Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhya Pradesh Crime: संतापजनक! आठवीत शिकणारी विद्यार्थिनी गर्भवती, तब्बल सहा महिने सुरु होता अत्याचार

मध्यरप्रदेश मधील भिंड येथे आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने सहा महिने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. मुलगी गर्भवती असल्याचे समजल्यानंतर प्रकरण समोर आले असून आरोपी फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 12, 2026 | 03:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

 

  • भिंड येथे आठवीतील मुलीवर सहा महिने अत्याचार झाल्याचा आरोप.
  • मुलगी गर्भवती असल्याचे समजल्यानंतर प्रकरण उघडकीस.
  • मुख्य आरोपी साहिल फरार; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू.
मध्यरप्रदेश: मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आठवीत शिकणारी मुलगी गर्भवती झाल्याची घटना समोर आली आहे. सलग सहा महिने अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने भीती दाखून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. ही घटना मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यात घडली.

काय घडलं नेमकं?

पीडित मुलीची तिच्याच शेजारी राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींशी मैत्री झाली होती. या बहिणी तिला वारंवार आपल्या घरी बोलावून घेत असत. याच दरम्यान त्यांनी आपला भाऊ साहिल याच्याशी पीडितेची ओळख करून दिली आणि त्यांच्यात संवाद वाढवला. एके दिवशी या दोघी बहिणींनी पीडितेला घरी बोलावून तिला खोलीत एकटे सोडून बाहेरून कडी लावून घेतली. याच संधीचा फायदा घेत साहिलने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले आणि कोणाला सांगितल्यास बदनाम करण्याची धमकी दिली.

Fire News: नोएडामधील फॅक्टरीला भीषण आग; श्वास गुदमरला अन्…; तब्बल 250 कर्मचाऱ्यांसोबत घडले काय?

कसा आला प्रकरण समोर

या धमकीला घाबरून पीडितेने कोणालाही काही सांगितले नाही, ज्याचा फायदा घेत आरोपी साहिल गेल्या सहा महिन्यांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. दरम्यान, मुलीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णलयात नेले असता,ती गर्भवती असल्याचे समजताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता, पीडितेने घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पीडितेच्या पालकांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून आरोपी साहिल आणि त्याला मदत करणाऱ्या त्याच्या दोन बहिणींविरुद्ध तक्रार दाखल केली. रौन पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, फरार झालेल्या मुख्य आरोपी साहिलच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनीही घेतली धाव

या प्रकरणात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेत पीडितेच्या कुटुंबाला पाठिंबा दिला. दलित समाजातील मुलींना लक्ष्य करून अशा प्रकारे फसवणुकीच्या घटना घडत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

उंब्रज परिसरात तब्बल 25 लाखांचा लाकूड साठा जप्त; सातारा वनविभागाचे चार ठिकाणी छापे

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना मध्यरप्रदेश मधील भिंड जिल्ह्यात घडली.

  • Que: अत्याचाराचा प्रकार कसा उघड झाला?

    Ans: मुलीच्या पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समजले आणि त्यानंतर प्रकरण उघड झाले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी आरोपी साहिल आणि त्याला मदत करणाऱ्या त्याच्या दोन बहिणींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Madhya pradesh crime outrageous eighth grade student becomes pregnant abuse continued for a staggering six months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.