Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dellhi Crime: गोंगाटाला आक्षेप घेणे बेतले जीवावर; मात्र टोळक्याने तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग करून केला हल्ला

रात्री घराबाहेर सुरू असलेल्या गोंगाटाला आक्षेप घेतल्यानंतर संगीतकार घराकडे परतले; मात्र त्याच्या मागे टोळकेही येऊ लागले. टोळक्यांचा तिसऱ्या मजल्यापर्यंत झालेला पाठलाग, कॉरिडॉरमधील मारहाण आणि त्यानंतर रुग्णालयात झालेला मृत्यू या घटनेने दिल्ली हादरली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 08, 2026 | 04:36 PM
Dellhi Crime: गोंगाटाला आक्षेप घेणे बेतले जीवावर; मात्र टोळक्याने तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग करून केला हल्ला

Dellhi Crime: गोंगाटाला आक्षेप घेणे बेतले जीवावर; मात्र टोळक्याने तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग करून केला हल्ला

Follow Us
Follow Us:
  • संगीतकाराचा काही जणांशी गोंगाटावरून वाद
  • तिसऱ्या मजल्यापर्यंत केला पाठलाग
  • आठ जणांकडून मारहाण झाल्याचा आरोप
नवी दिल्ली: घराबाहेर सुरू असलेल्या गोंगाटाला आक्षेप घेणे मणिपूरमधील ५४ वर्षीय संगीतकार चोंगथम विक्रम सिंह यांच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील किलोकरी गावात घडली. रविवारी रात्री कचरा टाकण्यासाठी घराबाहेर आलेल्या सिंह यांचा काही जणांशी वाद झाला. त्यानंतर आठ जणांच्या गटाने त्यांचा पाठलाग करून इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कॉरिडॉरमध्ये बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून, एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिक पातळीवरील माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गोंगाटावरून वाद झाल्याचा दावा

रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास चोंगथम विक्रम सिंह आपल्या तिसऱ्या मजल्यावरील घरातून कचरा टाकण्यासाठी खाली आले होते. त्यावेळी जवळील रस्त्यालगतच्या एका खानावळीतील काही कर्मचारी गोंधळ करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सिंह यांनी या गोंगाटाला आक्षेप घेतल्यानंतर त्यांच्यात आणि तेथील काही व्यक्तींमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येते. वादानंतर सिंह घराकडे परतत असताना संबंधित गटाने त्यांचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. आरोपींनी तिसऱ्या मजल्यापर्यंत त्यांचा पाठलाग करून कॉरिडॉरमध्ये त्यांना गाठले आणि मारहाण केल्याचे समोर आले आहे. हल्ल्यानंतर आरोपी तेथून पसार झाल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा: Crime News: मोबाईल-रील्सच्या आहारी जाण्याचा धक्कादायक परिणाम; इंटरनेट बंद पडल्याने महिलेने घेतला टोकाचा निर्णय

सीसीटीव्हीत आठ जण कैद

मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर शेअर करून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या फुटेजमध्ये आठ जण इमारतीच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना दिसत असल्याचे सांगण्यात येते. हे फुटेज कथित हल्ल्यानंतरचे असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांना सोमवारी पहाटे १ वाजून ३८ मिनिटांनी घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर सिंह यांचा २० वर्षीय मुलगा याइफाबा याने त्यांना ओखला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच सकाळी सुमारे ७ वाजता त्यांचा मृत्यू झाला. चोंगथम विक्रम सिंह हे पत्नी जोशना चोंगथम आणि मुलगा याइफाबा यांच्यासह राहत होते. या हल्ल्यामागील नेमके कारण आणि सर्व आरोपींची भूमिका याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Manipurdelhi crime objecting to a commotion cost chongtham vikram singh his life a gang chased and attacked him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 04:36 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.