Satara News : कोयत्याचा धाक दाखवत अडीच लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
तुळजापूर शहरातून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना तुळजापूर शहरातील पोलीस कॉर्टर एस.टी. कॉलनीत घडली आहे. तरुणीचे नाव सारिका शिकारे असे आहे. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
जमिनीत अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; सातारच्या फलटणमधील घटना
नेमकं काय प्रकार?
आरोपीचे नाव ओंकार कांबळे असं आहे. गेल्या काही महिन्यांपासून ओंकार तिला त्रास देत होता. माझ्यावर प्रेम कर, माझ्याशी लग्न कर नाहीतर सोशल मिडीयावर तुझी बदनामी करेन, तू माझ्याशी लग्न नाही केलं तर तुला बंदुकीने मारेन, अशी धमकी ओंकार कांबळे सारिकाला देत होता. या सगळ्याला कंटाळून सारिकाने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली. फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी ओंकार कांबळे, नगिना शशिकांत पांडागळे या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी ओंकार कांबळे याने सोशल मीडियावर बंदूक घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा व्हिडीओ वायरल केला होता. यामुळे त्याच्यावर पूर्वीदेखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी सारिकाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यावर पुढील कारवाई पोलीस काय करणार याकडे सर्वांचे नजर लागल्या आहेत.
या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी ओंकार कांबळे, नगिना शशिंकात पांडागळे या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोशल मीडियावर बंदूक घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ व्हायरल केल्याने आरोपी ओंकार कांबळेवर पुर्वीचाही गुन्हा आहे दाखल आहे. याप्रकरणी आता पोलीस पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
धक्कादायक ! 14 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; मोबाईल काढून घेतला म्हणून राग आला अन्…