Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा एक ‘वैष्णवी’! कुपवाडमध्ये विवाहितेने केली आत्महत्या, धार्मिक रितीरिवाज पाळण्यासाठी दबाव

विवाहितेवर धार्मिक दबाव टाकत पतीसह सासू, सासऱ्यांनी शारीरिक व मानसिक छळ करत असल्यामुळे गर्भवती असतानाच विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 10, 2025 | 06:20 PM
Married woman commits suicide in Kupwada, Sangli, fed up with in-laws' harassment

Married woman commits suicide in Kupwada, Sangli, fed up with in-laws' harassment

Follow Us
Close
Follow Us:
सांगली : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली होती. या प्रकारची घटना आता सांगलीमध्ये देखील घडली आहे. सांगलीमधील कुपवाडमध्ये विवाहितेने आत्महत्या केली.
गर्भवती असतानाच विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. या विवाहितेवर धार्मिक दबाव टाकत पतीसह सासू, सासऱ्यांनी शारीरिक व मानसिक छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आज कुपवाड पोलिसांत नोंद झाला.
ऋतुजा ऊर्फ गौरी सुकुमार राजगे असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील डॉ. चंद्रकांत पाटील (गुंडेवाडी, ता. मिरज) यांनी फिर्याद दिली. कुपवाड पोलिसांनी या घटनेची गांभीयनि दखल घेत पतीसह तिघांना तत्काळ अटक केली. पती सुकुमार सुरेश राजगे (वय २९), सासू अलका सुरेश राजगे (४९), सासरा सुरेश राजाराम राजगे (५३, सर्व अश्विनी हौसिंग सोसायटी, यशवंतनगर, कुपवाड) अशी त्यांची नावे आहेत. सध्या तिघेही पोलिस कोठडीत आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की मृत ऋतुजा हिचा विवाह सुकुमार राजगे याच्याशी २०२१ मध्ये झाला होता. सुकुमार हा मर्चेंट नेव्हीमध्ये सेकंड ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. लग्नात जावयास साडेचार तोळ्यांची चेन, अंगठ्या असा मानपान केला होता. सुकुमार याच्यासह त्याचे कुटुंबीय ख्रिश्चन धर्माचे अनुकरण, प्रार्थना व रीतिरिवाजाप्रमाणे राहत असल्याचे ऋतुजा आणि तिच्या कुटुंबीयांना लग्नापर्यंत माहिती नव्हते. जून २०२१ मध्ये ऋतुजा हिला पहिला वटपौर्णिमेचा सण सासू अलका हिने साजरा करू दिला नाही. त्यानंतर सुकुमार हा कामावर निघून गेला.
क्राईम न्यूज वाचण्यासाठी क्लिक करा 
लग्नानंतरची पहिली दिवाळी सासरच्या मंडळींनी साजरी करू दिली नाही. ‘आमच्या घरात दिवाळी सण साजरा करत नाही. तू आमच्यासोबत चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येत जा,’ अशी संशयितांनी जबरदस्ती केली. तसेच ऋतुजा हिला स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही करू दिला नाही. संशयितांनी तिला वारंवार त्रासही दिला. चर्चमध्ये प्रार्थना, पूजा करण्यासाठी वारंवार तगादा लावण्यात आला. दरम्यानच्या काळात ऋतुजा गर्भवती राहिली. यावेळी ख्रिश्चन धर्माप्रमाणेच गर्भसंस्कार करू, असा दबावही तिच्यावर टाकण्यात आला. त्यानंतर पती सुकुमार याने मारहाणही केली. ऋतुजाच्या आत्महत्येपूर्वी वडिलांनी जावयासह सासरच्या मंडळींना समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला. मात्र, सततच्या त्रासाला आणि दबावाला ऋतुजा वैतागली होती. अखेर शुक्रवारी (ता. ६) तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर खळबळ उडाली. वडिलांच्या फिर्यादीनंतर पतीसह तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

Web Title: Married woman commits suicide in kupwada sangli fed up with in laws harassment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 06:20 PM

Topics:  

  • crime news in marathi
  • Sangli Crime
  • Vaishnavi Hagawane Case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.