crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका चिमुरड्याचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. पाच कोटींच्या खंडणीसाठी ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातल्या आरोपींना दुहेरी जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाने अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे या दोघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. तीच शिक्षा औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवली आहे. आरोपींवर कलम 302 म्हणजे हत्या आणि कलम 364 म्हणजे पैशासाठी अपहरण या कलमांतर्गत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. वर्धनचे वडील बांधकाम व्यावसायिक होते. आणि मुंबईत त्यांचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
Pranjal Khewalkar Case: प्रांजल खेवलकरांनी केले ड्रग्सचे सेवन? फॉरेन्सिकच्या रिपोर्टमुळे उडाली खळबळ
नेमकं प्रकरण काय?
वर्धन घोडे याचे अपहरण आरोपींनी २७ फेब्रुवारी २०१७ रोजी केलं. त्यानंतर दौलताबाद घाटात त्याची रुमालाने गळा आवळून हत्या केली. त्यांनतर कोणालाही
संशय येऊ नये म्हणून मृतदेहाची विल्हेवाट न लावता तो कारच्या डिकीत ठेवून ते कॉलनीत परतले. आरोपींनी टिळकनगर परिसरातील नाल्यात वर्धनचा मृतदेह फेकला. त्यानंतर वर्धनच्या घरी जाऊन काही घडलंच नाही, अशा आविर्भावात आरोपी फिरत होते. वर्धन हा फक्त १० वर्षांचा होता. त्याच्या अंगावर तब्बल ३१ घाव होते.
आरोपी अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे पोलिसांना आरओपी अभिलाषच्या घराजवळ पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची चिठ्ठी सापडली होती. तपासात आरोपी अभिलाष मोहनपूरकर आणि आणि आरोपी श्याम मगरे यांच्याविरोधात अनेक पुरावे सापडले.या प्रकरणात अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे यांना दोषी ठरवत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
रुमाल घटक शस्त्र
या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया विशेष गाजली. खटल्यावेळी अवघ्या सात महिन्यात तब्बल ३० वेळा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. विशेष म्हणजे हा खटला जलदगती कोर्टात नव्हता, तरीदेखील केवळ दीड वर्षात सुनावणी पूर्ण होऊन आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली. या खटल्यानिमित्त “रुमाल” हेदेखील घातक शस्त्र ठरू शकते, हे सिद्ध झाले.