Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv : डॉल्बी चालकांना ४० लाख ७४ हजार रुपयांचा दंड, ऊरसात मोठ्या आवाजात डॉल्बी लावल्याने कारवाई

धाराशिव पोलिसांनी कठोर कारवाई करत चार डॉल्बी वाहनांवर तब्बल ४० लाख ७४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शहरात नुकत्याच पार पडलेल्या ऊरसात या डॉल्बी वाजविण्यात आल्या होत्या.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 01, 2026 | 06:21 PM
डॉल्बी चालकांना ४० लाख ७४ हजार रुपयांचा दंड, ऊरसात मोठ्या आवाजात डॉल्बी लावल्याने कारवाई

डॉल्बी चालकांना ४० लाख ७४ हजार रुपयांचा दंड, ऊरसात मोठ्या आवाजात डॉल्बी लावल्याने कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

धाराशिव : सार्वजनिक व खासगी कार्यक्रमांमध्ये डॉल्बी व डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे वाढणाऱ्या ध्वनी व पर्यावरण प्रदूषणाविरोधात धाराशिव पोलिसांनी कठोर कारवाई करत चार डॉल्बी वाहनांवर तब्बल ४० लाख ७४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शहरात नुकत्याच पार पडलेल्या ऊरसात या डॉल्बी वाजविण्यात आल्या होत्या. त्यावर ही कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे डॉल्बी चालक व मालकांचे धाबे दणाणले असून डॉल्बी प्रेमी नागरिक आणि मालकांसह शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

धाराशिव शहरात सुरू असलेल्या डॉल्बी–डीजेच्या बेकायदेशीर वापरामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सहा डॉल्बी व डीजे चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील चार डॉल्बी, डीजे वाहनांना प्रत्येकी १० लाख रुपये अशा एकूण ४० लाख रुपयांच्या हमी रक्षण बंदपत्रावर, अटी व शर्तींसह तात्पुरते ताब्यात देण्याचे आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश आर. डी. गायकवाड यांनी ३० जानेवारी रोजी दिले आहेत. तर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाने संबंधित वाहनांवर १४,५००, १९,५००, १७,५०० व २२,५०० रुपये असा एकूण ७४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना चाकूचा धाक दाखवत लुटलं; मध्यरात्री जाधववाडीत खळबळ

काय आहे प्रकरण

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ जानेवारी रोजी धाराशिव शहरातील हजरत खॉजा शमशोद्दीन गाजी (रहे.) यांच्या उरूसानिमित्त डॉल्बी–डीजे लावण्यात आले होते. मात्र ठरवून दिलेल्या ध्वनीमर्यादेपेक्षा अधिक आवाज केल्याने संपूर्ण शहरात प्रचंड दणदणाट झाला. त्यामुळे शहर पोलिसांनी चार डॉल्बी वाहने, साऊंड सिस्टिमसह ताब्यात घेतली होती. या प्रकरणी ध्वनी प्रदूषण कायद्याच्या कलम ३, ४, ५ व ६, पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ३ व ४ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम २९३, २८९, २९२ व २२३ अन्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात आले आहे.

न्यायालयाचा निर्णय

न्यायालयाने संबंधित डॉल्बी, डीजे व साऊंड सिस्टिम तसेच वाहने कोणत्याही बेकायदेशीर कामासाठी वापरण्यास कायमची बंदी घातली आहे. तसेच ही वाहने विकता येणार नाहीत, त्यात कोणताही बदल करता येणार नाही आणि न्यायालयीन आदेशानुसार ती सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहाळ, अक्षय दिघोळे, तसेच अंमलदार ज्ञानेश्वर माळी व राम कनामे यांचा समावेश होता. या न्यायालयीन आदेशामुळे यापुढे धाराशिव शहरात डॉल्बी–डीजेच्या बेकायदेशीर वापराला चाप बसेल, असा ठाम संदेश गेला असून डॉल्बीमुक्त शहराकडे एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Crime News: ‘टीडब्ल्यूजे’ कंपनीचा मालक समीर नार्वेकर पत्नीसह अटकेत; अनेकांना कोट्यवधींचा चुना

Web Title: Dolby drivers fined rs 40 lakh action taken for playing dolby at high volume in the rush

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • police

संबंधित बातम्या

आई येडेश्वरी देवीच्या यात्रेला उसळला भाविकांचा जनसागर! सोलापूर-धुळे हायवे जाम, ४० किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा; पाहा Video
1

आई येडेश्वरी देवीच्या यात्रेला उसळला भाविकांचा जनसागर! सोलापूर-धुळे हायवे जाम, ४० किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा; पाहा Video

Mumbai Crime: किरकोळ वाद अन् ॲसिडचा घात…! कामगारांनी एकमेकांवर फेकलं ॲसिड, बेकायदेशीर कंपनीला वेढा
2

Mumbai Crime: किरकोळ वाद अन् ॲसिडचा घात…! कामगारांनी एकमेकांवर फेकलं ॲसिड, बेकायदेशीर कंपनीला वेढा

Dharashiv News: वेतन फरकासाठी ८ हजारांची लाच घेताना शिक्षण विभागातील अधीक्षक रंगेहात जेरबंद
3

Dharashiv News: वेतन फरकासाठी ८ हजारांची लाच घेताना शिक्षण विभागातील अधीक्षक रंगेहात जेरबंद

karnatak Crime: घरात पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; ‘सगळं संपलं’… सुसाईड नोट सापडली
4

karnatak Crime: घरात पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; ‘सगळं संपलं’… सुसाईड नोट सापडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.