Crime News Live Updates
उल्हासनगरमध्ये कौटुंबिक वादातून गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून दुसऱ्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा हिललाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईनाथ कॉलनी परिसरात घडली. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
28 Aug 2025 05:00 PM (IST)
तवडी येथे सुमारे २८ हजारांची घरफोडी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कातवडी, पोस्ट नित्रळ ता.सातारा येथे अज्ञात चोरट्याने घरातून २७ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. १० ऑगस्ट रोजी घडली आहे. याप्रकरणी लक्ष्मी रामचंद्र लोटेकर (वय ४७, रा.कातवडी) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चोरट्यांनी घरातून अंगठ्या, सोन्याची चेन असा मुद्देमाल चोरुन नेला. प्राथमिक माहितीनुसार दोन चोरटे असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.
28 Aug 2025 04:45 PM (IST)
यावर्षीचा गणेशोत्सव मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केल्याप्रमाणे ‘राज्य महोत्सव’ म्हणून अतिशय उत्साहात साजरा होत असून नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या पार्श्वभूमीवर सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन केले आहे व त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
28 Aug 2025 04:42 PM (IST)
राहत्या घरातून एक विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात वास्तव्यास असलेली २० वर्षीय विवाहिता राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. ही घटना दि. २३ ऑगस्ट रोजी घडली आहे. महिलेच्या पतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.
28 Aug 2025 04:22 PM (IST)
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते काढून त्याद्वारे इतरांना पैसे मागणाऱ्याला वडूज पोलिसांनी अटक केली आहे. वैभव पानसकर (राहणार सूर्याची वाडी, तालुका खटाव. मूळ राहणार गोकुळ तालुका खटाव) याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे
28 Aug 2025 04:05 PM (IST)
सणसवाडी (ता. शिरुर) येथील ओंकार पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या मद्यधुंद युवकांना “सिगारेट बाहेर जाऊन प्या” असे सांगितल्याचा राग मनात धरून चौघा तरुणांनी पेट्रोलपंपावरील दोन कामगारांवर कोयत्याने वार करून व काठ्यांनी मारहाण करत जीवघेणा हल्ला केला. याबाबत दयानंद इंद्रसेन सरोदे (वय ३६ रा. सणसवाडी ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अनिकेत सुनील गायकवाड (रा. वाडागाव ता. शिरुर) दत्ता अशोक सोमवंशी (रा. पेरणे फाटा ता. हवेली) अरमान मजार खान (रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर) प्रसन्ना बडे (रा. पेरणे ता. हवेली) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
28 Aug 2025 03:45 PM (IST)
गणेशोत्सव काळात कायदा-सुव्यवस्था ठेवणे तसेच गुन्हेगारी कृत्ये रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून अनेक गुन्हेगारांना शहरातून हद्दपार केले आहे. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंढे यांनी बाणेर, चतुःशृंगी, येरवडा, खराडी, वाघाली, लोणीकंद व चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २६ सराइतांना तडीपारीचे आदेश दिले आहेत. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी कात्रज भागातील तीन गुंडाना तडीपार करण्याचे आदेश दिले.
28 Aug 2025 03:30 PM (IST)
उत्तरप्रदेशच्या एटामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आई बाबा बाहेर गेले म्हणून १६ वर्षाच्या मुलीने प्रियकराला घरी बोलावलं. त्याचवेळी मुलीचा धाकटा भाऊ तिथे आला आणि त्याने बहिणीला नको त्या अवस्थेत पाहिलं. आपल्या धाकट्या भावाने अश्या अवस्थेत पाहिलं हे पाहून मुलगी गोंधळून गेली. तिने प्रियकराच्या मदतीने भावाची हत्या केली.
28 Aug 2025 03:10 PM (IST)
एका महिलेला एक फोन आला आणि महिलेच्या कानावर पडलेल्या त्या तीन शब्दांमुळे महिलेचं निधन झालं. फोनवर बोलणं झाल्यानंतर महिला ढसाढसा रडू लागली. अश्यात तिच्या आईने काय झालं विचारलं तेव्हा महिला म्हणाली, ‘नवऱ्याच्या फोनवरून एक महिलेने फोन केला आणि मला म्हणाली तुझी सवत बोलतेय…’ हे तीन शब्द ऐकताच महिलेला उचकी आली आणि तिने चालत्या बसमध्येच आपले प्राण सोडले. मृतकाचे नाव रिता असं आहे. या घटनेने महिलेच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना दिल्ली येथील हरदोई येथे घडली आहे.
28 Aug 2025 03:05 PM (IST)
कल्याण परिमंडळ कल्याण परिमंडळ 3 च्या पथकाने तब्बल 1800 किमी प्रवास करून आंतरराज्य गांजा तस्कर रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी तब्बल 22 दिवस जंगलात मोहीम राबवत 13 तस्करांना बेड्या ठोकल्या आहे. त्यांच्या ताब्यातून 115 किलो गांजा जप्त करण्या आला आहे. त्याची किंमत अंदाजे 70 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे जंगलात मोबाईल नेटवर्क नसल्याने ही टोळी वॉकी-टॉकीचा वापर करत तस्करी करत होती.
