माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार, कारखाना राज्यात पहिल्या पाचमध्ये आणून दाखवू; अजित पवारांचा विश्वास(फोटो - सोशल मीडिया)
पुणे : राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले आहेत. यानंतर महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचे अनेकदा दिसून आले. मंत्रिपदापासूप पालकमंत्रिपदापर्यंत नाराजीनाट्य सुरु असलेल्या महायुतीमध्ये आता निधीवरुन वाद तापला आहे. महायुतीमध्ये राज्याच्या तिजोरीची चावी ही अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचे आमदार व मंत्री निधीसाठी अनेकदा तक्रार करत असतात. याचा आता अजित पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
राष्ट्रवादी पक्षाचा 26 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. पुण्यातील बालेवाडी येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महायुतीमधील निधीवरुन तक्रार करणाऱ्या मंत्र्यांना सुनावले आहे. यावेळी अजित पवार यांनी शिंदे गटाचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “सत्तेमध्ये असेल तर सरकारमध्ये राहून आणि सत्तेमध्ये नसेल तर रस्त्यांवर उभं राहून लोकांसाठी संघर्ष करत राहणार आहे. राष्ट्रवादी पक्ष हा शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित पक्ष पुरोगामी विचारांवर चालणारा पक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये या विचारांबाबत तडजोड केली जाणार नाही. जर कधी तडजोड करण्याचा विचार झाला तर त्यादिवशी पक्षाचा पाया कमजोर होईल. 2019 मध्ये शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलं. शेवटी विरोधी पक्षामध्ये नुसतं बसून घोषणाबाजी करुन आणि आंदोलन करुन चालत नाही. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बेरजेचे राजकारण करणारे आपण आहोत,” अशी भूमिका अजित पवार यांनी मांड़ली आहे. एका अर्थी अजित पवार यांनी महायुतीमध्ये सामील झाल्याचे कारण पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना नाव न घेता टोला लगावला आहे. ते म्हणाले की, “जातीय जनगणनेमुळे अनेक प्रश्न सुटणार आहेत. यंदा 7 लाख 20 कोटी रुपयांचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. महायुती सरकारने मागील अर्थसंकल्पापेक्षा 41 टक्के वाढ ही अनुसुचित जमातींसाठी दिले आहे. हे पुढे येतच नाही. कोणीतरी सांगत अजित पवारांनी अन्याय केला. सामाजिक न्याय विभागावर मी अन्याय केलेला नाही. नरहरी झिरवाळ येथे आहेत त्यांना विचारा. काही जण म्हणतात अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे काय माझ्या खिशामध्ये पैसे घेऊन बसलो आहे का? अर्थसंकल्प सादर केल्यानंतर टप्प्याटप्प्याने पैसे सोडले जातात,” अशा शब्दांत अजित पवार यांनी शिंदे गटाचे नेते व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना नाव न घेता टोला लगावला आहे.