Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime: पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल १,१६१ कोटींचा सायबर फ्रॉड; गुन्हेगारीसाठी ‘या’ पॅटर्नचा सर्वाधिक वापर

शेअर बाजारात गुंतवणूकीवर चांगला नफा देऊ, गुंतवणूकीवर चांगला परतावा दिला जाईल, अथवा विवाह व मैत्रीकरून परदेशातून गिफ्ट पाठविल्याचे सांगत आमिष दाखवून फसवले जाते.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 19, 2024 | 06:16 AM
Cyber Crime: पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल १,१६१ कोटींचा सायबर फ्रॉड; गुन्हेगारीसाठी 'या' पॅटर्नचा सर्वाधिक वापर

Cyber Crime: पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल १,१६१ कोटींचा सायबर फ्रॉड; गुन्हेगारीसाठी 'या' पॅटर्नचा सर्वाधिक वापर

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: शिक्षण व आयटी हब अन् औद्योगिकनगरी असणाऱ्या दोन शहरात आणि ग्रामीणमधील ६५ हजार पुणेकरांना “जाळ्यात” ओढून सायबर चोरट्यांनी वर्षातच तब्बल ११६१ कोटींचा फ्रॉडकरून आर्थिक फसवणूक केली आहे. आतापर्यंत सायबर गुन्ह्यांतील ही सर्वात मोठी फसवणूक आहे. पुणेकरांची सर्वाधिक फसवणूक झाली असून, त्याखालोखाल पिंपरी-चिंचवड तसेच पुणे ग्रामीणचा क्रमांक लागत असल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. या वर्षात जवळपास १५ टक्यांनी तक्रारींची संख्या वाढल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे सायबर पोलिसांची कामगिरी मात्र सुमार आहे.

शहरात, शिक्षण व नोकरी यानिमित्ताने येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यासोबत उद्योग व व्यावसायामुळे देखील मोठे नागरिककरण झाले आहे. एक कोटींच्या पुढे दोन शहराची संख्या गेली आहे. शहरात उच्चशिक्षीतांचे प्रमाण देखील मोठे आहे. आपसूकच त्यामुळे या डिजीटल युगात प्रत्येकजन आर्थिक व्यवहार देखील ऑनलाईन करू लागले आहे. ऑनलाईन व्यावहराला प्रथम प्राधान्य देणारे पुणे शहर होते. परंतु, आता जादा पैशांची ओढ अन् झटपट श्रीमंत होण्याचा हव्यासामुळे मात्र, कोट्यवधी रुपयांना फसवणूक होऊ लागला आहे. तर दुसरीकडे न काही करताच भिती दाखवून फसविले जात आहे. एकाठिकाणी बसून हे सायबर चोर कोट्यवधी रुपयांना गंडा घालत आहेत.

दरवर्षी सायबर गुन्हेगारीचा पॅटर्न बदलतो. त्यात आमिष, भिती व भावनिकता हे तीन प्रमुख वैशिष्टय पाहिला मिळते. अमाप पैसा, तर कधी पोलीस कारवाईची भिती आणि हाताला काम देणे अशा त्रीसुत्री पॅटर्न राबवत फसविले जाते. शेअर बाजारात गुंतवणूकीवर चांगला नफा देऊ, गुंतवणूकीवर चांगला परतावा दिला जाईल, अथवा विवाह व मैत्रीकरून परदेशातून गिफ्ट पाठविल्याचे सांगत आमिष दाखवून फसवले जाते.

तर, तुमच्या नावाने पाठवलेले पार्सल पकडले असून, त्यात डेबीटकार्ड, पासपोर्ट तसेच आमली पदार्थ सापडले आहे. त्यामुळे तुमच्यावर पोलीस कारवाई होईल अशी भिती दाखवत फसविले जाते. नंतर तुम्हाला घरबसल्या काम देऊ असे सांगत टास्क दिले जातात. विश्वास संपादन करण्यासाठी प्रथम काही परतावा दिला जातो. नंतर मात्र, टास्क मिळविण्यासाठी पैसे उकळले जात आहेत. चालू वर्षात पोलीस कारवाईची भिती, शेअर बाजारातील गुंतवणूक तसेच टास्कच्या आमिषाने सर्वाधिक फसवणूक झाल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा: Cyber Crime: ६५ हजार पुणेकर सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात..! तक्रारीत 15 टक्क्यांनी वाढ, कोटींची फसवणूक

  डिजीटल अॅरेस्टप्रकरणात ज्येष्ठ नागरिकांना हेरले जात आहे.

–   पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडल्याची भिती दाखविण्यात तरुणाई टार्गेट केले जाते.

–   ऑनलाईन कामासाठी इच्छुक असणाऱ्यांना टास्क फ्रॉडमध्ये फसविले जाते.

–   शेअर मार्केटमधून जास्त परतावा देण्याचे आमिषाने अनेकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले जाते.

वर्षभरातील सायबर फ्रॉडमधील रक्कम

पिंपरी-चिंचवड—२७ हजार तक्रारी – ४२९ करोड

पुणे शहर—३८ हजार तक्रारी – ६६९ करोड

पुणे ग्रामीण- फसवणूक रक्कम ६४ कोटी

Web Title: Last one year 1161 crore cyber fraud with pune and pcmc people use diffrent pattern crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • cyber crime
  • Pimpri Chinchwad
  • Pune

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठा सक्षमीकरणासाठी आता…; आमदार लांडगेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
1

पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठा सक्षमीकरणासाठी आता…; आमदार लांडगेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
2

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
3

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

Mumbai Crime : मुंबईत ८१ वर्षीय महिला ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात; ८.७० कोटी गमावले, नेमकं काय घडलं?
4

Mumbai Crime : मुंबईत ८१ वर्षीय महिला ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात; ८.७० कोटी गमावले, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.