28 Aug 2025 02:40 PM (IST)
मध्यप्रदेशमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. भोपाळच्या ७ विच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली. वही हरवल्याने तिचे बाबा तिच्यावर खूप ओरडले होते. त्यानांतर तिने हे पाऊल उचलले आहे. ही घटना कटारा हिल्स पोलीस ठाणे हद्दीतील ग्लोबल पार्क सिटीची आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवले आहे.
28 Aug 2025 02:20 PM (IST)
बीड जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. जागेच्या वादातून मायलेकीसह तिघींवर लोखंडी पाईप व रॉडने बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना चऱ्हाटा या गावात घडली आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्याने लोखंडी पाईप आणि रॉडने अमानुष मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
28 Aug 2025 02:00 PM (IST)
छत्तीसगड येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका तरुणाने आपल्या आईची कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. त्याने खूप वेडा वार केल्याने आईचे तुकडे- तुकडे झाले होते. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर तो मृतदेहाजवळ कुऱ्हाड हातात घेऊन बसला आणि गाणी गात होता. काही वेळाने मातीशी तो खेळू लागला. आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी आरोपीला अथक प्रयत्नानंतर अटक केले आहे.
28 Aug 2025 01:40 PM (IST)
गडचिरोलीत नक्षलवाद्यां विरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून गडचिरोलीत चार नस्खलवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यात तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. यावेळी पोलिसांना शस्त्रसाठा सापडला असून अजूनही चकमक सुरु आहे. ही कारवाई भामरागड तालुक्यातील कोपर्शीच्या जंगलात सुरु आहे.
28 Aug 2025 01:20 PM (IST)
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याने आधी स्वतःच्या ४ वर्षाच्या मुलाचा जीव घेतला नंतर दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जबाजारीपणातून या व्यापारी दाम्पत्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं. त्यांनी मुलाला विषारी पदार्थ खायला दिला आणि गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवली असून घटनास्थळी त्यांना एक सुसाईड नोट भेटली.
28 Aug 2025 01:05 PM (IST)
जर्मनीत हॉटेल व्यावसायात गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने ५४ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण कुमार त्रिवेदी (रा. कांताकुंज, गुजरात), चंद्रेश त्रिवेदी, जानव्ही चंद्रेश त्रिवेदी (दोघेही रा. साल्सबर्गर स्ट्रिट, जर्मनी), निती पांडेय, तृप्ती नितीन पांडेय (२८, दोघेही रा. वल्लभनगर, इंदोर, मध्यप्रदेश) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत हरदीपसिंग अमोलकसिंग होरा (५४, रा. सायकल मर्चंट हौंसिंग सोसायटी, रास्तापेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२४ ते २० मे २०२५ दरम्यान घडला.
28 Aug 2025 12:42 PM (IST)
पुणे शहरातील नामांकित हॉटेल 'पीकॉक गार्डन अँड रेस्टॉरंट'चे मालक संतोष शेट्टी (४५) यांचा त्यांच्याच हॉटेलातील कामगार याने रागाच्या भरात खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २६) रात्री उशिरा घडली. किचनमधला चाकू आणत तो अचानक त्यांच्या पोटात घुपसून व वारकरून खून केला. बेसावध असल्याचे पाहून त्याने वार केले. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी कामगार उमेश दिलीप गिरी (३९) याला ताब्यात घेतले आहे.
28 Aug 2025 12:22 PM (IST)
मध्यभागातील म्हणजेच खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलिस ठाण्यांच्या हद्दीत २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात दारू आणि वाईन शॉपीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश देखील पारित केले होते. मात्र, निवडक दारूबंदीविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करत उच्च न्यायालयाने हा आदेश फेटाळत स्थगिती दिली. त्यामुळे आता मध्यवर्ती भागातील दुकाने पूर्ण दहा दिवस बंद राहणार नाहीत. त्यानूसार सुधारित आदेश काढण्यात आला आहे.
28 Aug 2025 11:51 AM (IST)
बीडच्या अंबाजोगाई येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अंबाजोगाईतील साखर कारखाना रोडवरील हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. तरुणाची डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली असून, मृत तरुणाचे नाव अविनाश शंकर देवकर (रा. रायगड नगर, अंबाजोगाई) असे आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी पसार झाले आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
28 Aug 2025 11:31 AM (IST)
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे राहुल गांधी यांनी मतदान प्रक्रियेवर गंभीर आरोप केले होते. नागरिकांनी केलेलं मतदान मतमोजणी प्रक्रियेदरम्यान चोरीला जात असल्याच्या राहुल गांधीच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप देखील पाहायला मिळाले आहेत. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंब्र्यातील गणेशघाट खाडीपरिसरात मोठ्या संख्येने मतदान कार्ड फेकलेले आढळून आले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने साफसफाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना एका पिशवीत जास्तीच्या संख्येने मतदान कार्ड फेकल्याचं आढळून आलं. या प्रकरणा ने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान कार्ड का फेकली आणि हे नेमकं कोणी केलं याबाबत अद्यापतरी ठोस माहिती नाही.