Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Highway Accident News: प्रशासकीय निष्काळजीपणा नडला! अर्धा तास रुग्णवाहिका गायब; उपचाराअभावी तरुणाने गमावले प्राण

Highway Accident News: सातारा-पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर लिंब गावाजवळ भीषण अपघात घडला आहे! ट्रक अन् दुचाकीच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. परंतु, अपघातानंतर तब्बल अर्धा तास रुग्णवाहिका न पोहोचल्याने ‘गोल्डन अवर’मध्ये वैद्यकीय मदत न मिळाल्याचा गंभीर आरोप आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 26, 2026 | 03:25 PM
Highway Accident News: प्रशासकीय निष्काळजीपणा नडला! अर्धा तास रुग्णवाहिका गायब; उपचाराअभावी तरुणाने गमावले प्राण

Highway Accident News: प्रशासकीय निष्काळजीपणा नडला! अर्धा तास रुग्णवाहिका गायब; उपचाराअभावी तरुणाने गमावले प्राण

Follow Us
Follow Us:
  •  पुणे-बेंगलोर महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
  • अर्धा तास रुग्णवाहिका न पोहोचल्याने उपचाराअभावी प्राण गमावले
  • प्रशासकीय निष्काळजीपणामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला
Highway Accident News: सातारा-पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर लिंब गावाजवळ एक अत्यंत भीषण आणि संतापजनक अपघाताची घटना समोर आली आहे. ट्रक आणि दुचाकीच्या जोरदार धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, अपघातानंतर वेळेत रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे या दुचाकीस्वाराला प्राण गमावावे लागल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, प्रशासकीय यंत्रणेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

हेही वाचा: Old Man Marriage News: प्रसिद्धीसाठी ओलांडल्या मर्यादा! महिला ब्लॉगरने ७५ वर्षीय वृद्धासोबतच्या नात्यावर सोडले मौन

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा-पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील लिंब गावाच्या हद्दीत ट्रक आणि दुचाकीची भीषण धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेनंतर तब्बल अर्धा तास उलटूनही महामार्ग पोलीस किंवा आपत्कालीन रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नव्हती. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमीला मदतीचा प्रयत्न केला; मात्र पुरेसा वैद्यकीय आधार नसल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

हेही वाचा: Mumbai Crime: पतीच्या क्रूरतेने मुंबई हादरली; पत्नीशी भांडण अन् ९ महिन्यांच्या बाळाला  उंचावरून फेकले

‘गोल्डन अवर’मध्ये मदत न मिळाल्याने मृत्यू; स्थानिकांचा रोष

शासकीय यंत्रणेची रुग्णवाहिका अत्यंत उशिरा घटनास्थळी दाखल झाली. अपघातानंतरचा पहिला तास म्हणजेच ‘गोल्डन अवर’ (Golden Hour) उपचाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे जखमी दुचाकीस्वाराचा तडफडून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे लिंब परिसरातील संतप्त नागरिकांनी महामार्ग पोलीस आणि रुग्णवाहिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असून, जखमींना वेळेवर उपचार मिळतात की नाही, असा गंभीर प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा अपघात नक्की कुठे घडला?

    Ans: हा अपघात सातारा-पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील लिंब गावाजवळ घडला.

  • Que: अपघातानंतर स्थानिकांनी प्रशासनावर कोणता आरोप केला?

    Ans: अपघातानंतर अर्धा तास रुग्णवाहिका व पोलीस न पोहोचल्याने उपचाराच्या 'गोल्डन अवर'मध्ये मदत न मिळाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

  • Que: अपघातात कोणाचा मृत्यू झाला?

    Ans: ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

Web Title: Pune bangalore highway limb satara accident biker death ambulance delay news sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • Accident Case
  • Bike Accident
  • Death
  • highway news
  • Satara News
  • Truck Accident

संबंधित बातम्या

Wai News : वाई तालुक्यात फटाक्यांच्या नियमांना हरताळ! प्रशासनाचा वचक नेमका कुठे? वाईकरांचा प्रशासनाला सवाल
1

Wai News : वाई तालुक्यात फटाक्यांच्या नियमांना हरताळ! प्रशासनाचा वचक नेमका कुठे? वाईकरांचा प्रशासनाला सवाल

धरण उशाला, तरी वाईचा शेतकरी तहानलेला; दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू
2

धरण उशाला, तरी वाईचा शेतकरी तहानलेला; दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू

अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक, कोठडीत दुखापत अन् मृत्यू; सोलापुरातील घटनेनं खळबळ
3

अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक, कोठडीत दुखापत अन् मृत्यू; सोलापुरातील घटनेनं खळबळ

मनसेच्या दणक्यानंतर FDA मैदानात; साताऱ्यात लाखोंचा माल जप्त, तीन आस्थापनांचे परवाने निलंबित, भेसळखोरांविरुद्ध आंदोलनाचा इशारा
4

मनसेच्या दणक्यानंतर FDA मैदानात; साताऱ्यात लाखोंचा माल जप्त, तीन आस्थापनांचे परवाने निलंबित, भेसळखोरांविरुद्ध आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.