Chandrapur Accident: भरधाव वेगाने ट्रक आला आणि रिक्षाला थेट...; 4 जण ठार तर 3 गंभीर जखमी
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. एका ट्रकने रिक्षाला धडक दिली आहे. यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रक व रिक्षाचा हा भीषण अपघात राजुरा तालुक्यात घडला आहे. जखमी लोकांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यात हा भीषण अपघात घडला आहे. एक ट्रक राजुरा येथील पाचगाव येथे जात होता. तर रिक्षा समोरच्या दिशेने येत होती. दरम्यान समोरून येणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेला येणाऱ्या रिक्षाला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये रिक्षातील टीन जणांचा मृत्यू झाला आहे.
व्यापाऱ्यास समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी लुटलं
मुंबईतील सराफा व्यापाऱ्यास समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी लुटल्याचे सामोर आले आहे. पावणे पाच किलो सोन्यासह रोक रक्कम घेऊन पसार झाल्याचे समोर आले आहे. शेषमलजी जैन असे सराफा व्यापाऱ्याचे नाव आहे. ही घटना काल (22 ऑगस्ट) सायंकाळी खामगाव येथे घडली आहे. नेमकं काय घडलं?
मुंबईतील शेषमलजी जैन हे सराफा व्यापारी खामगाव येथे व्यापारासाठी आले होते. काल (22 ऑगस्ट) सायंकाळी ते खामगाव येथून मुंबईकडे जात असताना मेहकर टोल नाक्यानंतर समृद्धी महामार्गावर त्यांच्या वाहन चालकाने कार थांबवून…मला फ्रेश व्हायचं…, असं म्हणत समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला कार थांबवली. त्यानंतर लगेचच मागून एका चार चाकी वाहनाने आलेल्या चार दरोडेखोरांनी कारमध्ये बसलेल्या शेषमलजी जैन यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्या कारमधील साडेचार ते पावणे पाच किलो सोने असलेली बॅग व रोकड घेऊन हे दरोडेखोर फरार झाले.
त्यांचा कारचालक सुद्धा दरोडेखोरांच्या वाहनात बसून फरार झाला. तात्काळ मेहकर पोलिसांनी घटनास्थळ गाठत जखमी व्यापाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली असता दरोडेखोरांची कार ही अकोला जिल्ह्यातील पातुर जवळ आढळली. मात्र दरोडेखोर हे पसार झाले होते. या प्रकरणी मेहकर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. अलीकडेच समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण कमी झालं असलं तरी मात्र वाहनांवर दगडफेक वाहन लुटीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग चर्चेत आला आहे.