पुणेकर नागरिक सायबर क्राईमचे शिकार (फोटो- istockphoto )
पुणे/अक्षय फाटक : शिक्षणाचे माहेर घर आणि आयटी हब अशी ओळख निर्माण करणाऱ्या “पुणे” अन् औद्योगिक तसेच झपाट्याने वाढलेल्या “पिंपरी-चिंचवड” शहरातील तब्बल “६५” हजार पुणेकर सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले गेल्याची धक्कादायक बाब आकडेवारीतून स्पष्ट झाली आहे. वर्षात करोडो रुपयांची फसवणूक केली असून, या वर्षात जवळपास १५ टक्यांनी तक्रारींची संख्या वाढल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे सायबर पोलिसांची कामगिरी मात्र सुमार आहे.
पुण्य-नगरी औद्योगिक नगरीतील गुन्हेगारीचा चहूबाजूने वाढत चाललेला आलेख शहारांच्या नावलौकिकाला बाधा आणत आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीत वर्षाला वाढ होत आहेच, पण स्मार्टसिटी, स्मार्ट नागरिक अन् स्मार्ट पोलिसींग असलेल्या हे दोन्ही शहरं सायबर गुन्हेगारांचे लक्ष झाले आहेत. कारण, सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणआत वाढल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई व पुणे (पिंपरी-चिंचवड) राज्यातील सर्वाधिक सायबर गुन्हेगारीचे गुन्हे घडणारे शहर असल्याचे पोलीस खासगीत सांगतात.
सायबर फ्रॉडचं टेन्शन दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दरवर्षी या सायबर चोरट्यांकडून नवनवीन क्लुप्त्या वापरत आर्थिक फसवणूक केली जात आहे. गेल्या वर्षी लोन अॅप, टास्क फ्रॉड तसेच सेक्स स्टॉर्शनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसविले जात आहे. यंदा सायबर गुन्हेगारीचा ट्रेंड बदलला असून, डिजीटल अॅरेस्ट, शेअर मार्केटमधील जादा नफा, वर्क फ्रॉर्म होम, कुरिअरमध्ये अमली पदार्थ सापडले अथवा तुमच्या क्रमांकावरून अवैधप्रकारे आर्थिक व्यवहार होत आहेत, तसेच टास्क पुर्ण करण्यास देणे यासह वेगवेगळ्या कारणातून नागरिकांना हे सायबर चोरटे फसवत आहेत. ज्येष्ठ, एकट्या नागरिकांकडून कारवाईची भिती दाखवून तसेच त्यांना “डिजीटल अॅरेस्ट”च्या नावाखाली लाखो रुपये पाठविण्यास भाग पाडले जात आहे.
हेही वाचा: Cyber Fraud: सायबर चोरट्यांनी 7 जणांना हेरले, अन् थेट 70 लाखांना…; कराडमधील घटना