Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News Updates : नांदेडमधून तरुणांनी उचलून नेलेली मुलगी अखेर सापडली

Crime News Live Updates Marathi : राज्यासह देश-विदेशातील गुन्हेगारी संदर्भातल्या ताज्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक घडामोडीचे अपडेट वाचा फक्त एका क्लिकवर...

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 31, 2025 | 06:09 PM
Crime News Live Updates

Crime News Live Updates

Follow Us
Close
Follow Us:

नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे दोन युवकांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या अपहरणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची दखल घेत नांदेड पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि त्या मुलीचा सुखरूप शोध लावण्यात यश मिळवले. दोघांनी मिळून मुलीला दुचाकीवरून बळजबरीने पळवून नेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने तपासाला लागले. पोलिसांचा दबाव वाढत असल्याने आरोपींनी मुलीला सोडून पळ काढला. यानंतर पोलिसांनी ती मुलगी सुखरूप शोधून काढली.

The liveblog has ended.
  • 31 Jul 2025 06:08 PM (IST)

    31 Jul 2025 06:08 PM (IST)

    वाढदिवस साजरा करायला निघालेल्या तरुणाला रस्त्यातच संपवलं

    दिल्लीत एका क्षुल्लक वादातून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री गाझीपूर येथील पेपर मार्केट परिसरात हा प्रकार घडला. ज्यात वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या विकास नावाच्या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. तर त्याचा मित्र सुमित गंभीर जखमी झाला आहे.

  • 31 Jul 2025 05:52 PM (IST)

    31 Jul 2025 05:52 PM (IST)

    जाब विचारणाऱ्या तरूणाची बोटं छाटली

    बीडमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून गुन्हेगारीच्या वाढत्या घटना घडत असून त्यामुळे गावात व आसपासच्या परिसरातही दहशतीचे वातावरण आहे. त्यातच आता बीडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. व्हिडीओ व्हायरल केल्याचा जाब विचारणाऱ्या तरूणाची बोटं छाटण्याता आल्याचा अत्यंत हादरवणारा प्रकार बीडमध्ये घडला आहे. मित्रानेच मित्राची बोट छाटल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पेठ पोलीस स्टेशनमध्ये 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर एका व्यक्तीला बेड्या ठोकत पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

  • 31 Jul 2025 05:35 PM (IST)

    31 Jul 2025 05:35 PM (IST)

    महादेव मुंडे खून प्रकरणी कुटुंबीयांची मागणी

    महादेव मुंडे खून प्रकरणाला 21 महिने उलटूनही अद्यापही आरोपी फरारच आहेत आणि या प्रकरणात आता एसआयटी आणि सीआयडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी मुंडे कुटुंबीयांकडून केली जात आहे. या एसआयटीचे प्रमुख आयपीएस पंकज कुमावत असावेत याचबरोबर पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांचा या एसआयटीमध्ये समावेश करून त्यांना या तपासासाठी विशेष अधिकार द्यावेत अशी मागणी मुंडे कुटुंबियांकडून केली जात आहे.

  • 31 Jul 2025 05:15 PM (IST)

    31 Jul 2025 05:15 PM (IST)

    महादेव मुंडे प्रकरण ऐकून मुख्यमंत्री भावुक - ज्ञानेश्वरी मुंडे

    परळीच्या महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रकरणात कुणीही असो, त्याला सोडणार नाही असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला. महादेव मुडें हत्याप्रकरणी त्यांच्या पत्नी आणि कुटुंबाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या हत्येमध्ये सहभागी असणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. परळीत दोन वर्षांपूर्वी, 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी वाल्मिक कराड आणि त्याचा मुलगा सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच कराड गँगचे इतरही सदस्य यामध्ये असून पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, "महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर गेल्या 21 महिन्यांचा वृत्तांत मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला. हे सर्व ऐकूण मुख्यमंत्री भावुक झाले. या प्रकरणात कुणीही असले तरी त्याला सोडणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितलं."

