Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case : खरात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 4650 ‘त्या’ व्हिडिओ क्लिप्स हटवल्या

एसआयटीने तपास सुरू केल्यापासून प्रथमच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही आजवर झालेला तपास आणि केलेली कारवाई याची माहिती दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 08, 2026 | 12:02 PM
Ashok Kharat Case : खरात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 4650 'त्या' व्हिडिओ क्लिप्स हटवल्या

Ashok Kharat Case : खरात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 4650 'त्या' व्हिडिओ क्लिप्स हटवल्या

Follow Us
Follow Us:

नाशिक : विशेष तपास पथकाने (एसआयटी) अशोक खरातविरुद्धच्या गुन्ह्यांचा तपास अधिक तीव्र केला असून, तांत्रिक आघाडीवर मोठी कारवाई केली आहे. पीडित महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड असलेल्या ४ हजार ६५० लिंक्स एसआयटी आणि सायबर पोलिसांनी हटवल्या आहेत. यासोबतच आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करणारी सोशल मीडियावरील ४५१ खाती कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहेत. व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी आतापर्यंत दोन गुन्हे नोंदवण्यात आले असून, सहा संशयितांना अटक करण्यात आली असल्याची माहिती एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी दिली.

एसआयटीने तपास सुरू केल्यापासून प्रथमच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही आजवर झालेला तपास आणि केलेली कारवाई याची माहिती दिली. महाराष्ट्र पोलिस अकॅडमी येथे सांयकाळी त्यांनी माहिती दिली. दरम्यान, गुन्ह्यांची व्याप्ती आणि तपास यंत्रणा २० मार्चपासून सरकारवाडा आणि इतर पोलीस ठाण्यांमध्ये खरातविरुद्ध दाखल गुन्ह्यांचा तपास एसआयटीमार्फत सुरू आहे. या पथकामध्ये दोन उपअधीक्षक, तीन पोलीस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, दहा उपनिरीक्षक आणि सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

अंधश्रद्धेतून आर्थिक लूट

तपासादरम्यान आतापर्यंत तीसपेक्षा जास्त साक्षीदारांची चौकशी झाली. पीडित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत खरातने त्यांना भीती दाखवली. खडे, चिंचोके, रुद्राक्ष आणि पूजाविधीच्या नावाखाली त्याने लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले आहेत. देवळाली कॅम्प परिसरातील ईशानेश्वर मंदिरात अंधाराचा फायदा घेत आणि हातचलाखी करून स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून त्याने अंधश्रद्धा पसरवल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एसआयटीचे पथक करत आहे. यावेळी तपासअधिकारी अमोल भारती, किरण सूर्यवंशी यांच्यासह पोलिस निरीक्षक हजर होते.

‘होय, लैंगिक संबंध ठेवले…’

खरातने एसआयटीच्या चौकशीत सुरूवातीला ‘तो पूजाविधीचा भाग होता’, असे म्हणत लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावर मौन धारण केले होते. परंतु, चहुबाजूंनी अडकलेल्या खरातने एसआयटीसमोर आता स्पष्ट माहिती देण्यास सुरूवात केली आहे. ‘होय, लैंगिक संबंध ठेवले’, असेही त्याने स्पष्ट केले. खरातकडे अनोळखी व्यक्तींना जाण्याची परवानगी नव्हती. त्याच्या आप्तेष्टांसह ‘भक्तांच्या’ माध्यमातून खरातपर्यंत पोहोचता येत होते. त्यामुळे अगोदरच महिलांची माहिती संकलित करून अंकशास्त्राच्या क्लृप्त्या वापरून तो गंडवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Ashok Kharat News : अशोक खरात विरोधात महिलाशक्ती एकवटली: तक्रारांचा आकडा वाचून बसेल धक्का

Web Title: Major police action in kharat case 4650 video clips removed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik News: चिकन खाल्लं, त्यानंतर दही… पत्नीचा मृत्यू, 10 दिवसांनी पतीचाही मृत्यू;कारण अजूनही गूढ
1

Nashik News: चिकन खाल्लं, त्यानंतर दही… पत्नीचा मृत्यू, 10 दिवसांनी पतीचाही मृत्यू;कारण अजूनही गूढ

Nashik Crime: दुचाकीला कट लागला अन् कारचालकाने पोटात खुपसला चाकू; CCTV मध्ये थरार कैद
2

Nashik Crime: दुचाकीला कट लागला अन् कारचालकाने पोटात खुपसला चाकू; CCTV मध्ये थरार कैद

Nashik News: FDAचा मोठा दणका! नाशिकमधील 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित, 4 हॉटेल्स बंद करण्याचे आदेश
3

Nashik News: FDAचा मोठा दणका! नाशिकमधील 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित, 4 हॉटेल्स बंद करण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.