संग्रहित फोटो
पुणे : नवीन पीक कर्ज मंजूर केल्यावरून मोबदला म्हणून एक हजारांची लाच घेणाऱ्या इंदापूरमधील पंधरवाडी येथील जयभवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. नाना चंद्रकांत बोराटे (वय ४३, रा. मु. पो. गोकळी, ता. इंदापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत ३४ वर्षीय शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार दिली आहे.
तक्रारदारांची वडीलोपार्जीत शेती आहे. जमिनीवर असलेले जिल्हा सहकारी बँकेचे जुने पीक कर्ज २४ मार्च २०२६ रोजी त्यांनी भरले होते. नंतर त्यांनी पंधारवाडी येथील जयभवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा बँकेकडे प्रस्ताव सादर केला होता. या सहकारी सोसायटीत बोराटे सचिव म्हणून नोकरी आहे. तक्रारदार हे नवीन पीक कर्जाच्या प्रस्तावाबाबत बोराटेला इंदापूर येथील वडापुरी येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे भेटले. यावेळी बोरोटेने तक्रारदार यांना २ लाख ७६ हजार पीक मंजूर झाले असल्याचे सांगताना त्या बदल्यात २ हजारांची लाच मागितली.
याबाबत तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार दिली होती. एसीबीने याची पडताळणी झाली. नंतर ९ एप्रिल रोजी बोराटेला १ हजारांची लाच घेताना पंधारवाडी येथील सहकारी सोसायटीच्या आवारात रंगेहात पकडले. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या पथकाने केली आहे.
पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत
गेल्या काही दिवसाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस खात्यातील अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत ९५ हजार रुपये स्वीकारतांना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल ३०६ अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी लाचेची मागणी केली होती. २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी नंतर ९५ हजार रुपये रक्कम घेण्याचे पोलिसांनी मान्य केले होते. मात्र, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. एसीबीने धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व एका महिला अंमलदार लोखंडे यांना ताब्यात घेतले.