  • 31 Jul 2025 04:45 PM (IST)

    31 Jul 2025 04:45 PM (IST)

    Zomato डिलिव्हरी बॉय निघाला ड्रग्ज तस्कर

    ठाणे गुन्हे शाखा आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या विशेष मोहिमेत केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ किलो १८४ ग्रॅम वजनाचा एमडी पावडर जप्त केला आहे. पकडलेल्या एमडी पावडरची किंमत सुमारे चार कोटी इतकी असून, पकडलेल्या दोघांमध्ये एका झोमॅटो फुड डिलेव्हरी बॉयचा समावेश आहे.

  • 31 Jul 2025 04:30 PM (IST)

    31 Jul 2025 04:30 PM (IST)

    जळालेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

    उल्हासनगर शहरात आत्महत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अंगावर काटा आणणारा असा हा आत्महत्येचा थरार आहे. बुधवारी रात्री एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. कॅम्प ५ परिसरातील लक्ष्मीनारायण पॅलेस या सोसायटीच्या टेरेसवर एका व्यक्तीने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला पेटवत आत्महत्या केली. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत व्यक्तीची ओळख विजयकुमार भोजवानी अशी झाली आहे.

  • 31 Jul 2025 04:15 PM (IST)

    31 Jul 2025 04:15 PM (IST)

    आंबेगाव पठार परिसरात टोळक्याचा तरुणावर हल्ला

    पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात सात अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने आणि त्यांच्या साथीदारांनी जुन्या वादातून एका तरुणाचा तीक्ष्ण शस्त्रांनी सपासप वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री हा प्रकार कात्रज येथील जैन मंदिराजवळील चाळीच्या परिसरात घडला आहे. टोळक्याच्या या हल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. अभिजीत अवचरे (वय १८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ओंकार राजेंद्र दानवले (वय १९, रा. ओव्हाळ वाडा, कात्रज गाव) याने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी पृथ्वीराज पवार (वय २०), संकेत विठ्ठल रेणुसे (वय २०) व नविन नरसप्पा गाडधरी (वय २०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, ७ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

  • 31 Jul 2025 03:50 PM (IST)

    31 Jul 2025 03:50 PM (IST)

    भावानेच केली भावाची एक किलो सोन्याची चोरी

    मुंबईच्या अंधेरीत पूर्वेतील एमआयडीसी परिसरामध्ये भावानेच केली भावाची एक किलो सोन्याची चोरी केल्याची घटना घडली आहे. भावाने एक किलो सोने एमआयडीसी परिसरात हॉलमार्क करण्यासाठी आपल्या दुसऱ्या भावाला देऊन पाठवले होते. मात्र आरोपी भावाने आपल्या भावाचा विश्वासघात करत एक किलो सोने पोलिसांनी नाकाबंदीमध्ये चोरी केल्याचा बनाव केला होता.

  • 31 Jul 2025 03:44 PM (IST)

    31 Jul 2025 03:44 PM (IST)

    ‘EMI भर अन् बायको घे’; हप्ते न भरल्याने बँकेने थेट पत्नीलाच …, झांसीमध्ये घडलेला नेमका प्रकार काय?

    झासी: उत्तर प्रदेशमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या झासी जिल्ह्यात एक वेगळीच घटना घडली आहे. एका व्यक्तीने कर्जाचे हप्ते न भरल्याने खासगी बँकेने त्या व्यक्तीच्या पत्नीलाच ओलीस ठेवले आहे. कर्जाचे थकलेले हप्ते भरल्यानंतरच तुमची पत्नी परत मिळेल असे बँकेच्या लोकांनी त्या पतीला सांगितले. या घटनेची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. उत्तर प्रदेशच्या झासीमध्ये घडलेला हा नेमका प्रकार काय आहे हे जाणून घेऊयात.

  • 31 Jul 2025 03:30 PM (IST)

    31 Jul 2025 03:30 PM (IST)

    बसमधील प्रवाशाला मारहाण, 95 लाखांचं सोनं पळवलं

    राज्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढ होत असून दिवसाढवळ्या दरोड्याच्या घटना घडत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील तासवडे टोलनाका परिसरात असणाऱ्या श्रावणी हॉटेल येथे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मारहाण करत सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरहून मुंबईला निघालेली एसटी बस येथील टोलनाक्याजवळी हॉटेलवर थांबलेली होती. त्यावेळी, चार ते पाच अज्ञातांनी कुरिअर गोल्ड पॅकिंगचा माल घेऊन धूम ठोकली. सुदैवाने जमावाने एका संशयितास पकडून पोलिसांच्या स्वाधान केलं आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

