
crime (फोटो सौजन्य: social media)
उल्हासनगर (वा.) : उल्हासनगरमध्ये कायद्याचे शिक्षण देणाऱ्या प्राध्यापिकेचा मोबाईल हॅक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील लॉ प्रोफेसर प्रिया कृपलाणी यांच्या फोनमध्ये अज्ञात हॅकर्सनी थेट घुसखोरी करत तब्बल ९० किलोमीटर दूर मोहापे-कर्जत परिसरातून त्यांच्या व्हाट्सअपवर बर अनधिकृत लॉगिन केल्याचे उघडकीस आले आहे. ड. डिजिटल जगातील वाढत्या असुरक्षिततेचे थरकाप क उडवणारे चित्र समोर येताच नागरिकांत प्रचंड चिंता री निर्माण झाली आहे. सोशल मीडियाच्या सुरक्षिततेवर न. मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना की उल्हासनगरात उघड झाली आहे. कॅम्प क्रमांक ४ ना येथील सरदार आलूसिंग सीएचएस मध्ये राहणाऱ्या लॉ 5. प्रोफेसर प्रिया कृपलाणी यांच्या मोबाईल फोनवर कर सायबर गुन्हेगारांनी हँकिंगद्वारे नियंत्रण मिळवून थेट स त्यांच्या व्हाट्सअप अकाउंटमध्ये घुसखोरी केल्याचे समोर आले आहे.
भाईंदरमध्ये जमिनीवर कब्जाचा प्रयत्न! ३० जणांना अटक, १८ आरोपी न्यायिक कोठडीत
लॉगिन तब्बल ९० किलोमीटर दूरवरून नेहमीप्रमाणे सकाळी मोबाईल सुरू करताच प्रिया कृपलाणी यांना अलर्ट मिळाला. लगेच तपासल्यावर त्यांना लक्षात आले की हे लॉगिन त्यांच्या घरातून नव्हते, तर तब्बल ९० किलोमीटर दूर मोहापे-कर्जत परिसरातून झाले होते. एका उच्चशिक्षित व्यक्तीच्या फोनमध्येही अशी हॅकिंग घुसखोरी झाली हे पाहून त्या हादरून गेल्या.
हॅकर्सचा माग काढण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक पथक
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन प्रिया यांनी लगेचच विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.प्राथमिक तपासातच पोलिसांना एक धक्कादायक बाब समोर आली की हॅकर्सने केवळ व्हाट्सअपवर नव्हे तर संपूर्ण मोबाईल फोनवर नियंत्रण मिळवले आहे. सायबर पोलिसांनी हॅकर्सचा माग काढण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक पथक तयार केले असून तपास युद्धपातळीवर सुरू आहे.
Ans: उल्हासनगर
Ans: प्रिया कृपलाणी
Ans: तांत्रिक पथक