पुणे: कामशेत घाटातून एक अपघाताची घटना समोर आली आहे. कार्तिकी एकादशीच्या पवित्र वारीला वारकरी निघाले होते. तेव्हा कामशेत घाटात वरच्या बाजूने उतरत असलेल्या कंटेनर वारकऱ्यांच्या दिंडीत घुसत एकाला जागीच ठार केलं. तर आठ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मुंबई- पुणे महामार्गावरील कामशेत घाटात घडली आहे.
कसा झाला अपघात?
उरण येथील श्री दावजी पाटील दिंडी आळंदीच्या कार्तिकी वारीसाठी निघाली होती. तेवढ्यात कंटेनरवरील ताबा सुटून थेट दिंडीत घुसला आणि अपघात घडला. यात जागीच एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर आठ जण गंभीर जखमी झाले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरु केला. तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापूर्वीही असाच एक अपघात याच ठिकाणी घडला आहे. तीन वर्षांपूर्वी बोलेरो दिंडीत घुसली होती. तेव्हाच प्रशासनाला सुरक्षा पुरविण्याची मागणी करण्यात आली होती.
वडगाव शेरीतील राड्यात नवा ट्विस्ट; “मार खाणारा तो पठारे मी नव्हे” ॲड. सचिन पठारे यांचे स्पष्टीकरण
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राड्याला आता नवा नाट्यमय ट्विस्ट मिळालाय. या प्रकरणात आमदार बापू पठारे आणि त्यांच्या समर्थकांना झालेल्या धक्काबुक्कीची चर्चा रंगली असताना, “मार खाणारा सचिन पठारे मी नाही” असं म्हणत ॲड. सचिन पठारे यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं आहे.
शनिवारी (दि.04) लोहगाव येथील गाथा लॉन्समध्ये आमदार बापू पठारे एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमादरम्यान त्यांचं आणि बंडू खांदवे यांच्या बोलण्याचे शाब्दिक चकमकीत रूपांतर झाले. या वादानंतर दोन्ही गटातील समर्थकांमध्ये गोंधळ उडाला आणि काहींना मारहाण झाल्याची माहिती मिळाली. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी बंडू खांदवे यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या राड्यात ‘सचिन पठारे’ नावाच्या तरुणाला मारहाण झाली असल्याचं वृत्त आल्यानंतर, त्याच नावाचा दुसरा तरुण ॲड. सचिन पठारे हा चर्चेत आला. मात्र त्यांनी स्पष्ट केलं की, “मार खाणारा सचिन पठारे मी नाही. माझं या घटनेशी काहीही संबंध नाही. नामसाधर्म्यामुळे अनेक जण मला फोन करून विचारपूस करत आहेत, ज्यामुळे मला मानसिक त्रास होत आहे.” असे ॲड. सचिन पठारे यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं आहे.
Delhi Bomb Blast मधील कारचा संबंध पुलवामा हल्ल्याशी? त्या कार कुठून आल्या
Ans: कामशेत
Ans: एक
Ans: उरण






