Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolkata News: हृदयद्रावक! मुलाच्या उपचारासाठी आलेल्या वडिलांचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू; आरजी कर रुग्णालयात खळबळ

कोलकात्यातील आरजी कर रुग्णालयात लिफ्ट बिघाडामुळे अरूप बॅनर्जी यांचा मृत्यू झाला. मुलाच्या उपचारासाठी आलेल्या या व्यक्तीला लिफ्ट बेसमेंटमध्ये अडकली. आपत्कालीन यंत्रणा निकामी ठरल्याने वेळेत मदत न मिळाल्याचा आरोप आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 21, 2026 | 01:13 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मुलाच्या उपचारासाठी रुग्णालयात आले होते
  • लिफ्ट थेट बेसमेंट शाफ्टमध्ये अडकली
  • आणि वडिलांचा मृत्यू
कोलकाता: कोलकाता येथून आरजी कर रुग्णालयात पुन्हा एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. या रुग्णालयात शुक्रवारी (२० मार्च) पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. आपल्या मुलाच्या उपचारासाठी अरुप बॅनर्जी हे आले होते. मात्र त्यांचाच याच रुग्णालयात लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे सरकारी रुग्णलयातील सुरक्षा व्यवस्था आणि देखभाल दुरुस्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काय घडलं नेमकं?

अरुप बॅनर्जी पहाटे 5 च्या सुमारास पत्नीसह मुलावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात आले होते. चौथ्या मजल्यावर उपचार आटोपून खाली येत असतांना हा अपघात घडला. तळमजल्यावर येण्यासाठी ते लिफ्टमध्ये शिरले, मात्र तिथे कोणताही अधिकृत लिफ्टमन हजर नव्हता. तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट तळमजल्यावर न थांबता थेट बेसमेंटमधील रेडिओलॉजी युनिटच्या शाफ्टमध्ये जाऊन कोसळली. या अनपेक्षित धक्क्याने बॅनर्जी कुटुंब पूर्णपणे हादरून गेले.

Ashok Kharat Case update: ‘म्हणून जास्त उडायचं नसतं!…; रोहिणी खडसेंनी चाकणकरांच्या जखमेवर मीठ चोळलं

लिफ्ट एका निर्जन आणि बंद भागात अडकल्याने कुटुंबाने मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. लिफ्टमधील इमर्जन्सी अलार्म किंवा संवादाचे कोणतेही साधन कार्यान्वित नव्हते. जिवाच्या आकांताने त्यांचा मुलगा लिफ्टच्या वेंटिलेशनच्या छोट्या जागेतून कसाबसा बाहेर पडला आणि मदतीसाठी धावला. मात्र, रुग्णालय
कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडण्यास बराच वेळ लागला. जेव्हा अरूप यांना बाहेर काढण्यात आले, तेव्हा ते बेशुद्ध पडले होते. त्यांना डॉक्टरांनी तपासले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी ‘अनैसर्गिक मृत्यू’ची नोंद केली असून सार्वजनिक बांधकाम विभागाची (PWD) टीम लिफ्टच्या तांत्रिक बिघाडाची चौकशी करत आहे. अरूप बॅनर्जी यांचा मृत्यू लिफ्टच्या धक्क्याने झाला की गुदमरून, हे पोस्ट मार्टम अहवालानंतरच स्पष्ट होईल. सध्या पोलीस रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करत आहेत.

Bhandara Crime: संतापजनक! प्रेमाच्या जाळ्यात ओढत अल्पवयीन मुलीचे अश्लिल व्हिडिओ केले व्हायरल; आरोपी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज रुग्णालयात.

  • Que: मृत व्यक्ती कोण होते?

    Ans: अरूप बॅनर्जी, जे मुलाच्या उपचारासाठी आले होते.

  • Que: अपघात कसा झाला?

    Ans: लिफ्टमध्ये बिघाड होऊन ती बेसमेंट शाफ्टमध्ये अडकली.

Web Title: Kolkata news heartbreaking father dies after getting trapped in an elevator while seeking treatment for his son shockwaves at rg kar hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
1

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
2

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.