Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेवराई हादरलं! आईने दोन वर्षीय चिमुकलीसह स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला

Crime News Live Updates Marathi : आज दिनांक 19 - 08- 2025 रोजी देश-विदेशासह राज्यातील गुन्हेगारी संदर्भातल्या ताज्या घडामोडींचे अपडेट वाचा फक्त एका क्लिकवर...

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 19, 2025 | 02:20 PM
LIVE
Crime News Live Updates

Crime News Live Updates

Follow Us
Close
Follow Us:
  • 19 Aug 2025 02:40 PM (IST)

    19 Aug 2025 02:40 PM (IST)

    मध्यरात्री भीषण अपघात;५ जणांचा मृत्यू

    अपघात हा चिपळूण कराड मार्गावर झाला आहे. तिहेरी अपघातात ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गॅस वाहून नेणाऱ्या ट्रकवर रिक्षा आणि थार जोरदार आढळल्या. यामध्ये रिक्षातील चार तर थार मधील एकाच जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री उशिरा घडली आहे. भरधाव थार चालकाच्या चुकीमुळे रिक्षामधील प्रवाश्यांचा जीव गेला आहे. मृतांमध्ये एका लहान बाळाचा समावेश आहे, थार कारसह रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

  • 19 Aug 2025 02:20 PM (IST)

    19 Aug 2025 02:20 PM (IST)

    सिमेंट मिक्सरच्या खाली चिरडून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

    पुण्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. सिमेंट मिक्सरच्या खाली चिरडून एका ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर तिची आई गंभीर जखमी झाली आहे. जड वाहनांना मनाई असलेल्या वेळेत बेदरकार मिक्सर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 12ऑगस्ट) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हिंजवडी, फेज 2 येथील इन्फोसिस सर्कलजवळ घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

  • 19 Aug 2025 02:00 PM (IST)

    19 Aug 2025 02:00 PM (IST)

    नांदेडमध्ये दोन महिलांचे मृतदेह सापडले

    नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ गावातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. गंगाबाई मादळे आणि भीमाबाई मादळे यांचे मृतदेह सापडले आहे. अन्य चार ते पाच जणांचा शोध सुरू आहे.

  • 19 Aug 2025 01:40 PM (IST)

    19 Aug 2025 01:40 PM (IST)

    परळीत नदीपात्रात कारसह चौघे वाहून गेले

    परळी हुडा कौडगाव येथील पुलावरून जात असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने फॉर व्हीलर गाडी पुलावरून नदीच्या पात्रात वाहून गेली. रात्री एक वाजताच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की दिग्रस येथील काही तरुण गाडीमधून जात असतांना कवडगाव हुडा येथे पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले आहेत. पाण्याचा अंदाज नसतानाही पोहण्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे पोलिस मार्ग काढत रिक्षा घेऊन पाण्यात उतरले. दोर वापरून युवकांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

  • 19 Aug 2025 01:20 PM (IST)

    19 Aug 2025 01:20 PM (IST)

    लग्नाला नकार देताच प्रेयसीने काढला काटा

    छत्रपती संभाजीनगर शहराच्या हर्सूलमधून एक थरारक घटना समोर आली आहे. ३१ जुलैला बेपत्ता झालेल्या छावा संघनटनेचा शहर प्रमुख सचिन पुंडलिक औताडे यांचा प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कॅनॉट भागात त्यांच्या प्रेयसीने तिच्या मामेभावाच्या मदतीने सचिन यांचा काटा काढला. गळा चिरून हत्या केली त्यानंतर मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिला. वाहत गेलेला हा मृतदेह मुंगी गावात येथे तरंगत काठावर आला आहे. त्यानंतर हा हत्याकांड समोर आला आहे.

