Crime News Live Updates
माढा तालुक्यातील मुंगशी गावात सीना नदीच्या पात्रातून जेसीबीद्वारे वाळू उत्खनन सुरु होते. या ठिकाणी एक टाटा टिप्पर, दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाहनाने उत्खनन करुन वाहतूक करत असताना तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने धोका पत्करुन पकडले. यावेळी वाहने पकडू नयेत म्हणून वाळू माफियाने काळ्या स्क्रारपिओ गाडीने तहसीलदारांच्या गाडीला पाठीमागून धक्का देऊन रिव्हर्स गाडी चालवून कारवाईसाठी पुढं जाण्यास अडथळा निर्माण केल्याचा धक्कादायक पेरकैर उघडकीस आला आहे. यावेळी या वाळू माफियाने तहसीलदारासह ,मंडळ अधिकारी, तलाठी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत कुर्डूवाडी पोलिसांत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला असून स्वप्नील कांबळेसह जेसीबी-टॅकट्रर चालकांवर गुन्हा नोंद झाला आहे.
10 Aug 2025 05:31 PM (IST)
पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव बसने धडक दिल्याने कारमधील पती-पत्नी जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (७ ऑगस्ट) दुपारी लांडेवाडी भोसरी येथे घडली. याप्रकरणी रामचंद्र बापू शिंदे (५२, बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यंकटेश सायलु कोरोमणी (६०, घोरपडी पेठ, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी त्यांच्या कारने (एमएच ४३/ए ९४९२) घरी जात होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील बस (एमएच ४३/एचओ ०४८४) भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवून फिर्यादीच्या गाडीला मागून धडक दिली. यामुळे फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला दुखापत झाली तसेच त्यांच्या गाडीचे नुकसान झाले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
10 Aug 2025 05:31 PM (IST)
एका घरातून १ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (७ ऑगस्ट) पहाटे आळंदी येथील ज्ञानदेवी नगर येथे घडली. सचिन भीमराव बागल (२४, आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अमरसिंह रामभाऊ शेळके (२५, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन याने फिर्यादी अमरसिंह यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून ८९ हजार रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा आयफोन, १८ हजार रुपयांचा इन्फिनिक्स हॉट ११ एस फोन आणि १६ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी सचिन याला अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
10 Aug 2025 05:20 PM (IST)
अंडाभुर्जीच्या हातगाडी जवळ झोपलेल्या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (६ ऑगस्ट) रात्री चाकण येथील आंबेठाण चौकातील एच के अंडाभुर्जी हातगाडीवर घडली. याप्रकरणी अविनाश विजय धोत्रे (वय१९, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रवीण अशोक प्रधान (वय१९, चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश हे आंबेठाण चौकातील एका अंडा भुर्जीच्या गाडीजवळ लोखंडी बाकड्यावर झोपले होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या तोंडावर हाताने झापड मारली आणि डोक्यात फायबरच्या स्टूलने मारहाण करून त्यांना जखमी केले. चाकण पोलीस तपास करत आहेत.
10 Aug 2025 05:00 PM (IST)
कराड शहरातील विद्यानगर/सैदापूर परिसरात पहाटे मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला भरवस्तीमध्ये लुटणाऱ्या दोन चोरट्यांना कराड शहर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र आणि मोटारसायकल असा एकूण १.२० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यातील एकाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अन्य एकजण अल्पवयीन असल्याने समज देऊन त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
10 Aug 2025 04:40 PM (IST)
साताऱ्यातील कृष्णानगर येथील शिवशक्ती स्टील ॲण्ड टिंबर्स व भैरव स्टील ॲण्ड टिंबर्स या दोन दुकानांमध्ये जेसीबीच्या सहाय्याने आत घुसून दुकान फोडले. दोन्ही दुकानातील १.९० लाख रुपये व ३ हजार रुपयांचे सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरुन नेले. तसेच दोन्ही दुकानातील २० लाख रुपयांचे नुकसान केले. हा प्रकार दिनांक ८ रोजी दुपारी २ च्या सुमारास घडला. अमित कांतीलाल ओसवाल (वय ३८, रा. कृष्णानगर, वनवासवाडी, खेड, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, दीपक अँचलचंद जैन, ममता अँचलचंद जैन व साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार खाडे तपास करत आहेत.
