crime (फोटो सौजन्य: social media)
मुंबई : मुंबईच्या मालाड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एक ८ वर्षाच्या मुलाचे हस्ताक्षर चांगले नाही म्हणून ट्युशन शिक्षिकेने मेणबत्तीने चटके दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या तळहातावर दुखापत झाली आहे. ही घटना मालाड पूर्व गोकुळधाम फिल्म सिटी रोडवर एका खासगी ट्युशनमध्ये ही धक्कदायक घटना घडली आहे. चटके देणाऱ्या शिक्षिकेचा नाव राजश्री राठोड आहे. शिक्षिकेविरोधात कुरार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News: वडगावमध्ये अमली पदार्थांची खुलेआम विक्री; तरुणाई अडकली ड्रग्जच्या विळख्यात
इयत्ता चौथी शिकणाऱ्या आठ वर्षाच्या मुलासोबत ही घटना घडली. त्याच्या वडिलांनी याप्रकरणाची तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी या खासगी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला.
नेमकं काय घडलं?
मालाड पूर्व पिंपरी पाडा येथे राहणाऱ्या 50 वर्षीय तक्रारदाराच्या आठ वर्षाचा मुलगा मंगळवारी संध्याकाळी ट्युशनसाठी गेला होता. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ट्युशन शिक्षिकेने तक्रारदाराला मुलाचे ट्युशन संपले आहे त्याला घेऊन जा असा फोन त्याच्या ट्युशन शिक्षिकेने केला. तक्रारदाराने मोठ्या मुलीला त्याला घरी आणण्यासाठी पाठवलं. पण तो मुलगा ट्युशनमध्ये रडतांना दिसला. मुलीने शिक्षिकेला रडण्याचे कारण विचारले तेव्हा त्याला अभ्यासाचा कंटाळा आला आहे म्ह्णून तो रडत आहे असं शिक्षिकेने सांगितले.
मुलाने घरी आल्यानंतर आईला हात दाखवला. त्यावेळी दोन्ही हातांवर भाजल्याचा जखमा होत्या. आईने विचारले असता त्यावर हस्ताक्षर चांगलं नसल्याने शिक्षिकेने आपल्याला मारल्याचं मुलाने पालकांना सांगितले. तसेच हातावर मेणबत्तीचे चटके दिल्याचंही सांगितले. त्यानंतर पालकांनी मुलाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मुलाच्या वडिलांनी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून मंगळवारी संध्याकाळी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक घटनेनं नांदेड हादरलं; भरदिवसा दोन तरुणांनी तरुणीला नेलं उचलून
नांदेडमध्ये एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. भरदिवसा दोन तरुणांनी तरुणीला जबरदस्ती उचलून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेडच्या रेल्वेस्थानक परिसरात ही घटना घडली आहे. घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
नांदेडच्या रेल्वे स्थानक परिसरात एकजण दुचाकी घेऊन तयार होता. तर दुसऱ्या व्यक्तीने तरुणीला ओढत नेत दुचाकीवर बसवलं. जबदस्तीने तिला उचलून नेल्याचं समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नांदेड पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरु आहे.
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीला घरी बोलावून अत्याचार; नराधमाला कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा