सौजन्य फोटो - Chat GPT
रिल्समुळे मोठा घात
मिळालेल्या माहितीनुसार, मंगलो बाई यांना मोबाईलवर रील्स पाहण्याची मोठी सवय होती. शनिवारी त्या मोबाईलवर रील्स पाहत असताना इंटरनेट नेटवर्कमध्ये वारंवार अडथळे येत होते. त्यामुळे व्हिडिओ पाहण्यात व्यत्यय येत असल्याने त्या संतप्त झाल्या. रागाच्या भरात त्यांनी मोबाईल फोडल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली. ही बाब त्यांच्या १७ वर्षीय मुलीच्या लक्षात आली. मुलीने तातडीने कुटुंबातील इतर सदस्यांना याची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी मंगलो बाई यांना उपचारासाठी करतला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
उपचारादरम्यान मृत्यू
प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी कोरबा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. तेथे डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
सोशल मीडिया वापराच्या वाढत्या व्यसनाचा प्रश्न चर्चेत
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे. कुटुंबीयांचे जबाब आणि घटनेच्या पार्श्वभूमीची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. महिलेने टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या मानसिक स्थितीत उचलले, याचाही तपास केला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे मोबाईल आणि सोशल मीडिया वापराच्या वाढत्या व्यसनाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. रील्स पाहणे किंवा सोशल मीडिया वापरणे ही सवय दैनंदिन जीवनाचा मोठा भाग बनत असताना त्याचे अतिवापरात रूपांतर होऊ नये, याबाबत तज्ज्ञांकडून सातत्याने जनजागृती केली जाते.
विशेषतः इंटरनेट किंवा सोशल मीडिया उपलब्ध नसल्याने निर्माण होणारी अस्वस्थता, चिडचिड आणि तणाव याकडे दुर्लक्ष न करण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे. कोणत्याही व्यक्तीमध्ये अशा प्रकारची तीव्र अस्वस्थता किंवा स्वतःला इजा करण्याची भावना दिसल्यास कुटुंबीयांनी तातडीने मदत घेणे आवश्यक आहे.






