Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhyapradesh: एमपीत धक्कादायक घटना! वसतिगृहातील नववीच्या विद्यार्थिनीने उचलला टोकाचा पाऊल; कारण काय?

मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील निवाली येथील एकलव्य आदर्श निवासी वसतिगृहात नववीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीने स्टोअर रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप करत कुटुंबीयांनी आंदोलन केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 16, 2026 | 10:13 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नववीत शिकणारी आदिवासी विद्यार्थिनी अश्विनी रावतालेची आत्महत्या
  • मोबाईलवर बोलल्यामुळे वरिष्ठ विद्यार्थिनींकडून दबाव आल्याचा संशय
  • कुटुंबीयांचे वसतिगृह प्रशासनावर गंभीर आरोप, चौकशीचे आदेश
मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना बडवाणी जिल्ह्यातील निवाली एकलव्य आदर्श शासकीय निवासी वसतिगृहात मंगळवारी घडली. विद्यार्थिनीने स्टोअर रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी वसतिगृह प्रशासनावर गंभीर दुर्लक्ष आणि मानसिक दबाव टाकल्याचे आरोप करत कडक कारवाईची मागणी केली आहे.

भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; समर्थकही जखमी, कारण काय तर…

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव अश्विनी रावताले असे आहे. ती पानसेमल तालुक्यातील गोंगवाडा गावची रहिवासी आहे. ती निवाली येथील एकलव्य आदर्श निवासी शासकीय वसतिगृहात नववीत शिक्षण घेत होती. मंगळवारी रात्री अश्विनी ही वसतिगृहातील बाथरूममध्ये कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होती. तेव्हा काही वरिष्ठ विद्यार्थिनींनी तिला पाहिले. त्यांनी ही बाब व्यवस्थापकाकडे सांगण्याची धमकी दिल्याचे सांगितले जाते. यामुळे अश्विनी घाबरली. तिने आपला मोबाइल फोन फेकून दिला आणि खोलीत जाण्याऐवजी जवळच असलेल्या स्टोअर रूममध्ये जाऊन तिने गळफास घेत आत्महत्या केली.

ही घटना कशी उघडकीस आली

अश्विनी ही जेवण करण्यासाठी आली नाही म्हणून तिच्या रूममेटने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी ती स्टोअर रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तातडीने व्यवस्थापकाला याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला.

पोलिसांनी विद्यार्थिनीचा मोबाईल फोन ताब्यात घेतला असून त्याची तपासणी सुरु आहे. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यास नकार दिला आहे. त्यांनी वसतिगृह परिसरात जोरदार आंदोलन केले. वसतिगृह व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला जात आहे. प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.

Vrindavan Crime: व्हीआयपी दर्शनाचं आमिष, महिलांना हॉटेलवर नेऊन अत्याचार, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील निवाली येथील एकलव्य आदर्श निवासी वसतिगृहात.

  • Que: आत्महत्येचं प्राथमिक कारण काय सांगितलं जात आहे?

    Ans: मोबाईलवर बोलल्यामुळे तक्रार होईल या भीतीने आलेला मानसिक दबाव.

  • Que: प्रशासनाने काय पावलं उचलली आहेत?

    Ans: पोलिस तपास सुरू असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Madhya pradesh shocking incident in mp a ninth grade student at a hostel took an extreme step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या
1

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?
2

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना
3

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला
4

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.