10 Aug 2025 04:10 PM (IST)
सातारा येथील नगरपालिकेच्या समोरील पाणी टाकीच्या आडोशाला सागर शाम महामुने (वय ४३, रा. शनिवार पेठ, देवी चौक, सातारा) हा दि. ८ रोजी जुगार खेळताना आढळून आला. त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल तुषार हणमंत भोसले यांनी कारवाई केली. दुसऱ्या कारवाईत, गोडोतील पालवी हॉटेलच्या पाठिमागणे सचिन भानुदास औघडे (वय ४१, रा. सासपडे, ता. सातारा), शाहरुख काझी (रा. सातारा) हे दि. ८ रोजी जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस कॉन्स्टेबल सागर गायकवाड यांनी कारवाई केली.
10 Aug 2025 03:50 PM (IST)
शिरुर शहरात राहणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गोलेगाव येथील फिरोज गुलाब शेख (रा. गोलेगाव, ता. शिरुर, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोज शेख याने संबंधित महिलेला वारंवार फोन करून अश्लील भाषेत संभाषण केले. याशिवाय, महिला घरासमोर काम करत असताना तिच्या जवळ जाऊन हात पकडत, मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून शिरुर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
10 Aug 2025 03:35 PM (IST)
पादचारी ज्येष्ठ महिलेकडील दागिने हिसकावून पसार झालेल्या चोरट्यांना सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी नऱ्हे भागातील झील काॅलेज चौकात पादचारी महिलेकडील दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली होती. चोरट्यांकडून ६० हजारांचे सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राहुलकुमार शामकुमार (वय ३३), गोविंदाकुमार ओमप्रकाश (वय ३५, दोघे सध्या रा. गणेश हाईट्स, मतेनगर, अंबाईदरा, धायरी) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
10 Aug 2025 03:20 PM (IST)
अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांकडून लाखो रुपयांचे ‘एमडी’ (मॅफेड्रॉन) पावडर जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी (५ ऑगस्ट) कावेरीनगर भाजी मंडईजवळ, वाकड येथे करण्यात आली.बालाजी भारत चकृपे (३७, दिघी) आणि समाधान गणेश गंगणे (१९, दिघी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कावेरीनगर भाजी मंडईजवळ मॅफेड्रॉन विक्रीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बालाजीकडून २ लाख ८४ हजार रुपये किमतीचे ५६.८० ग्रॅम एमडी पावडर आणि आरोपी समाधानकडून ५९ हजार २०० रुपये किमतीचे ११.८४ ग्रॅम एमडी पावडर जप्त केले. दोघांकडून एकूण ३ लाख ४३ हजार २०० रुपये किमतीचे ६८.६४ ग्रॅम एमडी पावडर, हा अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ताब्यात ठेवलेला आढळला. वाकड पोलीस तपास करत आहेत.
10 Aug 2025 03:00 PM (IST)
वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून एका भावाने आपल्या मोठ्या भावाला मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी (६ ऑगस्ट) दुपारी आल्हाटवस्ती, लवळे येथे घडली. याबाबत रमेश तुकाराम सातव (५९, लवळे, ता. मूळशी) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय तुकाराम सातव (५५, माळवाडी, हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी मोजणी झाल्यानंतर फिर्यादीने त्यांच्या लहान भाऊ संजय याला, 'आता माझी जमीन मला दे' असे म्हटले. यावर आरोपीने फिर्यादीला 'तुला जमीन देत नाही, काय करायचे ते कर' अशी धमकी दिली आणि शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने हाताने मानेवर चापट मारली आणि गजाने फिर्यादीच्या डाव्या मांडीवर मारून त्यांना जखमी केले. बावधन पोलीस तपास करत आहेत.
10 Aug 2025 02:50 PM (IST)
लक्ष्मी रस्ता परिसरात एका खाद्यपदार्थ विक्रेत्याचा मोबाइल संच हिसकावून पसार झालेल्या चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.चोरट्यांकडून दुचाकी आणि मोबाइल संच जप्त करण्यात आला. रियाज मुझम्मील खान (वय १९), आयान जावेद शेख (वय १९, दोघे रा. अंगारशहा तकिया, भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खान आणि शेख यांच्याबरोबर असलेल्या एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत एका खाद्यपदार्थ विक्रेत्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
10 Aug 2025 02:25 PM (IST)
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या सराइतांकडून दोन पिस्तुले जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या प्रकरणी लक्ष्मीपुत्र नागेश बडधाळ (वय २४, रा. हरीतारा सोसायटी, भीमनगर, कोंढवे धावडे), राहुल राजु थोरात (रा. दत्तवाडी, म्हसोबा चौक, पदमगल्ली) यांना अटक करण्यात आली. मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी विविध कार्यक्रमांनित्त शहरात आले होते. त्या वेळी गुन्हे शाखेचे युनिट तीनचे पथक गस्त घालत होते. आरोपी लक्ष्मीपुत्र याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमित बोडरे आणि महेंद्र तुपसौंदर यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल जप्त करण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा दुसरे पिस्तूल साथीदार राहुल याच्याकडे ठेवण्यास दिल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी राहुल याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त केले.
