नोएडामध्ये फॅक्टरीला आग (फोटो- ai gemini)
नोएडामधील फॅक्टरीला भीषण आग
इलेक्ट्रॉनिक मीटर तयार करणाऱ्या कंपनीत घटना
250 कर्मचाऱ्यांचे प्राण संकटात
Noida Fire: उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. दरम्यान नोएडामधील सेक्टर 4 परिसरात एका इलेक्ट्रॉनिक मीटर तयार करणाऱ्या फॅक्टरीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. क्षणार्धात आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले. फॅक्टरीमध्ये खळबळ उडाली.
आज सकाळी सुमारे 200 ते 250 कर्मचारी त्यांची नाइट शिफ्ट संपवून घरी जाण्याच्या तयारीत होते. मात्र त्यांच्यासाठी आजची पाहत भीषण ठरली. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसर हडरून गेला. धुराचे लोट, आणि आग एवढ्या वेगाने पसरल्याने नेमके काय झाले आहे हे कोणालाच काळात नव्हते.
आग लागल्याने फॅक्टरीमध्ये धुराचे लोट पसरले. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ लागली. धुराचे लोपट इतके होते की कर्मचार्यना बाहेर पडण्याचा रास्ता सापडण्यास कठीण जात होते. अनेक कर्मचाऱ्यांची एकमेकांमध्येच टक्कर झाली. यामध्ये अनेक जखमी झाले. जवळपास 32 कर्मचाऱ्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Satara News: सोनगाव कचरा डेपोला भीषण आग; धुराच्या लोटामुळे नागरिक हैराण, ठोस उपाययोजनांची मागणी
काही कर्मचाऱ्यांची स्थिती नाजुक असल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार केले जात आहेत. काही जणांचे उपचार जनरल वॉर्डमध्ये सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर एक मोठे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी कर्मचाऱ्यांना सुखरूपणे बाहेर काढले.
केमिकल कंपनी आगीच्या विळख्यात
अंबरनाथमधून एक मोठी बातमी समोर आली. अंबरनाथ एमआयडिसीमध्ये भीषण आग लागली. केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एकापाठोपाठ अनेक कंपन्या आगीच्या विळख्यात अडकल्याचे समोर येत आहे. अंबरनाथ मधील आनंद नगर येथील एमआयडिसीमध्ये आगीची घटना घडली. आग एवढी भीषण होती की तिचे लोट आकाशात लांबून दिसून येत होते. धुराचे लोट मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. आगीने रौद्ररूप धरण केल्याचे दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने दाखल झाले.
Ambernath Fire: अंबरनाथमध्ये केमिकल कंपनी आगीच्या विळख्यात; एक नव्हे तर तब्बल…
केमिकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आग जवळील रस्त्यावर देखील पसरल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे रस्ता देखील पेटला असल्याचे समोर येत आहे. अग्निशमन दल आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे.






