सौजन्य - सोशल मिडीया
तुषार हंबीर याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे, गर्दी, मारामारी, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुरंदर तालुक्यातील कापूरहोळ ते नारायणपूर रस्त्यावर ३ मार्च २०२६ रोजी दुपारी ही घटना घडली होती. याबाबत व्यावसायिकाने राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
व्यावसायिकाचे कापूरहोळ येथे मद्य विक्री दुकान आणि उपाहारगृह आहे. त्यांचा मुलगा दुपारी दुचाकीवरून उपाहारगृहातून घरी निघाला होता. त्यावेळी मोटारीतून आलेल्या पाच ते सहा जणांनी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण केले. याबाबतची माहिती व्यावसायिकाला मिळाली. त्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी शिरवळपर्यंत कारचा पाठलाग केला. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पुरंदर तालुक्यातील पिसुर्डी येथे व्यावसायिकाचा मुलाला सोडून देण्यात आल्याचे समजले.
पोलिसांनी व्यावसायिकाच्या मुलाची चौकशी केली, तेव्हा त्याने सांगितले की, कारमधून आलेल्या पाच ते सहा जणांनी अपहरण केले. कारमध्ये त्यांनी धमकावले. एकाने पिस्तुलाचा धाक दाखविला. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराने कोयता उगारून जिवे मारण्याची धमकी दिली. समोरून पोलिसांचे वाहन येत होते. अपहरण करणाऱ्या आरोपींनी शेतात नेले. मला रस्त्याकडेला सोडून देण्यात आले, असे त्याने सांगितले. पोलिसांनी कारचा पाठलाग केला. आरोपींची कार रस्त्याच्या कडेला उलटली. आरोपी कार तेथेच सोडून पसार झाले, अशीही माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी तपास सुरू केला. व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण तुषार हंबीर आणि साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पाच जणांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. कारवाईनंतर टोळीचा म्होरक्या हंबीर पसार झाला होता. तो हडपसरमधील फुरसुंगी भागात येणार असल्याची माहिती तपासात मिळाली. या ठिकाणी त्याला ताब्यात घेतले आहे.
Ans: हडपसरमधील गुंड तुषार नामदेव हंबीर आणि त्याच्या पाच ते सहा साथीदारांनी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण केले होते.
Ans: ३ मार्च २०२६ रोजी पुरंदर तालुक्यातील कापूरहोळ ते नारायणपूर रस्त्यावर ही घटना घडली होती.
Ans: पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने हडपसरमधील फुरसुंगी परिसरातून तुषार हंबीर याला ताब्यात घेतले. या प्रकरणात यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती.