10 Aug 2025 02:15 PM (IST)
पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. स्नेहा विशाल झगडे असं आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचं नाव आहे.
10 Aug 2025 02:00 PM (IST)
येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात टोळक्याने कोयते उगारून दहशत माजविल्याची घटना घडली. टाेळक्याने रहिवाशांना धमकावून शिवीगाळ केली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी आठ जणंविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एकाला अटक केली. या प्रकरणी शैलेश मोहिते (रा. राज चौक, येरवडा) याला अटक करण्यात आली. कोयते उगारून दहशत माजविल्याप्रकरणी मोहिते याच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस शिपाई सूर्यकांत कांबळे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
10 Aug 2025 01:40 PM (IST)
कल्याणीनगर भागात बेकायदा सावकारी करणाऱ्या एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेने तक्रारदाराके एक काटी २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ज्युली विनय चाल्स (रा. कल्याणी नगर, पुणे) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
10 Aug 2025 01:28 PM (IST)
लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुक लाईव्ह करत एका तरुणाने छातीत सुरा खुपसून घेऊन आत्महत्या केली. या घटनेने लातूर जिल्हा हादरला आहे. या तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव भरत बालाजी सागावे (वय ३२) असे आहे. भरत हा लातूर जिल्ह्यातील अंबुलगा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
10 Aug 2025 01:20 PM (IST)
बारामतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये विमानतळावर पायलट प्रशिक्षण देणाऱ्या रेड बर्ड एव्हिएशन कंपनीच्या चार्टर्ड विमानाच्या टायरमध्ये बिघाड झाल्याने अपघात झाला, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. बारामती विमानतळावर शनिवारी (दि ९ ) सकाळी पावणे आठ वाजता बारामती येथील रेड बर्ड एव्हीएशन या खासगी विमान प्रशिक्षण संस्थेच्या विमानाचा अपघात झाला आहे. पायलट विवेक यादव यांनी विमान उड्डाण केले. मात्र थोड्या उंचीवर गेल्याने पुढील चाकात तांत्रिक बिघाड झाल्याने ते निखळले असल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यामुळे त्यांनी एमर्जेसची लँडिंग करण्याचा निर्णय घेतला आणि लँडिंग केले. मात्र यात विमानाच्या पंखांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ते विमान बाजूला केले आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी हानी झालेली नाही. याआधीही या ठिकाणी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
10 Aug 2025 01:05 PM (IST)
पत्नी नांदायला न आल्याच्या रागातून तिचा गळा चिरून निर्घृण खून केल्यानंतर पसार झालेल्या पतीला विमानतळ पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली आहे. खांदवेनगर परिसरात ही घटना घडली होती. प्रेम उत्तम जाधव (रा. खांदवेनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, ममता प्रेम जाधव असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. २७ जुलै रोजी रात्री ही घटना घडली होती.
10 Aug 2025 12:52 PM (IST)
जळगावच्या धरणगावात नाकेबंदी दरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गांजाची तस्करी करणारी कार पकडली आहे. ४० किलो गांजा आणि कारसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनीं पाठलाग केला असता भीतीने कार चालकांनी झाडाझुडपांमध्ये वाट काढत आणि कार जागीच सोडून पळून काढला. सध्या पोलीस या दोन संशयीत फरार आरोपींचा शोध घेत आहे. मात्र पोलिसांच्या कारचा थरारक पाठलाग सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
10 Aug 2025 12:40 PM (IST)
फलटण शहरातील उपनगरात राहत असलेल्या एका केवळ ९ वर्षाच्या चिमुरडीला तिच्या सख्ख्या मामाने अमानुषपणे मारहाण केली असून, या मारहाणीमुळे संबंधित चिमुरडीच्या मनावर आघात झाला आहे. घडलेला मारहाणीचा प्रकार चिमुरडीने तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर ही घटना समोर आली आहे. दरम्यान, मामाच्या विरोधात चिमुरडीचे पिता फलटण शहर पोलिस ठाण्यात गेले असता शहर पोलिसांनी अक्षरश: त्यांना हाकलून लावले. शेवटी हतबल झालेल्या पित्याने सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे धाव घेवून तक्रार मांडली आहे.