  • 31 Jul 2025 03:15 PM (IST)

    31 Jul 2025 03:15 PM (IST)

    विद्यार्थ्याच्या हातावर मेणबत्तीने चटके दिले; ट्युशन शिक्षिकेविरोधात गुन्हा

    मुलाला हस्ताक्षर चांगले येत नसल्यामुळे ट्युशन शिक्षिकेकडून तळहातावर मेणबत्तीचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मालाड पूर्वेत गोकुळधाम फिल्म सिटी रोडवर एका खाजगी ट्युशनमध्ये ही धक्कादायक घटना घडली. मारहाण करून लहान मुलाच्या हातावर मेणबत्तीने चटका देणारी आरोपी शिक्षिका राजश्री राठोड विरोधात कुरार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इयत्ता चौथीत शिकणाऱ्या आठ वर्षाच्या मुलासोबत ही घटना घडली असून त्याच्या वडिलांनी याची तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी या खासगी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला.

  • 31 Jul 2025 02:51 PM (IST)

    31 Jul 2025 02:51 PM (IST)

    भीक मागण्यासाठी दोन वर्षांच्या बालिकेचे अपहरण

    कात्रज भागातून भीक मागण्यासाठी दोन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले होते. याचा उलगडा करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दोन वर्षांच्या चिमुकलिची धाराशिव जिल्ह्यातून आरोपीच्या तावडीतून सुखरूप सुटका करत पाच जणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. तिला भीक मागण्यासाठी नेल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले असून, त्यांनी याप्रकारे आणखी कोणत्या लहान मुलांचे अपहरण केले आहे का, यादृष्टीने तपास सुरू केला आहे.

  • 31 Jul 2025 02:46 PM (IST)

    31 Jul 2025 02:46 PM (IST)

    पत्रकार मुकेश चंद्राकर हत्या प्रकरणात मोठी कारवाई

    छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील पत्रकार मुकेश चंद्राकर हत्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिस तपास पथकाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) पाच अधिकाऱ्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये दोन निवृत्त कार्यकारी अभियंते (EE), एक कार्यरत कार्यकारी अभियंते, एक उपविभागीय अधिकारी आणि एक उपअभियंता यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना दोन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे.

  • 31 Jul 2025 02:40 PM (IST)

    31 Jul 2025 02:40 PM (IST)

    विमानतळ व बंडगार्डन परिसरात चैन स्नॅचिंग

    विमानतळ व बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी एका रात्रीत एका महिलेसह दोघांना टार्गेटकरून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले. पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात साकेत राय (४१, रा. सी-६०२, पीती कोर्टयार्ड सोसायटी, चंदननगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार २८ जुलैला रात्री साडेदहा वाजता त्यांचा मित्र विकास पाटील यांच्यासोबत नगर रस्त्यावरील राका ज्वेलर्ससमोर उभे होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी अंगावर का थुंकलात असे बोलत वाद घालण्याचा बहाणा केला. तसेच, जवळ येत राय यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावली आणि पळ काढला. तर, दुसरी घटना त्याच दिवशी पहाटे बंडगार्डन परिसरात घडली. अंजनी शाम अमोलीक (५८, रा. ओंकार नं.१६ अपार्टमेंट, सह्याद्रीनगर, धनकवडी) या पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहा येथून एआयएसएसएमएस कॉलेजकडे जात होत्या. तेथील कचरा डेपोजवळ दोन अज्ञात चोरट्यांनी ‘हा रस्ता हायवेला जातो का?’ असे विचारत थांबवले. त्या बोलत असतानाच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख २५ हजार रुपये किमतीचे मिनी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले आणि पळ काढला. दोन्ही प्रकरणात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली असून, त्यामाध्यमातून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

  • 31 Jul 2025 02:33 PM (IST)

    31 Jul 2025 02:33 PM (IST)

    बाराबंकी जिल्ह्यात आढळला महिला पोलीसांचा मृतदेह

    उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील एका तलावाजवळ बुधवारी पोलिसांनी एका महिला कॉन्स्टेबलचा आकस्मित मृतदेह आढळला. अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांना या घटनेत महिलेच्या सहकाऱ्याचा सहभाग असल्याचा संशय आहे. महिला कॉन्स्टेबलने तिच्या एका सहकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला होता.

