Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar Crime News: आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या

वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 आत्महत्येच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. यातील 5 घटना वसई विरार येथील असून एक घटना मीरा-भाईंदर येथे घडली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 14, 2026 | 08:07 PM
वसई विरार परिसरात एकाच दिवशी सहा जणांची आत्महत्या

वसई विरार परिसरात एकाच दिवशी सहा जणांची आत्महत्या

Follow Us
Close
Follow Us:
  • वसई विरार परिसरात खळबळ
  • एकाच दिवशी सहा जणांची आत्महत्या
  • परिसरात भीतीचे वातावरण
विजय काते/ भाईंदर: मिरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शुक्रवारी एकाच दिवशी सहा जणांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यापैकी पाच घटना वसई विरार शहरातील असून एक घटना भाईंदरमधील आहे. या घटनांमध्ये १० व १५ वर्षीय अल्पवयीन मुलींसह तरुण आणि प्रौढांचा समावेश आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आजारपण व नैराश्य ही संभाव्य कारणे असू शकतात. संबंधित प्रकरणांची नोंद विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. मृतांमध्ये अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे.

या दुर्दैवी घटनांमध्ये भूषण सुर्वे (३३), शंभूनाथ दुबे (५०), जोया खान (१०), शुभांगी शर्मा (४३), जहीरूननिशा आलम (१५) आणि वत्सल (२३) यांचा समावेश आहे. एकाच दिवशी सहा जणांनी जीवन संपवल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

धक्कादायक! इंदापूरमध्ये तरुणाचे अपहरण; तब्बल 20 तास छळ केला अन्…

दहा वर्षांच्या मुलीच्या आत्महत्येमुळे प्रश्नचिन्ह

नालासोपारा येथील वकनपाडा परिसरात राहणाऱ्या जोया खान (१०) हिने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. तिच्या वडिलांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अवघ्या दहा वर्षांच्या मुलीने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे कुटुंबीयांसह परिसरात संभ्रमाचे वातावरण आहे.

शाळेत न जाण्याच्या तणावातून टोकाचे पाऊल?

वसईतील रॉयल सायलंट परिसरात राहणाऱ्या जहीरूननिशा आलम (१५) हिनेही गळफास लावून आत्महत्या केल्याची नोंद आहे. ती नववी इयत्तेत शिकत होती. शाळा सकाळी लवकर असल्याने तिला उठण्यास अडचण येत होती. गेल्या महिन्याभरापासून ती शाळेत जात नव्हती. काही दिवसांत वार्षिक परीक्षा सुरू होणार असल्याने ती मानसिक तणावाखाली होती. आई-वडील घरी नसताना तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.

Delhi Crime: व्हॅलेंटाईन्सपूर्वी धक्का! हॉटेलमध्ये प्रेमीयुगुलात वाद; रागाच्या भरात तरुणीची चौथ्या मजल्यावरून मारली उडी

वाढते नैराश्य; जनजागृती अपुरी?

मागील काही वर्षांत नैराश्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. पोलिसांकडून समुपदेशन व जनजागृती उपक्रम राबवले जात असले तरी ते प्रभावीपणे संबंधितांपर्यंत पोहोचत नसल्याची बाब समोर येत आहे. तज्ज्ञांच्या मते, कुटुंबीयांनी मुलांशी नियमित संवाद साधणे, त्यांच्या भावनिक स्थितीकडे लक्ष देणे आणि शाळा-कॉलेजांनी समुपदेशन व्यवस्था मजबूत करणे गरजेचे आहे.

Web Title: Vasai virar crime news 6 people commit suicide in vasai virar on single day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 08:05 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • Sucide News
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार
1

Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.