  • 19 Aug 2025 01:05 PM (IST)

    19 Aug 2025 01:05 PM (IST)

    पीएमपी बसमध्ये चोरीच्या घटना सुरुच

    पुणे शहरात पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा तसेच बसमध्ये बसताना प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटना सुरूच असून, कर्वे रोड परिसरात पीएमपी बस थांब्यावर बसमध्ये चढताना ज्येष्ट महिलेकडील ६० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ६६ वर्षीय महिलेच्या ६९ वर्षीय पतीने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार, अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

  • 19 Aug 2025 12:50 PM (IST)

    19 Aug 2025 12:50 PM (IST)

    वालचंदनगरमघील भाळे टोळीवर ‘मोक्का’ कारवाई

    वालचंदनगर भागात दहशत माजविणारा तसेच ग्रामीण भागातील कुख्यात गुंड राजू भाळे याच्यासह १३ जणांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोक्का (महाराष्ट्र संघटित गुनहेगारी नियंत्रण कायदा) कारवाई केली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी हे आदेश दिले आहेत. पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस कर्मचारी महेश बनकर, अभिजित कळसकर यांनी ही कारवाई केली आहे. खोरोचीतील कुख्यात गुन्हेगार राजू भाळे आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी उत्तम जाधव यांचा खून केला होता. या खुन प्रकरणात राजू भाळे याच्यासह १० जणांना अटक केली. त्यांच्याबरोबर असलेले तीन साथीदार पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

  • 19 Aug 2025 12:30 PM (IST)

    19 Aug 2025 12:30 PM (IST)

    पीडित तरुणींवरच गुन्हा दाखल

    1 ऑगस्टला हा सगळा प्रकार समोर आला होता. कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप मुलींनी केला होता. तुम्ही किती मुलांसोबत झोपलात? तुम्ही लेस्बिअन आहात का ? अशा घाणेरड्या शब्दात पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून या मुलींना प्रश्न विचारले होते, असा आरोप तीन मुलींनी केला होता. याप्रकरणी या मुली आणि त्यांचे काही सहकारी आक्रमक झाल्याच पाहायला मिळालं होत. आणि त्यांनी थेट पोलिसांकडेच दाद मागायला सुरुवात केली. मात्र पोलिसांकडनं कोणतीही दाद मिळत नसल्याचा आरोप देखील याच मुलींच्या सहकाऱ्यांनी केला होता. ऊलट त्या तीन तरुणींवरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 19 Aug 2025 12:10 PM (IST)

    19 Aug 2025 12:10 PM (IST)

    महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला

    पुणे जिल्ह्यातून एक घटना समोर आली आहे. महिंद्रा कंपनीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कामगारांमध्ये मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी कोयत्यानेही हल्ला केला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सोहेल चुन्ना खान (३७, रा. आकुर्डी) यांच्या तक्रारीवरून सुरज सरोदे (२५), प्रतीक उबाळे (२३), अंशु रोकडे (२२) आणि प्रथमेश (२५, सर्व रा. घरकुल, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

  • 19 Aug 2025 11:53 AM (IST)

    19 Aug 2025 11:53 AM (IST)

    पुण्यात एकाला दगडाने मारहाण

    पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्लॉटमध्ये टाकलेला राडारोडा काढण्यास सांगितल्यावरून दगडाने व लाकडी बांबुने एकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रघुनाथ ढोकले (४५, रा. करंदीता, शिरूर, जि. पुणे) व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश मोहन खुटवड (४०, रा. मु. पो. टाकळी भिमा, ता. दौंड, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार वाघोली बकोरी रोड येथील श्रीरामचंद्र व्हिला जवळ घडला आहे.

बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. पती-पत्नीच्या वादात आईने दोन वर्षीय मुलीचा दोरीने गळा आवळून स्वतः आत्महत्या केलीय. हि घटना गेवराई तालुक्यातील मालेगाव मजरा या गावात उघडकीस आली असून मायलेकीच्या मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोबतच या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

Web Title: Maharashtra crime news in marathi live updates beed murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 11:52 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case
  • Sucide News

संबंधित बातम्या

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…
1

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…

पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; दारूची बाटली डोक्यात घातली अन्…
2

पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; दारूची बाटली डोक्यात घातली अन्…

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…
3

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…

मुंढव्यात राडा, हॉटेल मालकासह पब बॉईज अन् रहिवशांमध्ये वाद; नेमकं काय घडल?
4

मुंढव्यात राडा, हॉटेल मालकासह पब बॉईज अन् रहिवशांमध्ये वाद; नेमकं काय घडल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.