  • 31 Jul 2025 02:20 PM (IST)

    31 Jul 2025 02:20 PM (IST)

    गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची ४४ लाखांची फस‌वणूक

    शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची ४४ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३८ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुण बाणेर परिसरात राहण्यास आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फेब्रुवारी महिन्यात तरुणाच्या मोबाइलवर मॅसेज पाठविला होता. शेअर बाजारातील व्यवहार करणाऱ्या एका कंपनीतील अधिकारी असल्याची बतावणी केली होती. नंतर चोरट्याने तरुणाला गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. चोरट्यांनी त्याला रकम गुंतविण्यास सांगितले. सुरुवातीला चोरट्यांनी तरुणाला परतावा देत त्याचा विश्वास संपादन केला. नंतर मात्र, चोरट्यांच्या बँक खात्यात तरुणाने वेळोवेळी ४४ लाख ८१ हजार रुपये जमा केले. पैसे गुंतविल्यानंतर चोरट्यांनी तरुणाला परतावा दिला नाही, तसेच त्याला मूळ मुद्दल दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक अश्विनी ननावरे तपास करत आहेत.

  • 31 Jul 2025 01:55 PM (IST)

    31 Jul 2025 01:55 PM (IST)

    खराडी पोलिसांनी केले गहाळ झालेले पंधरा मोबाईल परत

    खराडी पोलिसांनी सर्व सामान्य नागरिकांचे गहाळ झालेले तब्बल ३ लाख ८३ हजारांचे १५ मोबाईल शोधून काढत पुन्हा नागरिकांना परत केले. पोलिसांच्या या कामगिरीनंतर नागरिकांनी त्यांचे आभार मानले. खराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याबाबत तक्रारी पोलिसांकडे आलेल्या होत्या. मोबाईल चोरीचे प्रमाण वाढल्यानंतर त्या अनुषंगाने वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण यांनी गहाळ मोबाईल शोधण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत जगताप, तपास पथाकाचे सहाकय निरीक्षक रविंद्र गोडसे, उपनिरीक्षक राहुल कोळपे व तपास पथकात मोबाइलचे तांत्रिक विश्लेषणाचे कामकाज करणारे पोलिस अमंलदार सुरज जाधव सायबर पथकातील पोलिस उपनिरीक्षक माधुरी बिडवे यांनी तपास सुरू केला. त्यानुसार गहाळ मोबाईल नांदेड, आहिल्यानगर, उत्तर प्रदेश, कर्नाटक, सोलापूर बिहार या राज्यात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यातील १५ मोबाईल परत मिळवून नागरिकांना परत केले. या कारवाईत अमंलदार महेश नानेकर, सुरेंद्र साबळे, श्रीकांत शेंडे, वसीम सय्यद, श्रीकांत कोद्रे, जयवंत श्रीरामे, विलास केदारी, प्रतिभा पवार यांनी सहभाग घेतला.

  • 31 Jul 2025 01:40 PM (IST)

    31 Jul 2025 01:40 PM (IST)

    माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

    माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विवाहितेचा छळ केल्याच्या आरोपावरून महिलेच्या पती विरुध्द हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.२८) रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे विवाहितेने पश्चिम बंगाल राज्यातील संक्रेल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सदर तक्रार हिंगोली पोलिसांकडे वर्ग करण्यात आली.

  • 31 Jul 2025 01:25 PM (IST)

    31 Jul 2025 01:25 PM (IST)

    भोर तालुक्यातील वेळूत भीषण अपघात; दोन तरुणांचा मृत्यू

    पुणे-सातारा महामार्गावर वेळू (ता.भोर) येथे भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने अचानक विरुद्ध दिशेच्या लेनवर घुसून अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला; तर तिघांना गंभीर व किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत. याबाबत गोरक्षनाथ बाबासाहेब खुटवड (वय ४९ रा.उंबरे ता. भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • 31 Jul 2025 01:18 PM (IST)

