Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhyapradesh Crime: कॅमेऱ्यासमोर अश्रू, दरोड्याची खोटी कहाणी; मात्र एक ट्विस्ट आणि हत्येचा बनाव उघड, काय नेमकं प्रकरण?

चित्रपटालाही लाजवेल अशी घटना समोर आली आहे. पतीच्या हत्येनंतर कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडणारी पत्नी, पण तपासात समोर आला असा ट्विस्ट की पोलिसही हादरले. प्रियकरासोबत सुपारी देऊन पतीची हत्या केल्याचे उघड झाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 11, 2026 | 08:36 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पत्नीने दरोड्याचा खोटा बनाव करून पोलिसांची दिशाभूल
  • प्रियकरासोबत कट रचून सुपारी देऊन पतीची हत्या
  • तपासात सत्य उघड; सर्व आरोपी अटकेत
मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथून एका चित्रपटालाही लाजवेल अशी घटना समोर आली आहे. एक महिला आपल्या पतीची हत्या झाल्यांनतर कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडली. तिने नवऱ्याची हत्या कशी झाली, दरोडेखोरांनी कसे तिला लुटले हे तिने कॅमेऱ्यासमोर सगळ्यांना सांगितले. हे वर्णन ऐकत असतांना उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. मात्र एक ट्विस्ट आणि कॅमेऱ्यासमोरील अश्रू खोटे ठरले. घडलेली घटना मध्यप्रदेश येथील आहे. नेमकं काय प्रकरण आहे. जाणून घ्या.

Ashok Kharat Case : रुपाली चाकणकर चौकशीला पुन्हा गैरहजर; आता पोलिसांनी बहिणीलाच बजावली नोटीस

काय नेमकं प्रकरण?

प्रियांका पुरोहित असे या प्रकरणातील मास्टरमाइंड महिलेचा नाव आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये ती आपल्या पतीच्या मृत्यूचा थरार सांगतांना दिसत आहे. ती सांगते की, काही सशस्त्र दरोडेखोर घरात घुसले, त्यांनी माझं तोंड दाबलं आणि कपाटातील दागिने-रोख रक्कम मागितली. मी ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी पतीला मारण्याची धमकी दिली. माझे हात-पाय बांधले आणि माझ्या समोरच पतीवर हल्ला चढवला. एवढेच नाही तर दरोडेखोरांनी 3.5 लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. ही माहिती तिने अशापद्धतीने सांगितली की कोणालाही तिच्यावर संशय आला नाही.

Priyanka Purohit from Dhar, MP, faked a robbery: tied up with husband, claimed looters killed him & stole valuables. Police found items hidden in her room. She conspired with lover, paid ₹1L to contract killer. Oscar-level acting in tears, busted in hours. Pure evil😡 pic.twitter.com/mWhbF9FuiR — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 9, 2026

घरातच आढळले दागिने

पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत तपासाला सुरुवात केली. 7 एप्रिलच्या रात्री 28 वर्षांचे मसाले व्यापारी देवकृष्ण पुरोहित यांची त्यांच्या राहत्या घरात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी दरोड्याचा तपास करायला सुरुवात केली. पोलिसांनी जेव्हा घराची झडती घेतली, तेव्हा प्रियांकाने चोरीला गेल्याचे सांगितलेले सर्व दागिने घरातच लपवून ठेवलेले आढळले. यावरून पोलिसांना तिच्यावर संशय आला आणि या प्रकरणाचा उलगडा झाला.

प्रियांकाचे प्रेमसंबंध त्यातून हत्येची सुपारी

प्रियांकाचे कमलेश नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. या दोघांनी मिळून देवकृष्ण यांना वाटेतून हटवण्याचा कट रचला होता. प्रियंकाने आपल्या पतीची हत्या करण्यासाठी सुरेंद्र भाटी नावाच्या एका कंत्राटी मारेकऱ्याला १ लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यापैकी 50,000 रुपये तिने आगाऊ दिले होते. हत्येच्या रात्री प्रियांकाने घराचे मुख्य दार मुद्दाम उघडे ठेवले होते. देवकृष्ण झोपेत असताना मारेकऱ्याने घरात शिरून त्यांच्यावर वार केले. हा गुन्हा दरोडा वाटावा म्हणून प्रियांकाने स्वतःच घरातील सामानाची उचकापाचक केली होती.

तू दिसायला काळा आहेस…

देवकृष्ण यांच्या बहिणीने, प्रियांकावर मानसिक त्रास दिल्याचे आरोप केले आहेत. तिने सांगितले की प्रियांका सतत देवकृष्ण यांचा अपमान करायची. तू दिसायला काळा आहेस, तू माझ्या लायकीचा नाहीस, मला तुझ्यापेक्षा चांगला जोडीदार मिळू शकतो, असे बोलून ती देवकृष्णला मानसिक त्रास द्यायची. 2010 पासूनच प्रियांकाचे कोणाशी तरी संबंध असल्याचा संशय कुटुंबाला होता. ती सतत फोनवर व्यस्त असायची आणि पतीशी भांडण करायची.

आरोपींना फाशीची शिक्षा….

आता देवकृष्ण यांच्या वृद्ध आईने आपल्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस सखोल तपास करत आहे.

पीक कर्ज मंजुरीसाठी लाचं घेण भोवलं; सोसायटीच्या सचिवाला एसीबीने रंगेहात पकडले

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुरुवातीला काय सांगितले गेले होते?

    Ans: पत्नीने दरोडेखोरांनी पतीची हत्या केल्याची खोटी माहिती दिली.

  • Que: तपासात काय उघड झाले?

    Ans: पत्नीने प्रियकरासोबत मिळून सुपारी देऊन पतीचा खून केल्याचे समोर आले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: सर्व आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Madhya pradesh crime tears on camera a fabricated tale of robberybut a single twist exposes the murder conspiracy what exactly is the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 08:36 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bihar Crime: आईचा मृतदेह सापडला… 10 दिवसांनी 100 मीटरवरून आला दुर्गंध; पुढे जे समोर आलं ते हादरवणारं
1

Bihar Crime: आईचा मृतदेह सापडला… 10 दिवसांनी 100 मीटरवरून आला दुर्गंध; पुढे जे समोर आलं ते हादरवणारं

Amravati Crime: बापट चौकात 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; अवघ्या दोन तासांत दोन संशयित ताब्यात
2

Amravati Crime: बापट चौकात 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; अवघ्या दोन तासांत दोन संशयित ताब्यात

Madhyapradesh Crime: पाण्याच्या ड्रममध्ये सापडला 5 दिवसांच्या चिमुकलीचा मृतदेह, तपासात आईच निघाली आरोपी; कारण धक्कादायक
3

Madhyapradesh Crime: पाण्याच्या ड्रममध्ये सापडला 5 दिवसांच्या चिमुकलीचा मृतदेह, तपासात आईच निघाली आरोपी; कारण धक्कादायक

Uttarpradesh Crime: चुलत भाऊ-बहिण असल्याने घरच्यांचा विरोध झुगारून केलं लग्न; अवघ्या तीन महिन्यांतच नवविवाहित दांपत्याचा करुण अंत
4

Uttarpradesh Crime: चुलत भाऊ-बहिण असल्याने घरच्यांचा विरोध झुगारून केलं लग्न; अवघ्या तीन महिन्यांतच नवविवाहित दांपत्याचा करुण अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.