Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: मालाडमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न

रात्रीच्या वेळी कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडलेली सहा वर्षांची चिमुकली... अचानक एका व्यक्तीने तिला पकडले अन् घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकानदारांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. आता व्हायरल व्हिडिओतील त्या संशयिताचा शोध सुरू आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 05, 2026 | 01:47 PM
Crime News: मालाडमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न

Crime News: मालाडमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न

Follow Us
Follow Us:
  • मालाडमध्ये ड्रग्ज सेवनानंतर १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू
  • सहा वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न; दुकानदारांनी वाचवले
  • दोन्ही प्रकरणांत पोलिसांकडून तपास सुरू
 

मुंबई : मालाड पूर्व परिसरात अमली पदार्थांच्या ओव्हरडोसमुळे १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याच परिसरात काही दिवसांपूर्वी सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचेही उघड झाले आहे. या दोन्ही घटनांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

ड्रग्ज सेवनानंतर प्रकृती बिघडली

मालाड पूर्वेतील ही घटना कुरार पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. १९ वर्षीय तरुणाने अमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात आवश्यक तपास सुरू केला. तरुणाने नेमके कोणते अमली पदार्थ घेतले होते, तसेच त्याला हे ड्रग्ज कोणी पुरवले आणि ते त्याच्यापर्यंत कसे पोहोचले, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

हेही वाचा: उत्तराखंडचा २२ वर्षीय तरुण पुण्यात शिक्षणासाठी आला होता; मित्रांसोबत फिरायला गेला अन् परतलाच नाही

तरुणांमधील ड्रग्जचा विळखा चिंतेचा

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, तरुणांमध्ये वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या सेवनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ड्रग्जच्या पुरवठ्यामागील व्यक्ती आणि साखळीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

सहा वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न

दरम्यान, मालाड-मालवणीतील राठोडी व्हिलेज, गंगाधाम सोसायटी, अली तलाव परिसरात काही दिवसांपूर्वी रात्री साडेआठच्या सुमारास सहा वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली. कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या चिमुकलीला नशेत असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या एका व्यक्तीने पकडून नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच आसपासच्या दुकानदारांनी प्रसंगावधान राखून चिमुकलीला त्या व्यक्तीच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाला.

हेही वाचा: Accident News: पैठणमध्ये एसटीची दुचाकीला जोरदार धडक; बाप-लेकीसह तिघांचा दुर्दैवी अंत

व्हिडिओ व्हायरल; कठोर कारवाईची मागणी

या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या संशयिताला मालवणी पोलिसांनी तातडीने शोधून अटक करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. वेळेत कारवाई न झाल्यास भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Malad drugs overdose 19 year old death child kidnap attempt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • child
  • Kidnaped Case
  • Mumbai Crime case

संबंधित बातम्या

कोल्हापुरात धक्कादायक प्रकार; अडीच कोटी दिल्यानंतरही पैशांची मागणी, दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न
1

कोल्हापुरात धक्कादायक प्रकार; अडीच कोटी दिल्यानंतरही पैशांची मागणी, दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास
2

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.