
Ans: लोणावळा परिसरातील पावसामुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे येत आहेत.