Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime: लातूरमध्ये दुहेरी हत्याकांड! पिता-पुत्राचा धारदार शस्त्राने खून, गावात भीतीचं सावट

लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात धारदार शस्त्राने पिता-पुत्राची निर्घृण हत्या करण्यात आली. मृतदेह पाण्याच्या टाकीजवळ फेकण्यात आले. या दुहेरी हत्याकांडामुळे गावात भीतीचं वातावरण असून पोलिस तपास वेगाने सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 05, 2025 | 03:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • रुद्धा गावात पिता-पुत्राची निर्घृण हत्या
  • धारदार शस्त्राने वार करून खून
  • आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास वेगात

लातूर: लातूर येथील अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावातील पिता- पुत्राची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह ग्रामपंचायतच्या पाण्याच्या टाकी परिसरात फेकून दिल्याचे समोर आले आहे. मृत पिता-पुत्र हे त्यांच्या गावाजवळील शेतातील आखाड्यावर झोपलेले होते. मृतकाचे नाव शिवराज निवृत्ती सुरनर (वय ७०) आणि विश्वनाथ शिवराज सुरनर (२०) असे आहे.

Madhya Pradesh Crime: चरित्र्यावर संशय; संतापलेल्या पतीने पत्नीचं नाक ब्लेडने कापलं, बोटांवरही वार केले

काय घडल नेमकं?

३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडलेली ही घटना ४ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. सुरनर पिता-पुत्र हे रोजच्याप्रमाणे संध्याकाळी साडेनऊच्या सुमारास शेतातील आखाड्यावर झोपायला गेले होते. मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या चेहऱ्यावर, तोंडावर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने अनेक वार करत दोघांना ठार केले आहे. नंतर आरोपींनी त्यांचे मृतदेह शेतातून उचलून ग्रामपंचायतच्या पाण्याच्या टाकीजवळ फेकून दिले. ही घटना दुसऱ्या दिवशी सकाळी समोर आली. सकाळी ही घटना उघडकीस येताच गावात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. रुद्धा गावात दोन जीव घेतलेल्या या दुहेरी हत्याकांडाने परिसर हादरला आहे. पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, तपासाला वेग देण्यात आला आहे.

न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे व श्वान पथकाने घटनास्थळी पाहणी केली असून, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपविभागीय अधिकारी अरविंद रायबोले, पोलिस निरीक्षक विनोद मेत्रेवाड यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा रूद्धा गावात दाखल झाला होता. ठसे तज्ज्ञांच्या पथकाकडून काही ठिकाणी पाहणी केली असून, मोबाइल फोन तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. या सर्व पथकांकडून आपआपल्या कार्य पद्धतीनुसार पुरावे गोळा करण्यात आले. दरम्यान, मृत पिता-पुत्रांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आले असून, या प्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामस्थांची मागणी

या हत्यांमागे ज्यांचाही हात असेल त्यांना लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. खुनाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. घटनास्थळी सर्व प्रकारचे पुरावे गोळा करण्याचे काम केले जात आहे. तपास वेगाने केला जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Palghar: वनसंपत्ती वाचवण्यासाठी वनविभागाचा ‘धडा’! डहाणूत अवैध खैर तोडीवर धडक कारवाई; दीड लाखांचा साठा जप्त

Web Title: Latur crime father and son murdered with sharp weapon fear spreads in the village

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 03:02 PM

Topics:  

  • crime
  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

Madhya Pradesh Crime: चरित्र्यावर संशय; संतापलेल्या पतीने पत्नीचं नाक ब्लेडने कापलं, बोटांवरही वार केले
1

Madhya Pradesh Crime: चरित्र्यावर संशय; संतापलेल्या पतीने पत्नीचं नाक ब्लेडने कापलं, बोटांवरही वार केले

Palghar: वनसंपत्ती वाचवण्यासाठी वनविभागाचा ‘धडा’! डहाणूत अवैध खैर तोडीवर धडक कारवाई; दीड लाखांचा साठा जप्त
2

Palghar: वनसंपत्ती वाचवण्यासाठी वनविभागाचा ‘धडा’! डहाणूत अवैध खैर तोडीवर धडक कारवाई; दीड लाखांचा साठा जप्त

Pune Crime: संसार थाटला, अनेकांच्या घरी काम केलं… पण व्हिसाची मुदत संपली; दहशतवाद विरोधी पथकाने घेतलं ताब्यात
3

Pune Crime: संसार थाटला, अनेकांच्या घरी काम केलं… पण व्हिसाची मुदत संपली; दहशतवाद विरोधी पथकाने घेतलं ताब्यात

Haryana crime: पतीच्या बेरोजगारीचा सूड! पत्नीकडून वीट-दांडक्याने निर्घृण खून; मृतदेहाशेजारी बसून केला मेकअप
4

Haryana crime: पतीच्या बेरोजगारीचा सूड! पत्नीकडून वीट-दांडक्याने निर्घृण खून; मृतदेहाशेजारी बसून केला मेकअप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.