
crime (फोटो सौजन्य: social media)
मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधातून एका महिलेने आपल्या नवजात बाळाची हत्या केली नंतर पतीच्या प्रायव्हेट पार्टवर सुद्धा हल्ला केल्याचे समोर आले आहे. बाळ केवळ २७ दिवसांचा होता. त्याची गळा दाबून हत्या केली. बाळाला वाचवण्यासाठी आलेल्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केल्याचे समोर आले आहे. या घटनेने गंभीररीत्या जखमी झालेल्या पीडित पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना मध्यप्रदेशातील भिंड येथील मालनपुर पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
बायकोला धक्का दिल्यावरून वाद; एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
नेमकं काय प्रकरण?
मालनपूरच्या वॉर्ड 14 मध्ये पीडित पती जगन्नाथ हा राहत होता. त्याने सांगितले की, एका वर्षांपूर्वी शिवपुरी जिल्ह्यातील खनीयधाना खानियाधाना येथे राहणाऱ्या उषा बघेल नावाच्या महिलेशी त्याची ओळख झाली. ही ओळख दोघांची वाढत गेली आणि त्याच प्रेमसंबंधात रूपांतर झाले. त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. एक महिन्यापूर्वी, जगन्नाथ आपल्या गर्भवती पत्नीला घेऊन त्याच्या गावी गेला. उषाने ३ ऑक्टोबरला बाळाला जन्म दिले. तीन दिवसांपूर्वी तो आपल्या पत्नी आणि मुलासह मालनपुर येथे आला होता.
मध्यरात्री घडला हा प्रकार
त्याच्या पत्नीला त्याच्यावर संशय आला. तिला असं वाटलं की तो दुसऱ्या महिलेशी बोलत होता. याच कारणामुळे, त्या दोघांमध्ये सतत वाद होत होते. शुक्रवारी रात्री सर्वांचे जेवण झाले. तो झोपला तेव्हा रात्री 1:15 वाजताच्या सुमारास पत्नीने आपल्या झोपलेल्या बाळाचा गळा दाबून निर्घृण हत्या केली. त्यावेळी, बाळाला वाचवण्यासाठी आलेलया पाटीवर सुद्धा महिलेने चाकूने वार केला. तेव्हा तो चाकू त्याच्या गुप्तांगाला लागल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे, पीडित पती गंभीररीत्या जखमी झाला. घरातून ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारच्या लोकांना सुद्धा जाग आली.
आरोपी महिलेला अटक
शेजारील नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर, जखमी पती आणि बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आरोपी उषा बघेल हिला अटक करण्यात आली. महिलेने आपला गुन्हा काबुल केला आहे. त्यानंतर, बाळाचं पोस्टमॉर्टम करून मृतदेह त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात आला. सध्या, पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला.