Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: कोल्हापुर हादरलं! 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण; बॅटरी करंट देऊन व्यावसायिकाची निर्घृण हत्या

कोल्हापुरातील दानोळी गावात भाजीपाला व्यावसायिकाचे 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून काही तासांतच करंट देऊन निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 15, 2026 | 10:26 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • 25 लाखांच्या खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण
  • बॅटरीचा करंट देऊन हत्या केल्याची कबुली
  • पोलिसांनी दोन आरोपींना अटक, तपास सुरू
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २५ लाखांच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यावसायिकाचे अपहरण करून काही तासातच त्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात शेरी मळा परिसरातील शेतात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव भरतेश राजगोंडा टोपगोंडा (४० वर्षीय) असे आहे. भरतेश्वर हे सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घरी निघाले होते. याचवेळी आरोपींनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांच्याच मोबाइलवरूनच त्यांचे चुलत भाऊ महावीर टोपगोंडा यांना कॉल केला. भरतेश्वर हा फ्लॉवरचे २५ लाख रुपये देणे लागतो असे सांगून त्यांनी पैसे घेऊन देण्यास सांगितले. त्यावेळी महावीर यांनी तुमच्यातील व्यवहार समोर बसून मिटवूया, असे सांगताच संशयितांनी फोन बंद केला. दरम्यान, रात्री अकराच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांत देण्यात आली होती.

Pune Crime: पुण्यात झोपण्याच्या वादातून खून! वॉचमनने सहकाऱ्याचा गळा आवळून केला हत्या

अपहरणानंतर आरोपींनी तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती पुढे आली आहे. या कॉलमध्ये मोठी रक्कम घेऊन ठराविक ठिकाणी येण्याचा आदेश देण्यात आला. यानुसार भारतदेश यांचा भाऊ महावीर आणि त्याचे दोन मित्र सांगितलेल्या ठिकाणी गेले. मात्र अपहरणकर्त्यांनी सतत लोकेशन बदलत त्यांना गोंधळात टाकले. काही वेळातच मोबाईल बंद करण्यात आला आणि संपर्क पूर्णपणे तुटला.

बॅटरीच्या करंटने केली हत्या

यानंतर ग्रामस्थांनी शोधमोहीम राबविली होती. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास शेरीमळा रस्त्यावर उसामध्ये भरतेश्वर यांची गाडी आणि चप्पल सापडली. त्यानंतर त्यांचा मृतदेह उसाच्या शेतात सापडला. पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. राजदीप अजय ताडे (२१), टिल्लू ऊर्फ मंथन राजेंद्र चंदुरे-पवार (२१, दोघे रा. दानोळी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी बॅटरीचा करंट देऊन भरतेश्वर यांचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले. या घटनेमुळे शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Kolhapur Crime: नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या…; कोल्हापुरात स्मशानभूमीत अघोरी विधीचा प्रकार उघड

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात ही घटना घडली.

  • Que: आरोपींनी हत्या कशी केली?

    Ans: बॅटरीचा करंट देऊन व्यावसायिकाचा खून केला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: दोन आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Kolhapur crime kolhapur shaken kidnapped for a 25 lakh ransom businessman brutally murdered using electric shocks from a battery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात झोपण्याच्या वादातून खून! वॉचमनने सहकाऱ्याचा गळा आवळून केली हत्या
1

Pune Crime: पुण्यात झोपण्याच्या वादातून खून! वॉचमनने सहकाऱ्याचा गळा आवळून केली हत्या

Kolhapur Crime: नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या…; कोल्हापुरात स्मशानभूमीत अघोरी विधीचा प्रकार उघड
2

Kolhapur Crime: नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या…; कोल्हापुरात स्मशानभूमीत अघोरी विधीचा प्रकार उघड

Mumbai News: मुंबईत दूध भेसळीवर कारवाई, ५ जणांना अटक, ६२१ लिटर दूध नष्ट
3

Mumbai News: मुंबईत दूध भेसळीवर कारवाई, ५ जणांना अटक, ६२१ लिटर दूध नष्ट

Solapur Crime: सोलापुरात लग्नाच्या 4 महिन्यांतच २२ वर्षीय महिलेची हत्या; ‘तुझ्या बापानं लग्नात TV च दिला नाय…
4

Solapur Crime: सोलापुरात लग्नाच्या 4 महिन्यांतच २२ वर्षीय महिलेची हत्या; ‘तुझ्या बापानं लग्नात TV च दिला नाय…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.