नेमकं काय घडलं?
ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास पाडलवा गावात घडली. राकेश (वय २३) आणि त्याची पत्नी (वय २२) हे गुजरातमधील संतरामपूर येथील एका कारखान्यात गेल्या चार महिन्यांपासून मजुरीचे काम करत होते. त्यांच्या सोबत त्यांचा सहा वर्षांचा मुलगाही होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्या कारखान्यात बिहारमधील एका मजुराशी पत्नीचं बोलणं होत होतं. याच कारणावरून राकेश पत्नीवर संशय घेत होता आणि तिच्याशी वारंवार वाद घालत होता. मंगळवारी दोघे पती-पत्नी मोटारसायकलने संतरामपूरवरून आपल्या गावाकडे येत होते. प्रवासादरम्यान दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.
नाक कापले…
संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास ते गावात पोहोचले आणि वाद वाढला. संतापाच्या भरात राकेशने आपल्या पर्समधून ब्लेड काढले आणि पत्नीच्या नाकावर वार केला. यात पत्नीचं नाक कापलं गेलं आणि काही भाग तुटून खाली पडला. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने ब्लेडने पत्नीच्या बोटांवरही वार केले.यात ती गंभीर जखमी झाली. नाक कापल्यानंतर नाकाचा तुकडा जमिनीवर पडला, मात्र शोदल्यानंतर तो सापडला नाही. या घटनेने परिसरात गोंधळ उडाला.
कुत्र्यांनी नेला नाकाचा तुकडा उचलून
घनस्थळी उपस्तिथ असलेल्या स्थानिकांच्या माहितीनुसार, कुत्र्यांनी तो नाकाचा तुकडा उचलून नेला असावा. त्यानंतर राकेशने स्वतःच पत्नीला मोटारसायकलवर बसवून राणापूर येथील रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आणि झाबुआ जिल्हा रुग्णालयात हलवले. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु आहे असं राणापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी दिनेश रावत यांनी सांगितले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.