    31 Jul 2025 01:18 PM (IST)

    भर रस्त्यात महिलेला तिघांकडून बेदम मारहाण

    अमरावती जिल्ह्यातील विर्शी गावात एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. शारदा बाभुळकर या महिलेवर तीन पुरुष आणि एका महिलेने मिळून बेदम हल्ला केल्याची माहिती समोर आली असून, संबंधितांचा मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • 31 Jul 2025 01:02 PM (IST)

    31 Jul 2025 01:02 PM (IST)

    लग्न मंडपाच्या कामाच्या पैशांची चोरी

    मालकाची लग्नमंडपाच्या कामाची रोख रक्कम चोरी करून पसार झालेल्या चोरट्याला काळेपडळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १५ लाख ६ हजार किंतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सलमान यासीन पठाण (३२, रा. ईसा हाईट्स, शिळफाटा, मुळ रा. पाली, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमित शेटे, पोलिस हवालदार दाऊद सय्यद, अमंलदार शाहिद शेख व प्रदिप बेडीस्कर व त्यांच्या पथकाने केली आहे.

  • 31 Jul 2025 12:35 PM (IST)

    31 Jul 2025 12:35 PM (IST)

    लग्न मंडपाचे कामाचे पैसे चोरी केल्याप्रकरणी आरोपीला अटक

    मालकाची लग्नमंडपाच्या कामाची रोख रक्कम चोरी करून पसार झालेल्या चोरट्याला काळेपडळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून १५ लाख ६ हजार किंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सलमान यासीन पठाण (३२, रा. ईसा हाईट्स, शिळफाटा, मुळ रा. पाली, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमित शेटे, पोलिस हवालदार दाऊद सय्यद, अमंलदार शाहिद शेख व प्रदिप बेडीस्कर व त्यांच्या पथकाने केली आहे.

  • 31 Jul 2025 12:20 PM (IST)

    31 Jul 2025 12:20 PM (IST)

    एका विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार

    पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. संत तुकाराम नगर येथील डी. वाय. पाटील सिनियर कॉलेज येथे कॉलेजच्या फ्रेशर पार्टीवरून झालेल्या वादामुळे एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला आहे. ही घटना सोमवारी (२८ जुलै) सकाळी ११:३० वाजता घडली आहे. तन्मय अविनाश कांबळे (वय१८, कासारवाडी) याने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक गिरी, अल्फान निसार पठाण, शिवराज तलवारे, सोहल शेख, बिराज विश्वकर्मा, यश दीपक पवार, आदिनाथ सोमनाथ गायकवाड आणि इतर अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींपैकी अभिषेक गिरी, अल्फान निसार पठाण, शिवराज तलवारे, सोहेल शेख, यश दीपक पवार, आदिनाथ सोमनाथ गायकवाड यांना अटक केली आहे.

  • 31 Jul 2025 12:01 PM (IST)

    31 Jul 2025 12:01 PM (IST)

    धायरीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन तरुणाचा खून

    सिंहगड रोड परिसरातील धायरीत मोबाइल न विचारता घेतल्यावरून झालेल्या वादविवादातून एकाला बेदम मारहाण करुन त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. गु्न्हा घडल्यानंतर तीन तासात नांदेड सिटी पोलिसांनी पसार झालेल्या कंपनीतील दोन कामगारांना अटक केली आहे. देवा उर्फ देवीदास पालते (वय २५, रा. तागयाल, ता. मुखेड, जि. नांदेड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कंपनीतील कामगार गजानन हरिश्चंद्र राठोड (वय ३२, रा. आडगाव, ता. पुसद, जि. यवतमाळ), महारुद्र शिवाजी गवते (वय २७, रा. साईधाम, त्रिनेत्र इंजिनिअरिंगजवळ, धायरी, सिंहगड रस्ता) यांना अटक करण्यात आली आहे.

  • 31 Jul 2025 11:45 AM (IST)

    31 Jul 2025 11:45 AM (IST)

    मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका

    मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे, एनआयए विशेष कोर्टाने निकाल दिला आहे. एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी यांची मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्तता केली. न्यायाधीशांनी निकाल दिल्यानंतर हा न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Web Title: Maharashtra crime news in marathi live updates nanded news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • nanded news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
1

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
2

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप
3

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा
4

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.