crime (फोटो सौजन्य: social media )
कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेने सर्वच जण हादरले आहे. एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीच्या तोंडात ज्वलनशील पदार्थ टाकून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी पळून जात होता. पण स्थानिक लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली तेव्हा कबुली दिली.
Mumbai Crime: अखेर कुशीनगर एक्सप्रेसमध्ये सापडलेल्या मुलाच्या मृतदेहाचा गूढ उकलल; नेमकं काय घडलं ?
नेमकं काय घडलं?
ही घटना म्हैसूर जिल्ह्यातील सालिगराम तालुक्यातल्या भेर्या गावात घडली. मृतकाचे नाव रक्षिता (वय २०) असे आहे. रक्षिताचे लग्न केरळमधील एका मजुरासोबत झाले होते. पण तिचे बेट्टाडापुरा गावातील तिचा नातेवाईक सिद्धाराजू सोबत कथित अनैतिक संबंध होते.घटनेच्या दिवशी रक्षिता आणि सिद्धराजू एका लॉजमध्ये थांबले होते. जिथे त्यांच्यात वाद झाला. असे सांगितले जात आहे की सिद्धाराजूने तिच्या तोंडात आधी ज्वलनशील पदार्थ टाकला आणि नंतर खाणींमध्ये जिलेटिनच्या कांड्या फोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रिगरने तो पदार्थ फोडून तिची हत्या केली.
हत्या केल्यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याला स्थानिक लोकांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीने आधी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगितले की महिलेचा मृत्यू मोबाईल फोनच्या स्फोटामुळे झाला. मात्र नंतर त्याने पोलिसांना कबुली दिली. पोलिसांनी माहिती दिली की, मृतदेहाची ओळख पटली आहे. आरोपी सिद्धराजूला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे.
प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काढला काटा, अर्धा जळालेला पाय सापडला
कर्नाटकातील चिक्कमंगलुरूमध्ये 60 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पतीच्या निधनाची बातमी ऐकून त्याच्या बायकोने हाय खाल्ली, रडत रडत ती शोक करू लागली. मात्र त्यानंतर धक्कादायक समोर आलं आणि सगळेच चक्रावले.कर्नाटकातील चिक्कमंगलुरूमध्ये सुब्रमण्यम (वय 60) असे मृत इसमाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, त्यांची पत्नी मीनाक्षम्मा (वय ५६) तिचा प्रियकर आणि इतर दोघांना दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या सुब्रमण्यमच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पत्नीवर तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल सात हजार कर्मचारी असणार तैनात