संग्रहित फोटो
या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास युवक त्याच्या ओळखीच्या महिलेसह इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये होते. तेथे दोघांमध्ये वाद झाले. याच वादातून युवकाने महिलेवर बंदुकीतून गोळी झाडली. घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक दिलीप टिपरसे, तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. युवकाने तेथून पळ काढल्याने पोलिस त्याचा शोध घेत होते. दरम्यान काही वेळाने या युवकाने कापूरवाडी परिसरात स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. दरम्यान, गोळीबारात जखमी झालेल्या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारातील जखमी महिलेची प्रकृती स्थिर असून युवकाने आत्महत्या केल्याचे उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांनी सांगितले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. युवक व महिला यांच्यात कोणत्या कारणावरून वाद झाला, हे अद्याप समोर आलेले नाही. अधिक तपास पोलिस करत आहेत.
एकतर्फी प्रेमातून घडली घटना
गोळीबाराची ही घटना नेमकी कशामुळे घडली, हे जरी समोर आले नसले तरी ही घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, रहिवासी भागात झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले होते.
विद्यार्थिनीवर चाकूने सपासप वार
शाळेच्या सहलीमध्ये विद्यार्थिनींचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर निर्माण झालेल्या वादाचे पर्यावसान एका अल्पवयीन विद्यार्थ्याने वर्गातील विद्यार्थीनीवर चाकू हल्ला करण्यात झाले आहे. पाच दिवसांपूर्वी झालेल्या या वादातून व्हिडिओ डिलीट करावा लागल्याने आलेल्या रागातून विद्यार्थ्याने शुक्रवारी (दि. २३) दुपारी सव्वादोनच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर प्रवेशद्वारावरच विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून बाणेर येथील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Ans: अहिल्यानगर येथील पाइपलाइन रोडवरील भगवान बाबा चौक परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये गोळीबाराची घटना घडली.
Ans: गोळीबार करणाऱ्या युवकाचे नाव योगेश डोंगरे असे होते. त्याने कापूरवाडी परिसरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
Ans: गोळीबारात जखमी झालेल्या ३५ वर्षीय महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. तिची प्रकृती स्थिर असल्याचे उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांनी सांगितले.






