Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापूर हादरलं! वाढदिवसादिवशी किरकोळ वाद आणि धारदार विळ्याने केले पत्नीवर वार, स्वतःचाही संपवला जीव,

कोल्हापूर हादरलं! वाढदिवसाच्या दिवशी घरगुती किरकोळ वादातून पतीने पत्नीवर धारधार विळ्याने वार केले. यानंतर त्याने स्वतःच गळा चिरून आत्महत्या केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 14, 2025 | 10:01 AM
crime ( फोटो सौजन्य social media )

crime ( फोटो सौजन्य social media )

Follow Us
Follow Us:

कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील सावे गावात एक धक्कदायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशी घरगुती किरकोळ वादातून पतीने पत्नीवर धारधार विळ्याने वार केले. यानंतर त्याने स्वतःच गळा चिरून आत्महत्या केली. ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. मृतकाचे नाव कृष्णा शिवाजी झेंडे (वय 47) आणि राधिका झेंडे असे आहेत.

नेमकं काय प्रकार?

कृष्णा झेंडे हे मुंबईतील खासगी कंपनीत नोकरीला होते आणि काही दिवसांपूर्वी सुट्टीसाठी गावी आले होते. कृष्णा झेंडे यांचा काल (शुक्रवारी 13 जून) रोजी वाढदिवस होता. सावे गावातील तरुणांच्या मोबाइलवर व सोशल मीडियावर कृष्णा झेंडेंचे फोटो झळकत होते. घरामध्ये वाढदिवस साजरा करण्याची तयारी सुरू असतानाच घरात पत्नी राधिका हिच्यासोबत वाद निर्माण झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर कृष्णा यांनी गवत कापण्याच्या विळ्याने राधिकावर चार ते पाच वार केले. पत्नी राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून कृष्णा यांनी स्वतःच गळा चिरून जीवन संपवलं.

शेजारच्यांनी घटनेचा आवाज ऐकताच तात्काळ घाव घेतली आणि पोलिसांनीच कळवले. शाहूवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांनाही मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. कृष्णा यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. राधिकावर प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आलं. कृष्णा पश्चात पत्नी, दोन मुले व आई असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

किरकोळ वाद आणि माजी नगरसेविकेच्या समर्थकांकडून तरुणावर तलवारीने हल्ला

अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. माजी नगरसेविकेच्या मुलीचा किरकोळ वाद तरुणांशी झाला. त्यामुळे माजी नगरसेविकेच्या सामर्थकांनी या तरुणावर तलवारीने हल्ला केला. तरुणावर वार करणाऱ्या नगरसेविकेच्या समर्थकांना देखील जमावाने चोप दिला. त्यानंतर माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक केली. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याने युवा शेतकऱ्याची आत्महत्या; धक्क्याने वडिलांचा मृत्यू, आईलाही हृदयविकाराचा झटका

Web Title: Kolhapur shaken on his birthday a minor dispute and a man attacked his wife with a sharp sickle ended his own life as well

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 10:01 AM

Topics:  

  • crime
  • kolhapur

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
4

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.