10 Aug 2025 12:20 PM (IST)
वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्वंयस्फुर्त वाहतूकीचे नियमन करणाऱ्या एका आजोबांना रिक्षा चालकाने किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘बस थांब्यावर रिक्षा उभी करू नये. थोडी बाजूला घ्या,’ असे सांगितल्याच्या रागातून संतप्त रिक्षाचालकाने ही मारहाण केल्याचे सांगण्यात आले आहे. वारजे माळवाडी बस स्थानक परिसरात बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे. श्रीकांत किशनराव कुलकर्णी (वय ६५) असे मारहाण झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. ते यात जखमी झाले आहेत. कुलकर्णी त्यांच्या मोकळ्या वेळेत वाहतूक नियंत्रणाचे काम करतात. तसेच, वाहतूक पोलिसांना सहकार्य करत असतात.
10 Aug 2025 12:00 PM (IST)
पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (५ ऑगस्ट) रात्री खराबवाडी, ता. खेड येथे घडली आहे. याप्रकरणी एका महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सचिन रामआसरे यादव (२३, अलाहाबाद, उत्तरप्रदेश, सध्या चाकण, ता. खेड) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी सचिन हा त्याची पत्नी गॅलरीत उभे राहून इतर पुरुषांकडे पाहत असल्याचा संशय घेत होता. यावरून तो पत्नीला सतत भांडण करून मारहाण करायचा. घटनेच्या दिवशी त्याने दिवसभर भांडण केले आणि सायंकाळी पत्नीला प्लास्टिकचे स्टूल, लाकडी बेलणे, पीव्हीसी पाईप आणि काठीने दोन्ही पाय, दोन्ही हात आणि डोक्यावर मारहाण केली. तसेच पत्नीच्या पोटाला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिला मारून टाकले. जेव्हा मयताचा मुलगा प्रिन्स आणि मुलगी पलक यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनाही दमदाटी केली आणि मुलाला पाठीत लाकडी बेलण्याने मारले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
10 Aug 2025 11:40 AM (IST)
लातूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहरे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे मुलाने वयोवृद्ध आईचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जमीन विक्रीच्या वादातून ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सांगवी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुमिंद्रबाई जाधव (वय 70) यांच्या नावे असलेली शेती विकावी, असा आग्रह त्यांचा मुलगा काकासाहेब जाधव (वय 48) मागील काही दिवसांपासून धरत होता. मात्र आईने ठाम नकार दिल्याने रागाच्या भरात काकासाहेबने 7 ऑगस्ट रोजी शेतातच आईचा तोंड दाबून आणि गळा आवळून आईचा खून केला. त्यानंतर मृतदेह उसाच्या शेतात पुरून टाकला. सदर घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांचा तपास सुरू झाला. आई आणि मुलांमध्ये शेतजमीन विकण्यावरून वाद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुलगा काका साहेबचा शोध सुरू झाला. मात्र काकासाहेबचा तपास लागला नाही. रेणापूर शिवारात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत काकासाहेब जाधवचा मृतदेह आढळून आला. मृतदेह तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, रेणापूर पोलिस पुढील तपास करत आहेत.
10 Aug 2025 11:10 AM (IST)
बीडच्या परळी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नशेच्या आहारी गेलेल्या नातवाने पैश्यासाठी आजीवर जीवघेणा हल्ला केला. तर त्याला रोखण्यासाठी आलेलय आई- वडीलसुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमी झालेल्या आजीला परळीहून आंबाजोगाईला उपचारासाठी घेऊन जात असतांना रस्त्यातच मृत्यू झाला आहे.
10 Aug 2025 11:09 AM (IST)
अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आली आहे. अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात एका रुग्णाच्या नाश्त्यासाठी आणलेल्या कांदेपोह्यामध्ये चक्क मृत पालीचं मुंडकं आढळून आलं आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या क्रमांक ३२ वार्डमधील दाखल असलेल्या शेख सोहेल या रुग्णाच्या कांदेपोह्याच्या नाश्त्यात हे पालीचं मुंडकं आढळून आलं आहे.
10 Aug 2025 11:07 AM (IST)
चंदननगर पोलिस ठाण्याच्या नवीन सुसज्ज आणि प्रशस्त इमारतीचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर पुण्यातील गुन्हेगारांनी त्याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरदुपारी सराफी दुकानात घुसून चोरट्यांनी लुटापाट करत चोरी केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर शहरात चांगलीच खळबळ उडाली. गृहमंत्री पुण्यात अन् पोलिसांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत असताना हा प्रकार घडल्याने पोलिस दलातही चांगलेच वातावरण गरमागरम झाले होते. चोरट्यांनी तीक्ष्ण हत्यारे दाखवत तीन ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात राजेंद्रसिंग देवडा (वय ५७) यांनी तक्रार दिली आहे.