Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Accident Report: अजून किती जीव जाणार? राज्यात २६ हजार अपघातांचा हादरवणारा ग्राफ; पोलिसांची आकडेवारी जाहीर!

Maharashtra Accident Report: वेग, दुर्लक्ष अन् रस्त्यांवरील धोका! महाराष्ट्रात अवघ्या ९ महिन्यांत २६ हजार अपघातांची नोंद झाली असून ११,३२६ नागरिकांचा जीव गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात घट झाली असली, तरी रोज कित्येक संसार उघड्यावर पडत आहेत. महामार्ग पोलिसांनी जाहीर केलेली ही धक्कादायक आकडेवारी नक्की काय सांगते?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 30, 2026 | 12:28 PM
Maharashtra Accident Report: अजून किती जीव जाणार? राज्यात २६ हजार अपघातांचा हादरवणारा ग्राफ; पोलिसांची आकडेवारी जाहीर!

Maharashtra Accident Report: अजून किती जीव जाणार? राज्यात २६ हजार अपघातांचा हादरवणारा ग्राफ; पोलिसांची आकडेवारी जाहीर!

Follow Us
Follow Us:
  • ९ महिन्यांत रस्ते अपघातात ११,३२६ बळी
  • राज्यात तब्बल २६,९१५ अपघातांची नोंद
  • मुंबईतील अपघातांमध्ये २६० जणांचा मृत्यू
Maharashtra Accident Report: महाराष्ट्रातील रस्ते अपघातांची भीषणता दिवसेंदिवस अधिक चिंतेचा विषय ठरत आहे. चालू वर्ष २०२६ मधील जानेवारी ते सप्टेंबर या अवघ्या नऊ महिन्यांच्या कालावधीत राज्यात तब्बल ११,३२६ नागरिकांना रस्ते अपघातांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्र महामार्ग वाहतूक पोलिसांच्या रस्ते विभागाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीवरून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत ५८६ मृत्यू कमी, पण जीवितहानी मोठी

महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ च्या जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात रस्ते अपघातात ११,९१२ जणांचा मृत्यू झाला होता. २०२६ मध्ये याच कालावधीत ही संख्या ११,३२६ इतकी नोंदवली गेली आहे. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत मृत्यूंची संख्या ५८६ ने कमी झाली आहे. मात्र, केवळ ९ महिन्यांत तब्बल ११ हजारांहून अधिक नागरिकांचा अपघातात अंत होणे, ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.

हेही वाचा: Mumbai Drone Crash: शो ठरला जीवघेणा! मुंबईत उडत्या ड्रोनचा प्रवाशाला भीषण फटका; डोक्याला गंभीर दुखापत!

राज्यात २६ हजारांहून अधिक अपघात

आकडेवारीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या काळात महाराष्ट्रात एकूण २६,९१५ रस्ते अपघातांची नोंद झाली. यापैकी १०,४४४ अपघात अत्यंत प्राणघातक ठरले. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या विश्लेषणानुसार:

  • वेगमर्यादेचे उल्लंघन (Speeding)
  • वाहतुकीच्या नियमांकडे केलेले दुर्लक्ष
  • रस्त्यांवरील धोकादायक व असुरक्षित परिस्थिती या सर्व बाबींमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत २४८ प्राणघातक अपघात, २६० जणांचा मृत्यू

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतही रस्ते अपघातांची परिस्थिती बिकट आहे. ९ महिन्यांत शहरात २४८ प्राणघातक अपघातांची नोंद झाली असून, त्यामध्ये २६० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतूक नियंत्रण, पायाभूत सुविधा आणि रस्ते सुरक्षेच्या उपायांकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा: Pune Cyber Fraud News: पुण्यात सायबर गुन्हेगारांचा नवा प्रताप! ‘साहेबांच्या’ नावाचा गैरवापर करून उकळले १६ लाख

कठोर अंमलबजावणी अन् तातडीच्या उपचारांची गरज

अपघातांचे हे भीषण प्रमाण रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांनी काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. धोकादायक रस्त्यांवर संरक्षक कठडे बसवणे, योग्य सूचना फलक लावणे, अपघातप्रवण क्षेत्रांत (Black Spots) सुधारणा करणे आणि शाळांच्या परिसरात वेगमर्यादा निश्चित करून तिचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. याशिवाय, अपघात घडल्यानंतर जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत (Golden Hour) मिळणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासकीय उपायांसोबतच वाहनचालकांनीही जबाबदारीने वाहन चालवल्यास ही जीवितहानी टाळता येऊ शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्रात जानेवारी ते सप्टेंबर २०२६ मध्ये रस्ते अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या ९ महिन्यांत राज्यात रस्ते अपघातांमध्ये एकूण ११,३२६ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Que: गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघाती मृत्यूंमध्ये किती फरक पडला आहे?

    Ans: २०२५ मधील ११,९१२ मृत्यूंच्या तुलनेत २०२६ मध्ये ५८६ ने मृत्यूंची संख्या कमी झाली आहे.

  • Que: मुंबईमध्ये या कालावधीत किती अपघाती मृत्यू नोंदवले गेले?

    Ans: मुंबईत २४८ प्राणघातक अपघातांमध्ये २६० जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Maharashtra road accidents report 2026 statistics deaths in nine months sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • highway news
  • Maharashtra Crime

संबंधित बातम्या

Highway Accident News: प्रशासकीय निष्काळजीपणा नडला! अर्धा तास रुग्णवाहिका गायब; उपचाराअभावी तरुणाने गमावले प्राण
1

Highway Accident News: प्रशासकीय निष्काळजीपणा नडला! अर्धा तास रुग्णवाहिका गायब; उपचाराअभावी तरुणाने गमावले प्राण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.